Anant Chaturdashi
Anant Chaturdashi esakal
ganesh article

विसर्जनस्थळी गणेश आरतीस सक्त मनाई

गिरीश चव्हाण

सातारा : गणेशोत्‍सवाची (Ganeshotsav 2021) सांगता रविवारी अनंत चतुर्दशी (Anant Chaturdashi) दिवशी होत आहे. परंपरेप्रमाणे या दिवशी, तसेच गणेशोत्‍सवाच्‍या नवव्‍या दिवशी (ता. १८, ता. १९) साताऱ्यातील अनेक सार्वजनिक गणेश मंडळांच्‍या, तसेच घरगुती गणेशाच्‍या मूर्तीचे विसर्जन होते. विसर्जनासाठी पालिकेने कृत्रिम तलाव तयार केले असून, यासह इतर ठिकाणी होणारी गर्दी टाळण्‍यासाठी विसर्जनस्‍थळी आरतीस मनाईबरोबरच घरगुती मूर्तीसोबत फक्‍त दोघांना परवानगी असल्‍याची माहिती देणारे पत्रक सातारा पोलिसांनी जाहीर केले आहे.

गणेशोत्‍सवाची सांगता रविवारी अनंत चतुर्दशी (Anant Chaturdashi 2021) दिवशी होत आहे.

गणेशोत्‍सवाची सांगता रविवारी होत असून, शहरातील सार्वजनिक मंडळांच्‍या मूर्तींचे विसर्जन होत असते. अनेक मंडळे प्रथेप्रमाणे अनंत चतुर्दशीच्‍या आदल्‍या दिवशी गणेशमूर्तीचे विसर्जन करत असतात. विसर्जनासाठीची तयारी पालिकेने केली असून, अनेक भागांत कृत्रिम तलाव तयार करण्‍याबरोबरच कुंड देखील ठेवले आहेत. गणेश विसर्जनासाठी होणारी गर्दी टाळण्‍यासाठी पालिकेने या उपाययोजना राबविल्‍या असून, नागरिकांनी शक्‍यतो घरीच आरती करून मूर्ती आपल्‍या घराजवळील पालिकेच्‍या कुंडात विसर्जन करण्‍याचे आवाहनही पोलिसांनी केले आहे.

गणेशमूर्ती विसर्जनासाठी संगम माहुली येथेही नागरिकांची मोठी गर्दी होत असते. याठिकाणी पोलिसांनी ग्रामपंचायतीच्‍या मदतीने आवश्‍‍यक उपाययोजना उभारल्‍या असून, नागरिकांनी अनावश्‍‍यक वेळ, गर्दी टाळण्‍यासाठी घरीच गणेशाची आरती करण्‍याचे आवाहन करण्‍यात आले आहे. पालिकेने केलेले विसर्जन तलाव, तसेच इतर विसर्जन ठिकाणी आरती करण्‍यास मनाई कण्‍यात आली असून, घरगुती मूर्ती विसर्जनावेळी दोनपेक्षा जास्‍त लोकांनी विसर्जन स्‍थळी येऊ नये, असे आवाहनही सातारा शहर पोलिस ठाण्‍याचे निरीक्षक भगवान निंबाळकर यांनी केले आहे.

असे आहेत नियम...

  • मूर्ती द्यावी लागणार स्‍वयंसेवकाकडे

  • घरगुती मूर्तीसोबत दोनच व्‍यक्‍ती असाव्‍यात

  • माहुली येथील नदीपात्रात जाण्‍यास नागरिकांना बंदी

  • विसर्जन स्‍थळाजवळ वाहने थांबविण्‍यास मनाई

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha 2024: मतदान केंद्रांना नायलॉनच्या जाळ्यांचे कवच, 101 वाघ असलेल्या जंगलात असं पार पडणार वोटींग

Latest Marathi News Update: पुण्यात १० मे रोजी राज ठाकरेंची सभा; मोहोळ यांचा करणार प्रचार

ICC Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी भारत पाकिस्तानात जाणार? बीसीसीआयनं स्पष्टच सांगितलं

Viral Video: 'बाबा वारले,आई सोडून गेली..' रोल विकणाऱ्या १० वर्षांच्या मुलाची हिंमत पाहून भारावले आनंद महिंद्रा, केली मोठी घोषणा

Bomb Hoax in 16 Schools: मतदानादिवशी 16 शाळांना बॉम्बनं उडवून देण्याची धमकी! रशियातून आला ईमेल ? पोलिसांचं धाबं दणाणलं

SCROLL FOR NEXT