PCOS Friendly Recipe | Cookie Dough Bars sakal
फूड

PCOS-Friendly Dessert Recipe: PCOS असलेल्या महिलांच्या स्वीट क्रेविंगसाठी खास गिल्ट-फ्री अन् नो-बेक रेसिपी! पाहा कसे बनवायचे 'कुकी डो बार्स'

Guilt-free no-bake cookie dough bars for PCOS: PCOS असलेल्या महिलांसाठी खास गोड, फायबरयुक्त आणि नो-बेक कुकी डो रेसिपी – वजन वाढणार नाही याची खात्री!

Anushka Tapshalkar

PCOS friendly gluten-free dessert ideas: तुम्हाला गोड खायला आवडतं, पण PCOSमुळे वजन कमी करणं जरा अवघड वाटतंय? मग हा लेख तुमच्यासाठीच आहे! वजन कमी करत असताना बहुतेक वेळा गोड खाण्यावर बंदी घालावी लागते. पण नेहमीच "नको" म्हणणं शक्य नसतं आणि तसं करणं गरजेचंही नाही!

गोड खाण्याची आवड सांभाळत, शरीराला पोषण देणारी आणि वजन कमी करण्याच्या या प्रवासात मदत करणारी एक झकास रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आलोय ती म्हणजे कुकी डो बार्स! ही रेसिपी केवळ चविष्टच नाही, तर फायबर, हेल्दी फॅट्स आणि प्रोटीनने भरलेली असल्यामुळे वजनावर नियंत्रण ठेवतानाही तुम्ही गिल्ट-फ्री गोड खाऊ शकता. चला तर मग, झटपट तयार होणारी ही हेल्दी स्वीट ट्रिट ट्राय करूया!

साहित्य

कुकी डो बेससाठी

  • 1.5 कप गव्हाचे पीठ (Wheat flour)

  • 1/2 कप पीनट बटर

  • 1/2 कप मॅपल सिरप

  • 1/4 कप नारळ तेल

  • 1-2 ड्रॉप व्हॅनिला सिरप

  • थोडंसं मीठ

  • 1/2 कप डार्क चॉकलेट चिप्स

चॉकलेट लेयरसाठी

  • 1 कप चॉकलेट चिप्स

  • 1/4 कप पीनट बटर

कृती

  • एका प्लेन डिशवर शक्यतो मायक्रोवेव्हसाठी योग्य डिश किंवा ट्रेवर बटर पेपर किंवा पार्चमेंट पेपर ठेवा. पेपर नीट राहण्यासाठी आधी तूपाने थोडं ग्रीस करून घ्या.

  • वरील सर्व बेससाठी लागणारं साहित्य एकत्र करून व्यवस्थित मिक्स करा आणि ट्रेवर पसरवून घ्या.

  • दुसऱ्या भांड्यात चॉकलेट चिप्स आणि पीनट बटर एकत्र करून मायक्रोवेव्हमध्ये ३० सेकंदाच्या अंतराने गरम करत-करत मिक्स करा. (यासाठी डबल बॉयलर पद्धत वापरू शकता.)

  • हे मिक्स बेस लेयरवर ओता.

  • आता हे फ्रीजरमध्ये ठेवा आणि नंतर गरजेनुसार स्लाइस कापून फ्रीजरमध्येच स्टोअर करा.

ही रेसिपी फायबर आणि प्रोटीनने भरलेली असल्यामुळे पोट भरलेलं राहतं आणि भूक वारंवार लागत नाही. शिवाय, शुगर-फ्री सिरप आणि ग्लूटन-फ्री, नो-बेक पद्धतीमुळे हे कुकी डो बार आरोग्यदायी आणि पचायला सुलभ ठरतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sheikh Hasina: हिंसक कारवाईची मोठी किंमत! हत्याकांड प्रकरणी शेख हसीना दोषी; बांगलादेश न्यायालयाकडून मृत्युदंडाची शिक्षा

Latest Marathi Breaking News: पालघर-संभाजीनगर बसला अपघात, 25हून अधिक प्रवासी जखमी

Ironman Competition: 'पांगरीच्या अजय दडस यांचे आयर्नमॅन स्पर्धेत यश'; गोव्यातील स्पर्धेत ३३ देशांतील सुमारे १३०० खेळाडू सहभागी

Viral Jugaad Video : चाक नसतानाही सुस्साट धावू लागला टेम्पो, जुगाडाचा बादशहा ठरला ड्रायव्हर; व्हिडिओ पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही

Pushkar Singh Dhami : सीएम धामींनी संरक्षण मंत्र्यांसमोर ठेवल्या सामरिक महत्त्वाच्या मागण्या; नंदा राजजात यात्रेच्या मार्गावरही केली चर्चा

SCROLL FOR NEXT