Til Chutney esakal
फूड

Til Chutney : वाढत्या थंडीपासून वाचण्याचा रामबाण आणि चविष्ट उपाय! तिळाची चटणी

हिवाळा हा जितका चांगला तितकाच वाईट

सकाळ डिजिटल टीम

Til Chutney : दिवसेंदिवस थंडी वाढते आहे, लहानपणी थंडी वाढली की आजी काहीना काही काढे करून पाजायची, आई रोज गरम दूध आणि हळद पेयला लावायची. हे रुटीन काहींच्याकडे अजूनही सुरू असेल. हिवाळा हा जितका चांगला तितकाच वाईट कारण सोबत साथीचे अनेक आजार घेऊन येतो. यात अजून एक गोष्ट आहे जिच्या नियमित सेवनाने थंडीचा तितका त्रास होत नाही आणि ती म्हणजे तिळाची चटणी; बघूया याची रेसिपी.

साहित्य:

1 वाटी पांढरे तीळ

1/2 वाटी शेंगदाणे

1 चमचा जिरं

1 चमचा बडीशेप

10-12 लसूण पाकळ्या

चवीनुसार मीठ

1 चमचा लाल तिखट

कृती:

तीळ कढई किंवा पॅन मध्ये भाजून घ्या. तीळ भाजतांना हाथाने पाण्याचा थोडासा शिपका मारा. म्हणजे तीळ छान खमंग भाजले जातील. तीळ छान भाजले की एका ताटात काढून घ्या.

नंतर त्याच कढई मध्ये शेंगदाणे, जिरं आणि बडीशेप सुद्धा भाजून घ्या.

भाजेलेलं साहित्य एका ताटात घेऊन थंड करून घ्या. साहित्य थंड झालं कि मिक्सर च्या भांड्यात भाजेलेले तीळ, शेंगदाणे, जिरं आणि बडीशेप घ्या. लसूण ऍड करा.

चवीनुसार मीठ घाला. लाल तिखट घाला. आणि मिक्सरला सर्व साहित्य भरड सारखं वाटून घ्या.

आपली खमंग तिळाची चटणी तयात आहे. ही चटणी वरण भात, चपाती किंवा भाकरी सोबत सर्व्ह करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

‘टीईटी’त १० टक्केच उमेदवार उत्तीर्ण! एका गुणाने नापास झालेल्या उमेदवारांची महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे ‘ही’ मागणी; पुढची ‘टीईटी’ जूनमध्ये, वाचा...

Weekly Love Horoscope Marathi: या आठवड्यात कोणाची लव्ह लाईफ चमकणार? जाणून घ्या साप्ताहिक राशिभविष्य

आजचे राशिभविष्य - 19 जानेवारी 2026

इन्कम टॅक्स रिटर्न भरणे होणार सोपे

Lauki Cheela Recipe: डोसा विसराल! नाश्त्याला भोपळ्याचा असा चिला बनवा अन् खा की चव कायम लक्षात राहील

SCROLL FOR NEXT