Ganapati
Ganapati esakal
Ganesh Chaturti Festival

गणपती बाप्पाची लीला न्यारी! एका वेगळ्या रुपात बाप्पाने जागविला आत्मविश्वास

सकाळ डिजिटल टीम

परिस्थिती माणसाला खुप काही शिकवते असे आपण ऐकले आहे. आपल्याला अशा अनेक व्यक्ती भेटतात ज्या आपल्याकडे जे काही आहे त्याचा त्यांना अभिमान असतो. परिस्थिती कितीही बिकट आली तरी ते धैर्याने त्याला सामोरे जातात. मात्र काही लोक असे कि ते एखाद संकट ओढवलं कि लगेच खचून जातात अन् आपल्या जिवनाला कोसतात. अशाच एका आत्मविश्वास खचलेल्या व्यक्तीला गणपती बाप्पाने एका वेगळ्या रुपात आणि वेगळ्या प्रकारे त्याच्यातील आत्मविश्वास जागा करुन परिस्थितीशी सामना करण्याची जाणिव करुन दिली होती.

अनेक वर्षांपुर्वी भारत वर्षात अचानक दुष्काळ आला होता. अगदी हिरवळ दिसेनासी झाली. शेतकरी मोठ्या विवंचनेत सापडले होते. शेतात पावसाअभावी काहीही पिकत नसल्याने खाण्यापुरतेही अन्न धान्य शिल्लक राहिले नव्हते. अशी दोन- तीन वर्षे लोटली आणि वरुण राजाचे आगमन झाले. मात्र त्यावर्षी वरुण राजा इतका बरसला कि मोठ्या उमेदीने बळीराजाने शेतात जे काही पिकवले होते त्या सर्वांची नासाडी झाली. आधिचा कोरडा दुष्काळ आणि उमेदीच्या काळात आलेला ओला दुष्काळ यामुळे सर्वत्र चिंतेच वातावरण निर्माण झालं होते. अशाच एका गावातील सधन असा शेतकरी या सर्व परिस्थितीतून जात होता. अनेक वर्षांची नापिकी अन् त्यातही जे पिकवल त्यावर फिरलेल पाणी यामुळे चिंतातून झालेला शेतकरी आता आत्महत्या करण्याच्या विचारात होता.

या शेतकऱ्याची ही सर्व परिस्थिती भगवान विष्णू आणि लक्ष्मी पाहात होते. लक्ष्मीने विष्णूंना सांगितले कि या शेतकऱ्याला धन संपत्ती देवून आपण त्याचा आत्महत्येचा विचार दुर करायला हवा. त्यावर विष्णू उत्तरले, कि ही उद्भवलेली परिस्थिती हा सृष्टीचक्राचा एक भाग आहे. त्यामुळे हे केवळ त्या एकट्याचे दुःख नसून त्याच्या सारख्या अनेकांवर ही परिस्थिती ओढावली आहे. त्यामुळे याला आपण कितीही धन दिले तरी अशी परिस्थिती भविष्यात ओढावल्यावर हा पुन्हा अस करणार नाही असे मानता येणार नाही. त्यामुळे तात्परती त्याची गरज भागवून चालणार नाही तर त्याला प्रबळ उपाय करणे गरजेचे आहे. यावर लक्ष्मीने प्रबळ उपाय म्हणजे काय असे विष्णूंना विचारले.

तेव्हा विष्णू म्हणाले कि धन, संपत्ती पैसा आपण मनुष्याला किती प्रमाणात द्यायचा ठरवला तरी तो त्याच्या प्रारब्ध कर्मानुसार त्याच्याकडे टिकतो त्यामुळे धन- संपत्ती देण्यापेक्षा आपण त्याला परिस्थितीशी सामना करण्याची जाणिव करुन दिली पाहीजे. मग हे कोण करेल असे लक्ष्मीने विचारताच, नारद मुनींनी 'पार्वतीपुत्र गणेश' असे उत्तर दिले. विष्णूंनीही त्याला होकार देत हा निरोप गणेशापर्यंत पोचवण्याची जबाबदारी नारदांवर सोपावली. नारदांनी तात्काळ गणेशाला भगवान विष्णूंचा हा निरोप दिला. आणि भगवान विष्णूंनी आपण लागलीच हे काम पुर्ण करावे असेही गणेशाला सांगितले. गणेशाने भगवान विष्णूंच्या आज्ञेला नम्रतापुर्वक वंदन केले आणि मी नक्कीच त्यांच्या आज्ञेचे पालक करेन असे नारद मुनींना सांगितले.

