Paneer frankie
Paneer frankie esakal
फूड

Paneer frankie : उन्हाळ्याच्या सुट्ट्यांत मुलांना वेगळं काय खाऊ घालाल? बनवा पनीर फ्रँकी

सकाळ डिजिटल टीम

Paneer frankie Recipe : पनीर फ्रँकी रेसिपी

सध्या सगळ्या मुलांच्या शाळांना सुट्ट्या लागल्या असून सुट्ट्यांमध्ये मुले घरी आईला वेगवेगळे पदार्थ बनवून मागण्याचा हट्ट करतात. अशा वेळी मुलांसाठी सरळ सोप्या पद्धीतीनं काय बनवावं असा प्रश्न उभा राहातो. मात्र आता चिंता करू नका. आज आम्ही तुमच्यासाठी सोपी रेसिपी घेऊन आलो आहोत.

पनीर फ्रँकीसाठी लागणारे साहित्य

साहित्य: १ वाटी पनीरचे तुकडे

१ मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून

१ मध्यम आकाराचा कांदा उभे काप करून

१ लहान ढोबळी मिरची बारीक चिरून १ मोठा चमचा तेल

मॅरीनेशनसाठी : १/४ वाटी दही १ चमचा लाल तिखट

१/४ चमचा हळद १/२ चमचा आलं-लसूण पेस्ट १ मोठा चमचा तांदळाचे पीठ चिमूटभर कसुरी मेथी १/२ गरम मसाला किंवा किचन किंग मसाला १/२ चमचा चाट मसाला चवीपुरते मीठ

रॅपिंगसाठी ताजी केलेली चपाती किंवा आदल्या दिवशीची चपाती.

कृती : मॅरीनेशनसाठी दिलेले सर्व साहित्य एका वाडग्यात एकत्र करून त्यात पनीरचे तुकडे घाला. पनीरच्या तुकड्यांना हे मिश्रण सगळीकडे व्यवस्थित लावून घ्या. मग त्यामध्ये टोमॅटो घालून पुन्हा हलवा. वीस मिनिटे हे मिश्रण झाकून ठेवा. एका पॅनमध्ये एक मोठा चमचा तेल गरम करून त्यात कांदा, (Food News)

ढबू मिरची परतून घ्या. त्यानंतर त्यात मुरवलेले-मॅरीनेट केलेले पनीर आणि टोमॅटो परता. वरून मीठ घाला. पनीर खूप वेळ परतू नका. नंतर चपातीला थोडी पुदिन्याची चटणी लावून त्यावर पनीरचे तयार झालेले मिश्रण घाला. हवा असल्यास त्यावर सॉस घाला. नंतर त्याचा रोल बनवून तव्यावर थोडेसे तेल वा तूप टाकून तो रोल दोन्ही बाजूंनी चांगला परतून घ्या. ही पनीर फ्रँकी टोमॅटो केचप किंवा हिरव्या चटणी बरोबर. (Paneer Tasty Recipe)

गरमागरम खायला द्या.

अदिती दिवाण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, सहा महिन्यात POK भारताचा भाग होईल; योगींची मोठी घोषणा

IPL 2024 RCB vs CSK Live Score: विराटच्या सुरुवातीच्या तुफानानंतर बेंगळुरूत पावसाचं आगमन, सामना थांबला

Arvind Kejriwal: "आम्ही भाजपच्या मुख्यालयात येतोय हिंमत असेल तर..."; केजरीवालांचं पंतप्रधान मोदींना थेट आव्हान

Pune News: वादळी वाऱ्यामुळे लोणी-काळभोरमध्ये बँड पथकावर होर्डिंग कोसळलं, घोडा गंभीर जखमी

Latest Marathi News Live Update : पुणे-मुंबई हायवेवर वाहतूक कोंडी, वाहतूक संथ गतीने

SCROLL FOR NEXT