मेदू वडा 
फूड

क्रिस्पी मेदू वडा घरी बनवायचा? मग 'या' ट्रिक्सचा करा वापर

सकाळ डिजिटल टीम

औरंगाबाद : सकाळच्या नाष्ट्यात बरेच जण मेदू वडा खातात. पण नेहमी लोकांची तक्रार असते की मेदू वडा व्यवस्थित बनलेला नाही. अनेकांना वाटत असेल की क्रिस्पी आणि स्पंजी मेदू वडा बनवण्यासाठी खूप मेहनत लागत असते. मात्र असे काही नाही. तुम्ही काही गोष्टींकडे काळजीपूर्वक लक्ष दिल्यास घरीच मस्त मेदू वडा बनवला जाऊ शकतो. फक्त पाककृतीच पाहू नका, तर असे काही ट्रिक्स आहेत, त्यांचा अवलंब करा आणि बनवा क्रिस्पी आणि स्पंजी मेदू वडा...

१.मेदू वडाचे पीठ कसे तयार करावे?

जेव्हा तुम्ही मेदू वडाचे पीठ बनवता त्यावेळी उडद डाळाबरोबर इतर सामग्री बारीक करुन घ्या. जेव्हा बारीक कराल तेव्हा त्यात एक कप पाणी टाकून पुन्हा मिक्सरमध्ये बारीक करुन घ्या. याने पेस्ट व्यवस्थित तयार होईल. पेस्ट आता एका भांड्यात काढून घ्या आणि त्यात योग्य प्रमाणात पाणी मिक्स करा. पेस्ट चांगल्या प्रकार एकजीव करा. त्यामुळे मेदू वडा आतून साॅफ्ट होईल.

२.मेदू वड्याला चांगला आकार देण्याची पद्धत

मेदू वड्याची पेस्ट खूपच पातळ असते. त्यामुळे बऱ्याच जणांना हाताने आकार देणे शक्य होत नाही. जर तुम्हालाही असा अनुभव येत असेल तर वडा बनवताना आपल्या हाताला पाणी लावून घ्या आणि बोटांनी त्यास गोलाकार द्या. त्यानंतर गरम तेलात तळण्यासाठी वडे सोडा. पाण्याचा वापर केल्याने ते हाताला चिकटणार नाही.

क्रिस्पी आणि स्पंजी मेदू वडा सहज बनवता येतो.

३.मेदू वड्याला क्रंची बनवण्याची पद्धत

-क्रिस्पी आणि क्रंची वड्याचा आनंद घ्यायला कोणाला आवडणार नाही? ते क्रंची बनवण्यासाठी एक ट्रिकचा वापर तुम्ही करु शकता. त्यासाठी जेव्हा पॅनमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवता. लगेच मेदू वडा तळण्यासाठी त्यात सोडू नका. उलट तेल गरम होऊ द्या. त्यासाठी गॅस मोठा ठेवा. जेव्हा तुम्ही मेदू वडा सोडाला, त्यानंतर २ मिनिटानंतर गॅस कमी करा. आता चांगल्या प्रकारे तळून घ्या. दोन्ही बाजूने वडा चांगले तळल्यानंतर प्लेटमध्ये काढून घ्या. प्लेटवर टिश्यू पेपर किंवा ब्लोटिंग पेपरचा वापर करा. त्याने जास्त तेल शोषून घेतले जाईल.

४.ट्रिक्सबरोबरच या गोष्टींकडे लक्ष द्या

- मेदू वड्यासाठी पेस्ट तयार करत असाल तर पाण्याचे प्रमाण आवश्यकतेनुसार हळूहळू आणि थोडे-थोडे मिक्स करा. त्यात शेवटी मीठ मिक्स करा. कारण मीठ पाणी सोडते.

- मेदू वडा तळण्यासाठी वापरलेल्या तेलाचा पुन्हा वापर करु नका. कारण ते आरोग्यासाठी हानिकारक असते. त्याबरोबरच ते तुमच्या डिशचा रंग आणि चव दोन्ही बिघडवून टाकेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kagal Traffic Relief Project : पुणे -बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर अडीच किमीचा पिलर फ्लायओव्हर, कागल लक्ष्मी टेकडीचे ट्राफिक कायमचे होणार कमी

Numerology : 'या' 3 मुलांकाच्या लोकांना नसतो सरकारी नोकरीचा योग; तयारीत घालवतात अनेक वर्षे, पण खाजगी क्षेत्रात मिळतं मोठं यश

Bihar CM: राजकारणात मोठी घडामोड! बिहारचे नवे मुख्यमंत्री कोण? निर्णय आता शिवराज चौहान यांच्या हाती, भाजपचा गेमचेंजर प्लॅन तयार

Ambadas Danve News: रक्ताने माखलेला शर्ट, दानवेंनी वाचवला एका व्यक्तीचा जीव...

IPL 2026, LSG vs GT: प्रसिद्ध कृष्णाचा तिखट माऱ्याने लखनौची फलंदाजी गडबडली; गिलच्या गुजरातसमोर सोपं लक्ष्य

SCROLL FOR NEXT