Narali Pak Recipe Sakal
फूड

World Coconut Day 2023 : ओल्या नारळाच्या वडीची रेसिपी, घरच्या घरी तयार करा ही स्वीट डिश

घरच्या घरी झटपट नारळी पाकाची रेसिपी (Naral Vadi/Narali Pak Recipe) कशी तयार करावी, जाणून घ्या पाककृती.

Harshada Shirsekar

आपल्या देशाला शेकडो वर्षांपूर्वीची खाद्यसंस्कृती लाभली आहे. येथे वेगवेगळ्या प्रकारच्या खाद्यपदार्थांची चव खवय्यांना चाखायला मिळते. काही खवय्यांना तर जेवणासोबत तसंच जेवणानंतरही स्वीट डिश खाण्याची सवय असते. काहींना मिठाईच्या दुकानातील तर काहींना घरगुती मिठाई खायला आवडते, पण ताटात गोड पदार्थ असायलाच हवा.  

या लेखाच्या माध्यमातून आपण एका स्वीट डिशची साधीसोपी रेसिपी जाणून घेणार आहोत. कोकोनट बर्फी (Coconut barfi), नारळाची वडी (Naralachi Vadi), नारळीपाक (Naralipak) अशा नावांनी हा गोड पदार्थ प्रसिद्ध आहे.  ओल्या खोबऱ्यापासून तयार केल्या जाणाऱ्या नारळाच्या वडीची पाककृती जाणून घेऊया सविस्तर… 

सामग्री : 

  • किसलेले ओले खोबर  - दोन वाट्या

  • वाटलेली साखर - एक वाटी  

  • वेलची पूड - अर्धा चमचा   

  • तूप - दोन चमचे

  • सुकामेव्याचे काप- आपल्या आवडीनुसार सुकामेव्याची निवड करावी. 

Coconut Barfi Recipe रेसिपी : कशी तयारी करावी नारळाची वडी?

  • एका भांड्यामध्ये तूप वितळवून घ्यावे.

  • वितळवलेल्या तुपामध्ये खोबरे परतवून घ्यावे.

  • भाजलेल्या खोबऱ्यामध्ये वाटलेले साखर मिक्स करावी.

  • वरील सामग्री नीट भाजून घेतल्यानंतर वेलचीपूड मिक्स करावी.

  • खोबऱ्याचा घट्ट गोळा तयार झाल्यानंतर गॅस बंद करावा.

  • यानंतर एका थाळीवर तूप लावावे. 

  • नारळाच्या वडीचे मिश्रण त्यावर पसरावे.

  • मिश्रणावर तुमच्या आवडीच्या सुकामेव्याचे कापही घालावेत.

  • यानंतर चौकोनी आकारामध्ये वड्या सुरीच्या मदतीने कापून घ्याव्यात.

  • तयार झाल्या आहेत नारळाच्या खमंग आणि स्वादिष्ट वड्या.

Content Credit Instagram @me_haay_foodie

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi to Goa flight emergency Landing: मोठी बातमी! दिल्ली ते गोवा विमानाचं मुंबईत इमर्जन्सी लँडिंग

High Court Bench : पुणे येथे उच्च न्यायालयाचे खंडपीठ सुरु करण्याची आमदार कुल यांची अधिवेशनात मागणी

Nimisha Priya: तूर्तास फाशी टळली, आता पुढे काय? जाणून घ्या नेमकं काय आहे येमेनमधील निमिषा प्रिया प्रकरण

Israel attacks Syria: इस्राईलकडून सीरियाच्या मंत्रालयावर हल्ला! लष्कराचे मुख्यालयही टार्गेट; हल्ल्याचं कारण केलं स्पष्ट

Mumbai Railway Station: स्थानकांवरील कामे तत्काळ पूर्ण करा, शिंदेसेना खासदारांचा रेल्वेला आंदोलनाचा इशारा

SCROLL FOR NEXT