Use these simple tips for early cooking potatoes tips food marathi news
Use these simple tips for early cooking potatoes tips food marathi news 
फूड

Easy Kitchen Hacks : बटाटे लवकर शिजवायचे आहेत वापरा या सोप्या टिप्स

अर्चना बनगे

कोल्हापूर:  बटाट्याचा उपयोग मोठ्या प्रमाणात केला जातो. बटाट्याची भाजी पासून पराठे, पकोडे एवढेच नव्हे तर त्यापासून अनेक अनेक पदार्थ तयार केले जातात. जर बटाटे पहिलाच उकडले असतील तर पदार्थ बनवणे सहज सोपे होऊन जाते. एवढेच नव्हे तर अनेक वेळा सकाळी लवकर मुलांना जेवणाचा डबा करून द्यायचा असतो, अशावेळी काहीतरी स्वादिष्ट आणि शरीराला पोषक असे पदार्थ करून द्यायचे असतील तर बटाटा अत्यंत उपयुक्त ठरतो.बटाटे शिजण्यासाठी साधारणपणे 10 ते 15 मिनिटे लागतात. परंतु  पाच मिनिटात जर तुम्हाला बटाटे शिजवून पाहिजे असतील तर या ठिकाणी तुम्हाला अत्यंत सोप्या पद्धती आम्ही सांगू इच्छितो.

बटाटे कापून शिजवण्यासाठी ठेवा
बऱ्याच घरामध्ये बटाट्याला चांगल्या पाण्यामध्ये धुऊन त्याच्या सालीसहित ते कुकरमध्ये शिजवण्यासाठी घातले जातात या प्रकाराने बटाटे शिजतात परंतु त्यासाठी थोडा जास्त वेळ लागतो. जर तुम्ही बटाटे दोन तुकड्यांमध्ये कापून ते कुकरमध्ये शिजवण्यासाठी ठेवला तर ते लवकर शिजतात.  बटाटे कुकर मध्ये फुटू नयेत असे वाटत असेल तर अर्धा चमचा मीठ आपण त्या मध्ये घालू शकतो. असे केल्यामुळे कुकरच्या एका शिट्टी  मध्येच बटाटे शिजतील व ते फुटणार नाहीत. अशा पद्धतीने उकळलेले बटाटे आपण भाजी बनवण्यासाठी किंवा सालड मध्ये वापरण्यासाठी घेऊ शकतो.

बटाट्याचे तुकडे करून शिजवून घ्या
 जर तुम्हाला बटाट्याचे तुकडे करून कोणताही पदार्थ तयार करायचा असेल तर बटाटे शिजवण्या पूर्वी त्याला चांगल्या पाण्याने धुऊन घ्या आणि त्याचे छोटे छोटे तुकडे करा. चौकोन आकारात हे छोटे तुकडे करा या तुकड्यांना चाकू च्या मदतीने थोडे कट करून घ्या असे केल्यामुळे बटाटे लवकर शिजतात.

गरम पाण्यात भिजवून बटाटे शिजवा
 जर तुम्हाला शिजवलेले बटाटे एक किंवा दोन दिवस ठेवायचे असतील तर ते साली सकट उकडणे आवश्यक आहे. अशावेळी तुम्ही लवकर बटाटे शिजण्यासाठी दोन ते तीन मिनिटे त्याला गरम पाण्यामध्ये ठेवू शकता. गरम पाण्यात एक चमचा पांढरे मीठ घाला. तुम्ही चाकूच्या मदतीने त्याला थोडे किसू शकता. त्यानंतर कुकरमध्ये हे बटाटे तीन ते चार मिनिटातच शिजतील.

पाण्याविना शिजवा बटाटे 
जर तुम्हाला पाण्याशिवाय बटाटे शिजवायचे असतील तर त्यासाठी कुकरला खाली तळामध्ये देशी तूप लावा. बटाटे स्वच्छ पाण्यामध्ये धुऊन घेऊन ते कूकरमधे ठेवा. त्यानंतर एक चांगले कापड पाण्यामध्ये भिजवा व ते बटाट्यावर झाका. आता कुकर बंद करून दोन मिनिटांसाठी गॅस वर ठेवा. कुकरची हलकी शिट्टी चा आवाज आल्यानंतर गॅस कमी करा. त्यानंतर तीन ते चार मिनिटांनी पुन्हा गॅसवर ठेवा. या पद्धतीसाठी शक्यतो बटाटे हे लहान आकाराचे घ्यावे. त्यामुळे बटाटे लवकर शिजतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde : जागावाटपाच्या ‘तिढ्या’वर चर्चा ; कोल्हापूर दाैऱ्यात शिंदेंच्या भेटीगाठी

Fact Check: उद्धव ठाकरेंना काँग्रेस कार्यकर्ते बोलू देत नसल्याचा दावा खोटा; प्रचार सभेतील अर्धवट व्हिडिओ व्हायरल

काँग्रेसला मोठा धक्का! दिल्ली काँग्रेस प्रदेशाध्यक्षाने दिला पदाचा राजीनामा, सांगितलं कारण

IPL 2024: राजस्थानची प्लेऑफच्या दिशेने घौडदौड, तर मुंबईच्या अडचणी वाढल्या; जाणून घ्या पाँइंट्स - टेबलची स्थिती

Latest Marathi News Live Update : मनोज जरांगे मोदींपेक्षा मोठे नेते, छगन भुजबळांचा टोला

SCROLL FOR NEXT