matar kachori sakal
फूड

Recipe: रविवारी ट्राय करा टेस्टी अन् खुसखुशीत मटर कचोरी

मटर कचोरी कशी करायची, याविषयी आपण जाणून घेणार आहोत.

सकाळ डिजिटल टीम

रविवारी खायला काहीतरी स्पेशिअल करावं, असं प्रत्येकाला वाटतं. मग काही तरी टेस्टी आणि खमंग असं काय करावं, असा प्रश्न पडतो. आज आम्ही तुम्हाला अशीच एक हटके रेसिपी सांगणार आहोत. मटर कचोरी कशी करायची, याविषयी आपण जाणून घेणार आहोत. (try tasty matar kachori check here recipe )

साहित्य

  • मैदा

  • कप तेल

  • तेल

  • हळद

  • मीठ

  • हिंग

  • लाल तिखट

  • हिरवी पेस्ट

  • हिरव्या मिरच्या

  • कोथिंबीर

  • कढीपत्ता पाने

  • टीस्पून जिरेपूड

  • हिरवे मटार

  • टीस्पून आमचूर पाउडर

  • चवीपुरते मीठ

कृती:

  • पाणी ना घालता मटार मिक्ससवर बारीक करावे. अगदी किंचित भरड ठेवावे.

  • मिरच्या, कढीपत्ता आणि कोथिंबीर पाणी ना घालता मिक्सरमध्ये बारीक वाटावी.

  • तेलात हळद, हिंग, लाल तिखट घालून फोडणी करावी त्यात मिरची कोथिंबीर कढीपत्ता पेस्ट घालावी. त्यात मीठ आणि जिरेपूड आणि आमचूर पावडर घालावी.

  • या मिश्रणाच्या १० ते १२ गोळ्या कराव्यात.

  • दुसरीकडे मैद्यामध्ये मीठ आणि तेलाचे थंड मोहन घालून एकत्र करावे त्यात थोडे पाणी घालून घट्टसर मळून घ्यावे आणि झाकून ठेवा.

  • मैद्याचे मळलेले पीठ एकदा परत मळून घ्यावे. छोटे गोळे करावे. प्रत्येक गोळयाची जाडसर पुरी लाटा आणि त्याच मिश्रणाचा एका गोळा ठेवावा.

  • सर्व बाजू बंद करून गोल कचोरी बनवावी. ही कचोरी परत एकदा लाटावी. जाडसरच लाटावी.

  • तेल गरम करून मग कमी आचेवर तळून घ्यावी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cyclone Monthha : चक्रीवादळ ‘मोंथा’ धडकणार! ‘या’ राज्यांना सतर्कतेचा इशारा; लष्करी तुकड्याही 'अलर्ट मोड'वर

Bacchu Kadu: मंगळवारी नागपुरात महाएल्गार मोर्चा; मुख्यमंत्र्यांची कोंडी करण्याचा बच्चू कडू यांचा प्रयत्न

Daily Walking Health: रोज चालण्याने 'हे' 5 आजार होणार छूमंतर, पोषणतज्ज्ञ सोनिया नारंग यांचा खास व्हिडिओ पाहा

Latest Marathi News Live Update : महिला डॉक्टर प्रकरणी पारदर्शक एसआयटीची मागणी; "महाराष्ट्राच्या लेकीला न्याय मिळालाच पाहिजे" – सुप्रिया सुळे

Pro Kabaddi 12: यू मुंबावर पटना पायरेट्सचा दणदणीत! आता एलिमिनेटर १ मध्ये जयपूर पिंक पँथर्सला भिडणार

SCROLL FOR NEXT