Midnight Snacks
Midnight Snacks esakal
फूड

Midnight Snacks : मिडनाईट क्रेव्हिंग्जना टाळू नका! रात्री उशीरा लागणाऱ्या भुकेसाठी ट्राय करा 'या' भन्नाट अन् सोप्या रेसिपीज

Monika Lonkar –Kumbhar

Midnight Snacks : आजकाल कामाचे वाढलेले तास आणि व्यस्त वेळापत्रक यामुळे मिडनाईट क्रेविंग्ज ज्याला आपण मिडनाईट स्नॅकिंग्स असे ही म्हणतो. ही संकल्पना आता रूजू झाली आहे. तरूणाईमध्ये तर हे मिडनाईट स्नॅकिंग विशेष लोकप्रिय आहे.

अनेकदा कामामुळे जास्तीचे जागरण होते किंवा दिवसभराची कामे आटोपून काहींना घरी यायला उशिर होतो. अशावेळी मग, खास मध्यरात्रीच्या भूकेसाठी मिडनाईक स्नॅकिंग केले जाते. यासाठी अनेक रेसिपीजची मदत घेतली जाते. आज आपण खास मिडनाईट स्नॅकिंगसाठीच्या काही सोप्या आणि झटपट रेसिपीज जाणून घेणार आहोत.

ग्रील्ड चीझ सॅंडवीच

ग्रील्ड चीझ सॅंडवीच खायला कुणाला आवडत नाही, हे तर सर्वांनाच आवडते. मध्यरात्रीची भूक मिटवण्यासाठी तुम्ही या रेसिपीजचा आस्वाद घेऊ शकता. ही रेसिपी करण्यासाठी तुमही ब्रेडचे स्लाईस घ्या.

हे ब्रेडचे स्लाईस कापून घेऊन त्याला लोणी लावा. मग, त्यावर तुमच्या आवडीनुसार वेगवेगळे सॉसेस, कांद, टोमॅटो आणि काकडीचे स्लाईसेस ठेवा. हिरवी चटणी ही तुम्ही वापरू शकता.

त्यानंतर, त्यावर mozzarеlla चीझ पसरवा आणि पॅनमध्ये तूप किंवा बटर घालून त्यावर सॅंडवीच दोन्ही बाजूंनी सोनेरी होईपर्यंत भाजून घ्या. पुढील १५ मिनिटांत तुमचे हे ग्रील्ड चीझ सॅंडवीच तयार असेल. मध्यरात्री खाण्यासाठी हे स्नॅक्स बेस्ट आहे.

आलू भुजिया चाट

मध्यरात्री खाण्यासाठी हा ऑप्शन एकदम टेस्टी, स्पायसी आणि बेस्ट आहे. ही रेसिपी करण्यासाठी तुम्हाला फक्त आलू भुजियाचे एक पॅकेट लागेल. त्यासोबत तुमच्या आवडीनुसार वेफर्स, कुरकुरे, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, मीठ, लिंबाचा रस, तिखट आणि चाट मसाला लागेल.

फक्त एवढ्या साहित्यात झटपट होणारी ही रेसिपी आहे. आलू भुजिया चाट बनवण्यासाठी सर्वात आधी एका बाऊलमध्ये किंवा भांड्यामध्ये आलू भुजिया घ्या. त्यामध्ये आता चिरलेला टोमॅटो, कांदा, कोथिंबीर घाला.

त्यावर तुमच्या आवडीचे चीप्स आणि कुरकुरे घाला. आता यावर मीठ, लाल तिखट, चाट मसाला पसरवा. त्यानंतर, त्यात सॉस आणि लिंबाचा रस मिसळा. त्यानंतर, हे सर्व घटक छान प्रकारे मिक्स करा आणि तुमची मिडनाईट क्रेविंग्सची भूक मिटवा.

चिली गार्लिक नूडल्स

नूडल्स आजकाल कुणाला आवडत नाहीत. हे सर्वांनाच आवडतात, कारण हे करायला अतिशय सोपे आहेत. ही रेसिपी बनवण्यासाठी सर्वात आधी नूडल्स उकळून घ्या. त्यानंतर, त्यातले पाणी गाळून घेऊन ते नूडल्स दुसऱ्या बाऊलमध्ये काढून घ्या.

आता गॅसवर पॅन ठेवा. त्यात तेल घालून त्यात बारीक चिरलेला लसूण आणि २-३ चिरलेल्या हिरव्या मिरच्या घाला. त्यानंतर, चिली फ्लेक्स घाला (तुमची आवड असले तर) त्यानंतर, त्यात टोमॅटो सॉस, शेजवान सॉस आणि थोडस लाल तिखट आणि शेवटी मीठ घालून परतून घ्या. तुमचे चिली गार्लिक नूडल्स तयार आहेत. मध्यरात्री या भन्नाट डिशचा आस्वाद घ्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"राज्यासाठी शिंदे मुख्यमंत्री असले तरी आमच्यासाठी फडणवीसच..." भाजप आमदार म्हणाला, मी तर ओपन बोलतो

Yogi Adityanath: 2022 च्या निवडणुकांपूर्वी CM योगींना हटवण्याची झाली होती तयारी, 'या' पुस्तकात धक्कादायक दावा

Viral Video: मानवी बोटानंतर आता महिलेला ऑनलाइन मागवलेल्या आईस्क्रीमध्ये सापडली गोम

T20 World Cup मधील सुपर-8 आहे तरी काय, भारत-ऑस्ट्रेलिया एकाच गटात कसे? जाणून घ्या सर्व काही

IND W vs SA W: भारतीय संघाचा पहिल्या वनडेत दक्षिण आफ्रिकेला धोबीपछाड; आशा शोभनानं 4 विकेट्स घेत गाजवलं पदार्पण

SCROLL FOR NEXT