गणेशाने एका अत्यंत गरिब शेतकऱ्याचे रुप धारण केले. तो चिंताग्रस्त शेतकरी ज्या गावात राहत असे त्या गावात ते राहायला गेले. दररोज हा चिंताग्रस्त शेतकरी गणेशाच्या त्या रुपातील शेतकऱ्याकडे बघत विचार करत असे कि अत्यंत हालाखीच्या परिस्थितीत सुद्धा हा व्यक्ती सदैव हसतमुख कसा राहू शकतो. एके दिवशी त्यांची भेट घेवून त्यांच्याबद्दल चिंताग्रस्त शेकऱ्याने चौकशी केली. तेव्हा त्यांनी दुष्काळी परिस्थितीमुळे ही वेळ आपल्यावर ओढवल्याचे त्याला सांगितले. त्यावर हा शेतकरी म्हणाला कि तुमची इतकी दयनीय अवस्था झाली आहे तरीही तुम्ही इतके आनंदी कसे. मीही या परिस्थीतीतून जातो आहे. मी तर आता आत्महत्या करण्याच्या निर्णयावर येवून पोहोचलो आहे.

त्यावर शेतकरी रुपातील गणेश म्हणाले, दुष्काळ येण जाण हा सृष्टी चक्राचा एक भाग आहे. आणि याचे परिणाम हे केवळ तू किंवा मी भोगत नाहीये तर या जिवसृष्टीतील प्रत्येक जण भोगत आहे. आपण मनुष्य आहोत आपल्याकडे विचार करण्याची शक्ती आहे म्हणून आपण परिस्थिती बिकट म्हणून आत्महत्येचा पर्याय स्विकारतो. पण मग या पशू- पक्षांनी काय कराव किंबहूना ते काय करत असतील हा विचार मी सदैव करत असतो आणि म्हणून मी मिळालेल आयुष्य प्रत्येक दिवशी नव्याने जगण्यासाठी आनंदी असतो. आणि हे दिवस निघून पुन्हा सुगीचे दिवस परत येतील असा आत्मविश्वास माझ्या मनी कायम आहे म्हणून मी आनंदी आहे. शेतकरीरुपी गणेशाचे बोलणे त्या शेतऱ्याच्या अंतर्मनाला स्पर्श करुन गेले. घरी येवून तो विचार करू लागला कि मी आत्ता ज्याला भेटलो त्याची अवस्था माझ्यापेक्षा बिकट आहेत. मी आजही दोन वेळच पोटभर अन्न सेवन करतोय. कुटुंब माझ्या सोबत आहे, मी आत्महत्या केल्यास त्यांचे काय होईल याचा विचार मी कधीही केला नाही. मात्र आता नाही मी माझ्या कुटूंबासाठी नव्या उमेदीने जगेन. परिस्थिती कितीही बिकट आली, कितीही संकटे कोसळली तरी मी आता आत्महत्या करणार नाही अशी मनी बांधतो.

अशाप्रकारे गणेशाने आपल्यावर ओढावलेली परिस्थिती कितीही बिकट असली तरी खचून जावू नये, नेहमी आपल्यापेक्षा ज्यांच्याकडे कमी आहे त्यांच्याकडे बघावे अन् जिवनाचा खरा अर्थ समजून घ्यावा अशी जाणिव त्या शेतकऱ्याला करुन दिली. म्हणूच तर गणपती बाप्पाला 'तुच बद्धीदाता, तुच पाठीराखा' म्हटले जाते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akshaya Tritiya 2024 : आज सर्वत्र अक्षय तृतीयेचा उत्साह, जाणून घ्या शुभ मुहूर्त अन् महत्व

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 10 मे 2024

अग्रलेख : प्रचारासाठी दाहीदिशा...

Loksabha Election 2024 : ‘विरोधक’ आता एकाच व्यासपीठावर

Latest Marathi News Live Update : राज्यभर आज पूर्वमोसमी पावसाची शक्यता; नागपूर, भंडारा, गोंदियात गारपिटीचा इशारा

SCROLL FOR NEXT