Healthy food tips for weekend travel 2025  Sakal
फूड

Weekend Travel Food Tips: वीकेंड ट्रिपचा आनंद वाढवा, 'या' आरोग्यदायी पदार्थांसह करा प्रवास

Healthy Food Tips For Weekend Travel 2025: लाँग वीकेंडला फिरायला जाताना तुम्हाला जास्त दिवस टिकणारे पदार्थ सोबत ठेवायचे असेल तर पुढील पदार्थांचा समावेश करू शकता.

पुजा बोनकिले

  1. वीकेंड ट्रिपसाठी पौष्टिक पदार्थ जैसे ड्राय फ्रूट्स, ओट्स आणि फळे सोबत घेऊन निरोगी राहा.

  2. हलके आणि पचायला सोपे पदार्थ जैसे सँडविच, सलाड आणि दही निवडा, जेणेकरून प्रवासात ताजेपणा राहील.

  3. पाण्याची बाटली आणि हायड्रेटिंग स्नॅक्स सोबत ठेवा, जेणेकरून प्रवासात ऊर्जा आणि उत्साह टिकेल.

Weekend Travel Food Tips: स्वातंत्र्यदिनाचा उत्साह संपुर्ण देशात दिसून येत आहे. यंदा 15 ते 17 ऑगस्ट असा लाँग वीकेंड आला आहे. यामुळे अनेकांनी फिरायला जाण्याचे नियोजन केले आहेत. पण प्रवासात बाहेरचे पदार्थ खाऊन आजारी पडायचे नसेल तर घरगुती पदार्थ सोबत ठेवावे. पण कोणते पदार्थ सोबत ठेवावे हा प्रश्न अनेकांना पडतो. प्रवासात अनेक पदार्थ लवकर खराब होतात. यामुळे प्रवासात आरोग्यदायी आणि खराब न होणारे कोणते पदार्थ सोबत ठेवावे हे जाणून घेऊया.

सुकामेवा

लाँग वींकेडला फिरायला जाताना बॅगमध्ये सुकामेवा ठेऊ शकता. हे आरोग्यादायी असते. यामध्ये काजू , बदाम, अकरोट, किशमिश, पिस्ता यांचा समावेश होतो.

कोरडी भाजी

कोरडी भाजी किंवा नमकिन जास्त दिवस टिकतात. यामुळे लाँग वीकेंड ट्रीपला जातांना चीवडा, शेव, घरगुती चिप्स, मुरमुरे यासारखे पदार्थ सोबत ठेऊ शकता.

भडंग

फिरायला गेल्यावर प्रवासात लागलेली छोटीशी भूक भागवण्यासाठी भडंग खाऊ शकता. तुम्ही मुरमुऱ्याचा चिवडाही सोबत ठेऊ शकता. यामुळे जीभेची चव देखील वाढेल.

थेपला

प्रवास करताना थेपले सोबत ठेवणे हा एक उत्तम पर्याय आहे. तसेत थेपले आठवडाभर चांगले राहतात. तुम्ही हवा बंद डब्ब्यात पॅक करून ठेऊ शकता. थेपले चवदार असून आरोग्यदायी देखील आहे.

कणिक बिस्कीट

प्रवासात बाहेरचे पदार्थ खाल्ल्यापेक्षा घरीच बनवलेले पदार्थ घेऊन जाणे आरोग्यदायी ठरते. तुम्ही चहासोबत कणिक बिस्कीट खाऊ शकता. हे घरीच बनवणे सोपे आहे. तसेच हे बिस्कीट आठवडाभर चांगले राहतात.

शेंगदाणा चिक्की आणि लाडू

शेंगदाणा चिक्की आणि लाडू खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. यामध्ये अनेक पोषक घटक असतात. तसेच शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढते. यामुळे प्रवासात शेंगदाणा चिक्की आणि लाडू सोबत ठेवावे.

वीकेंड ट्रिपसाठी कोणते पदार्थ सोबत घ्यावेत?

ड्राय फ्रूट्स, ओट्स, फळे, सँडविच, सलाड आणि दही यांसारखे हलके, पौष्टिक पदार्थ घ्यावेत.

प्रवासात आरोग्य राखण्यासाठी कोणते पदार्थ टाळावेत?

तेलकट, जड आणि लवकर खराब होणारे पदार्थ जैसे तळलेले स्नॅक्स आणि जंक फूड टाळावेत.

वीकेंड ट्रिपसाठी पाण्याचे महत्त्व काय आहे?

पाणी आणि हायड्रेटिंग स्नॅक्स घेतल्याने डिहायड्रेशन टाळता येते आणि प्रवासात ताजेपणा राहतो.

प्रवासात पदार्थ ताजे कसे ठेवावेत?

एअरटाइट डबे, कूलर बॅग आणि बर्फाचे पॅक वापरून पदार्थ ताजे आणि सुरक्षित ठेवा.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kapil Dev on stray dog protection: भटक्या कुत्र्यांच्या संरक्षणासाठी आता कपिल देवही मैदानात; अधिकाऱ्यांना केलं 'हे' आवाहन!

Operation Sindoor मधील शूरवीरांचा सन्मान! १६ BSF सैनिकांना शौर्य पुरस्कार, पाहा संपूर्ण यादी अन् 'या' योद्ध्यांचा शौर्यसंग्राम

Virat Kohli - Rohit Sharma यांचं वनडेतील करियरही संपलं म्हणणाऱ्यांना सुरेश रैनाची चपराक; म्हणाला, ते महत्वाचे आहेत कारण...

Imtiaz Jaleel mutton chicken party: स्वातंत्र्यदिनी जलील यांच्या घरी होणार मटण-चिकन पार्टी; आयुक्तांसह थेट मुख्यमंत्र्यांना निमंत्रण!

Latest Marathi News Updates: सिंहगडावरील ध्वजस्तंभाची वन विभागाकडून तातडीने दुरुस्ती

SCROLL FOR NEXT