मूग रेसीपी 
फूड

Weight Loss साठी ट्राय करा मूगाच्या 'या' रेसीपी

सकाळ डिजिटल टीम

वजन कमी करण्यासाठी मूग हे कडधान्य खूप महत्वाचे मानले जाते. मूगामध्ये शरीराला आवश्यक असणारी अनेक घटके असतात. यात व्हिटॅमिन A,B तसेच लोह, कॅल्शिअम, फॉस्फरस असतात. कफ, पित्तासाठी मूग हे फायद्याचे असते. पण जर घरात तीच ती भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर मूगाच्या काही वेगळ्या रेसिपीज नक्की ट्राय करु शकता. शिवाय डायटमध्ये मूगाचा समावेश करु शकतो. यासाठी काही रेसीपीज तुम्हाला सांगणार आहोत याचा तुला नक्कीच फायदा होईल.

मूगाचा डोसा

आपण नेहमी तांदळाच्या पिठाचे डोशे बनवतो. यात तुम्ही मूगाचा वापर करून डोसे बनवू शकता. यामुळे वजन ही नियंत्रणात राहीलआणि खाण्याच आनंदही घेता येईल. तुम्ही कच्चे मूग ही खाऊ शकता.

साहित्य: हिरव्या सालीच्या मुगाची डाळ किंवा भिजवलेले मूग, लसणाच्या पाकळ्या, मीठ, सर्व्ह करण्यासाठी चटणी

कृती: मूगाची डाळ किंवा मूग साधारण चार तास तरी भिजवा. त्यानंतर एका मिक्सरचे भांडे घेऊन त्यामध्ये मूगाची डाळ/ मूग घालून त्यामध्ये लसणीच्या पाकळ्या आणि मीठ घाला. वाटण डोशाच्या पिठासारखे वाटून घ्या. आता एक पॅन घेऊन त्यामध्ये डोसे बनवायला घ्या. कमीत कमी तेलामध्ये हे डोशे तयार होतात. तुम्ही याचे कुरकुरीत डोसेही बनवू शकता. याबरोबर तुम्ही नारळाची चटणी खाऊ शकतो.

मूग चटपटा

संध्याकाळी जेव्हा भूक लागते तेव्हा चटपटीत खावेसे वाटते. पाणीपुरी, पिझ्झा, वडा खायची इच्छा होते अशावेळी पण वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी घरीच मूगाचे चाट म्हणजेच मूग चटपटा करु शकता. ज्याने तुमचे पोट ही भरेल आणि वजन ही नियंत्रणात राहेल.

साहित्य: उकडलेले मूग, चाट मसाला, बारीक चिरलेला कांदा,टोमॅटो, आमचूर पावडर, डाळिंबाचे दाणे, बारीक शेव

कृती: उकडलेले मूग तव्यावर थोडे रोस्ट करुन घ्या. त्यामध्ये चाट मसाला घाला. थोडे थंड झाल्यावर त्यामध्ये कांदा, टोमॅटो आणि आमचूर पावडर घाला.वरुन डाळिंबाचे दाणे, शेव घाला. जर तुम्हाला तिखट आवडत असेल तर तुम्ही त्यामध्ये बारीक चिरलेली मिरची घालू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 GT vs RR : १२ चेंडूंत ४ विकेट्स! रवी बिश्नोई, तुषार देशपांडेने गुजरातचा विजयाचा घास पळवला; राजस्थान Point Table मध्ये टॉपर

Strait of Hormuz: ''होर्मुजची सामुद्रधुनी खुली करण्यासाठी ४८ तासांचा अल्टिमेटम, नाहीतर भीषण परिणाम...'' थेट इशारा

Solapur Awareness Ride: मंगळवेढ्यात महात्मा बसवेश्वर आंतरराष्ट्रीय स्मारकासाठी जन्मभूमी ते कर्मभूमी सायकल यात्रा; जनजागृती उपक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद

विहीर रस्त्याच्या मधोमध, कठडा मोठा असता तर दुर्घटना टळली असती; CM फडणवीसांनी दुर्घटनेवर व्यक्त केलं दु:ख

विद्यार्थिनींसाठी आनंदाची बातमी! आता मुलींना दरमहा ५०० रुपयांची शिष्यवृत्ती मिळणार, पण कोणाला? जाणून घ्या...

SCROLL FOR NEXT