Want something new to eat at the sweet Nagpur news 
फूड

स्वीटमध्ये काही नवीन खायचंय? तर घरीच तयार करा गव्हाचा हलवा

सकाळ डिजिटल टीम

नागपूर : तुम्हाला गोड खायला आवडते? तुम्ही नेहमी गोड खाण्यासाठी कारणे शोधत असतात. कधीही, कुठेही गोड पदार्थ दिसल्यास तुम्ही खाणे टाळू शकत नाही. नवीन नवीन पदार्थ खायला आवडत असेल तर ही बातमी फक्त आणि फक्त तुमच्यासाठीच आहे. कारण, आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहे एक नवीन गोड पदार्थ. या पदार्थाचं नाव आहे गव्हाचा हलवा...

तुम्हाला गोडामध्ये काहीतरी नवीन करून पहायचे असेल तर गव्हाचा हलवा तयार करून बघा. गव्हाचा हलवा चवदारच नाही तर खूप फायदेशीरही आहे. वास्तविक हा हलवा गव्हाच्या दुधापासून तयार केला जातो. यासाठी जास्त नाही पण मेहनत मात्र नक्की घ्यावी लागेल. एकदा तुम्ही हा हलवा खाल्ला की पुन्हा पुन्हा हा हलवा खाण्याची तुमची इच्छा होईल. चला तर जाणून घेऊया बनवण्याची पद्धत...

लागणारी सामग्री

दहा काजू, पाच बदाम, एक मोठी वाटी तूप, सहा ते सात वेलची, एक कप साखर व एक कप गहू.

अशी करा तयार

सर्वांत अगोदर रात्री गहू भिजू घाला. सकाळी हे गहू चांगले धुवा आणि मिक्सरच्या भांड्यात ठेवा. त्यात थोडं पाणी टाकून बारीक करून घ्या. आता एका भांड्यात गहू चाळून घ्या. आता गव्हाचे जाड धान्य शिल्लक राहील. हे पुन्हा बारीक करा आणि पेस्ट चाळून घ्या. आता गव्हाच्या दुधातून सालट काढून टाका आणि दुधापासून हलवा तयार करा.

आता गॅसवर हलक गरम करा. गरम झाल्यावर त्यात एक चमचा तूप टाका आणि चिरलेली काजू आणि बदाम हलके तळा. आता ते प्लेट मध्ये काढून त्याच कढईत एक चमचा तूप आणि साखर टाकून सतत ढवळून घ्या. जेव्हा साखर हलकी सोनेरी तपकिरी होईल तेव्हा गॅस बंद करा. आता त्यात अर्धा ग्लास पाणी टाका. आता गॅस चालू ठेवा आणि सतत ढवळत राहा. असे केल्याने पाणी आणि साखर व्यवस्थित मिसळेल.

ते चांगले मिसळले की हळुहळू त्यात गव्हाचे दूध टाका. गॅसची ज्योत घ्या आणि सतत ढवळत रहा. आता हलव्याला हलवा आणि तूप टाकत रहा. हलव्यात तूप चांगले मिसळून घ्या. हलव्यात तूप तोपर्यंत घालत रहा जोपर्यंत तूप हलव्यापासून पूर्णपणे वेगळे होत नाही. जेव्हा हलवा कढई सोडायला लागल्यावर त्यात काजू आणि बदाम मिक्स करा. त्याचवेळी बारीक केलेली वेलची मिक्स करा. आता तुमचा गव्हाचा हलवा तयार झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd Test: जसप्रीत बुमराहच्या ५ विकेट्सने दिले हादरे! कपिल देवसह अनेकांचे विक्रम मोडले; पण इंग्लंडचे शेपूट पुन्हा वळवळले

Power of Simple Living and Discipline : साधं राहणीमान अन् बचतीच्या जोरावर ४५व्या वर्षी निवृत्तीपर्यंत जमवले ४.७ कोटी; जाणून घ्या कसे?

Latest Marathi News Updates: खडकवासला धरण परिसरात प्रेमी युगलाने दिला जीव

मॅरेज मटेरियल असतात या राशीच्या व्यक्ती ; लग्नानंतर उजळेल जोडीदाराचं भाग्य, संसारही होईल सुखाचा

Video: प्रेमाची तालिबानी शिक्षा! काकाच्या मुलीवर प्रेम जडलं; रागात गावकऱ्यांनी प्रेमीयुगुलांना नांगराला जुंपलं, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT