Laddu  sakal
फूड

Rakhi Special Laddu Recipe: रक्षाबंधनानिमित्त लाडक्या भाऊरायासाठी बनवा चविष्ट मूग डाळीचे लाडू, जाणून घ्या सोपी रेसिपी

आम्ही तुम्हाला मूग डाळीपासून लाडू बनवण्याची पद्धत सांगणार आहोत.

Aishwarya Musale

हिंदू धर्मात रक्षाबंधन हा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. राखीचा सण आला असताना, आज आम्ही तुमच्यासाठी स्वादिष्ट आणि पौष्टिक मिठाईची रेसिपी घेऊन आलो आहोत. बनवायला खूप सोपी आहे, आम्ही तुम्हाला मूग डाळीपासून लाडू बनवण्याची पद्धत सांगणार आहोत आणि तुम्ही ते सहज बनवू शकता.

लागणारे साहित्य

मूग डाळ - १ कप

पिठी साखर - 1/4 कप

देशी तूप - १/४ कप

सुका मेवा - बारीक चिरून

मूग डाळीचे लाडू कसे बनवायचे?

सर्व प्रथम एका पातेल्यात मूग डाळीची पावडर टाका आणि मध्यम आचेवर सोनेरी होईपर्यंत तळा. तळून झाल्यावर गॅस बंद करून थंड होऊ द्या. भाजलेली डाळ व्यवस्थित थंड झाल्यावर मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. आता एका पॅनमध्ये पावडर मूग डाळीची पावडर टाका आणि 10 मिनिटे सतत ढवळत राहा.

हे मिश्रण एका प्लेटमध्ये काढून थंड होण्यासाठी ठेवा. हे पीठ एका मोठ्या भांड्यात ठेवा. आता त्यात पिठीसाखर, ड्राय फ्रुट आणि तूप एकत्र करून गोल लाडू बनवा. लाडूच्या वर ड्रायफ्रुट्स चिकटवा. तुमचा मूग डाळीचा चविष्ट लाडू तयार आहे.

राखी कधी बांधायची?

हिंदू दिनदर्शिकेनुसार श्रावण महिन्याची पौर्णिमा ३० ऑगस्टला सुरू होते तर, ३१ ऑगस्टला संपते. पौर्णिमे दिवशीच भद्राकाळही आहे. त्यामुळे त्यादिवशी संपूर्ण दिवस राखी बांधता येणार नाही. याचे कारण असे की, भद्रकाळात कोणतेही शुभ काम केले जात नाही. आणि केले तर ते फळाला येत नाही.

पौर्णिमा कधीपासून कधीपर्यंत

पौर्णिमा तिथीची सुरुवात : ३० ऑगस्ट २०२३ सकाळी १० वाजून ५८ मिनिटांनी

पौर्णिमा समाप्ती : ३१ ऑगस्ट २०२३ सकाळी ७.०५ वाजता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubhanshu Shukla Research : शुभांशु शुक्लांनी अंतराळात केला थरारक प्रयोग! बनले 'या' खास गोष्टीवर संशोधन करणारे पहिले भारतीय..

Nagpur Fraud: खोट्या रजिस्ट्रीच्या आधारे उचलले ३८ लाखांचे गृहकर्ज

Pune News : रस्त्याच्या मधोमध झाडामुळे अपघाताचा धोका; प्रयेजा सिटी सोसायटी परिसरातील स्थिती, जवळच शाळा असल्याने चिंता

Latest Maharashtra News Live Updates: अर्जेंटिनाचा यशस्वी दौऱ्यानंतर , पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ब्राझीलची राजधानी रिओ दि जनेरियो इथं भव्य स्वागत

Pune News : नानासाहेब पेशवेंच्या समाधीची दुरवस्था; परिसरात कचऱ्याची समस्या; महापालिकेच्या दुर्लक्षामुळे ऐतिहासिक वारसा उपेक्षित

SCROLL FOR NEXT