Veg-Cutlet 
फूड

आजची रेसिपी : व्हेज कटलेट

सकाळवृत्तसेवा

साहित्य - १ शिजलेला बटाटा, १/२ कप मटार, १/४ कप गाजराचे तुकडे, १/४ कप फरसबीचे तुकडे, १ छोटा कांदा, १ टे. स्पून लसूण पेस्ट, ५ टे. स्पून चणा पीठ, ६-७ हिरव्या मिरच्या किंवा चवीनुसार लाल तिखट, १ टी स्पून गरम मसाला, १ टी स्पून चाट मसाला, १ टी स्पून आमचूर पावडर, १/२ कप बारीक चिरलेली कोथिंबीर, १/४ कप भाजलेला रवा, तेल, मीठ.

कृती -
१) मटार, गाजर, फरसबीचे तुकडे थोडे मीठ घालून वाफवून घ्यावेत. सर्व भाज्या चाळणीत काढून ठेवाव्यात जेणेकरून त्यातील अधिकचे पाणी निघून जाईल.
२) नॉनस्टीक फ्राईंग पॅनमध्ये १ चमचा तेल गरम करून त्यात आले-लसूण पेस्ट आणि मिरच्या बारीक करून फोडणी करावी. त्यात बारीक चिरलेला कांदा परतून घ्यावा. कांदा परतला की त्यात चण्याचे पीठ घालावे, पीठ खमंग भाजून घ्यावे.
३) एका भांड्यात शिजलेला बटाटा किसून घ्यावा. त्यात सर्व वाफवलेल्या भाज्या, गरम मसाला, आमचूर पावडर, चाट मसाला, कोथिंबीर, मीठ आणि भाजलेले चणा पीठ घालून एकत्र करावे. चणा पिठामुळे घट्टपणा येतो. पण कधी कधी बटाटा आणि इतर भाज्यांतील पाण्यामुळे जरा ओलसरपणा येण्याची शक्यता असते. तेव्हा गरज वाटल्यास ब्रेड घालावा.
४) मिश्रणाचे साहित्य भाग करून त्याला हाताने किंवा साच्याने आकार द्यावा. नॉनस्टीक फ्राईंग पॅनमध्ये थोडेसे तेल गरम करत ठेवावे. कटलेटला भाजलेला रवा दोन्ही बाजूने लावून घ्यावा. मध्यम आचेवर दोन्ही बाजूने गोल्डन ब्राऊन भाजून घ्यावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Crisis: देशहितासाठी त्याग! ६ महिने सिलेंडरला पूर्ण ‘नकार’; महाराष्ट्रातील गावांचा मोठा निर्णय, LPG वापर बंद राहणार

Ambarnath इंधन तुटवड्याच्या अफवेमुळं टाकी फुल्ल केली, दुचाकी पेटली; घटनेचा VIDEO VIRAL

जिद्द आणि कष्टाला वर्दीचा सलाम! नारोडीची लेक ऋतुजा हुले महाराष्ट्र पोलीस दलात; ग्रामीण भागातील तरुणीची स्वप्नपूर्ती

3000 रिक्षांची चाके थांबली! गॅस तुटवड्यामुळे पंपाबाहेर रिक्षांच्या रांगा; ‘एलपीजी’चे दर 32 रुपयांनी वाढले, ‘या’ शहरात रिक्षा प्रवास 10 रुपयांनी महागला

पुणेकरांनो, इंधन तुटवडा नाही, गर्दी करू नका! पेट्रोल डीलर्स असोसिएशनचं आवाहन; राज्य सरकारनेही खरेदीबाबत दिले मोठे अपडेट

SCROLL FOR NEXT