Ganesh Utsav : बाप्पाला आवडणाऱ्या गव्हाच्या खीरीत 'हे' महत्वाचे घटक टाकताय ना? चव आणखी वाढेल

कधी कधी या गडबडीत या दोन्हींमधील एखादा पदार्थाचा बेत फसण्याची शक्यता असून चव बदलू शकते.
Ganesh Utsav 2022
Ganesh Utsav 2022
Summary

कधी कधी या गडबडीत या दोन्हींमधील एखादा पदार्थाचा बेत फसण्याची शक्यता असून चव बदलू शकते.

Ganesh Food Recipe : सध्या सर्वांना गणरायाच्या आगमणाचे वेध लागले आहेत. बाप्पाचे आगमण अवघ्या काही दिवसांवर आले असल्याने सर्वजण तयारीच्या गडबडीत दिसत आहेत. ३१ ऑगस्ट रोजी बाप्पाचे आगमण होणार असून त्याच्यासाठी आरास, प्रसाद, पूजा कशी करायची यासाठी मोठी तयारी सुरु आहे. (ganeshotsav history and culture) दरम्यान, या दिवसांत बाप्पाला खुश करण्यासाठी काही पदार्थ बनवले जातात. बाप्पाला त्याच्या आवडीचा गोडाचा नैवद्य दाखवला जातो. (gavhachi kheer kashi banvaychi)

गणरायाचे आवडते पदार्थ म्हणजे खीर आणि उकडीचे मोदक होय. सकाळी बाप्पाचे आगमण झाल्यापासून गृहीनींची या पदार्थांच्या तयारीची लगबग सुरु होते. त्यामुळे कधी कधी या गडबडीत या दोन्हींमधील एखादा पदार्थाचा बेत फसण्याची शक्यता असून चव बदलू शकते. (Ganesh Festival 2022) काहीजण गव्हाच्या या खीरीत साखरेचा वापरही करतात. परंतु त्यामुळे अस्सल चव मिळत नाही. (gavhach kheer kashi banvaychi dakhva)

Ganesh Utsav 2022
Ganeshotsav 2022 : इतर मिठाईंच्या तुलनेत मोदक आरोग्यदायी

ग्रामीण भागांसह काही ठिकणी गुळाचाही वापर केला जातो. मात्र अजून एक असा घटक आहे जो तुम्ही खीरीत घातल्यास तिची चव आणखी वाढते. (Ganesh Festival Special Dish) आज आम्ही तुम्हाला असे काही महत्वाचे घटक सांगणार आहोत ज्यामुळे तुमची खीर अजून रूचकर लागू शकते. हे घटक तुम्ही खीर करताना मिसळले तर त्याची चव दरवर्षीच्या खीरीपेक्षा उत्तम होईल. (gavhach kheer kashi banvayc recipe)

करड्याचं बी

करड्याचं बी हे तुम्हाला कोणत्याही किराण मालाच्या दुकाणात मिळू शकतं. आदल्या रात्री तुम्ही ५० ग्रॅम करड्याचं बी पाण्यात भिजत ठेवा. रात्रभर ते भिजल्यानंतर ज्यावेळी खीर करणार त्यावेळी या बीया आवश्यक तेवढ्या पाण्यासहित मिक्सरला बारीक करुन घ्या. यानंतर त्या वाटणाचे दुध काढून घ्या. गाळणीच्या सहय्याने ते मिश्रण एका भांड्यात गाळूण घ्या. या दुधामुळे तुमची खीर अधिक चविष्ट होईल.

साखरेऐवजी सेंद्रिय गुळाचा वापर करा

अनेकजण गव्हाच्या खीरीसाठी साखरेचा वापर करतात. मात्र यामध्ये म्हणावी तशी चव येत नाही. मात्र साखरेऐवजी गुळाचा वापर केल्यास तुम्हाला हवी ती चव मिळू शकते. यामध्ये तुम्ही सेंद्रिय गुळाचा वापर केल्यास उत्तमच. बहुंतांश वेळा तो गुळ काळा असतो मात्र त्याची चव निराळी लागते.

Ganesh Utsav 2022
Ganeshotsav 2022 : बाप्पाच्या नैवेद्यासाठी तयार करा गोड सूजीचा शिरा; सोपी रेसिपी ट्राय करा..

खोबऱ्याचे लहान काप

खीरीमध्ये ड्रायफ्रुट्स सहित खोबरे घातल्यास खीर अधिक रुचकर आणि चविष्ट लागते. यासाठी खोबऱ्याचे लहान पातळ काप करुन ते खीरीमध्ये टाका. उकळी येण्यापूर्वी थोडा कालावधी आधी टाकले तर त्याचा स्वाद आहे तसा लागेल.

खीरीसाठी लागणारे साहित्य -

  • खपली गहू - २०० ग्रॅम

  • गुळ - आवश्यकतेनुसार

  • बदाम

  • काजू

  • इतर ड्रायफ्रुट्स - आवश्यकतेनुसार

  • करड्याचं बी - ५० ग्रॅम

  • तुप - आवश्यकतेनुसार

  • ओले खोबरे

कृती -

प्रथम आदल्या रात्री 'करड्याचं बी' पाण्यात भिजत टाका. दुसऱ्या दिवशी या भिजलेल्या बिया मिक्सरमध्ये वाटून त्याचे दुध काढून घ्या. गाळणीच्या सहय्याने ते मिश्रण एका भांड्यात गाळूण घ्या. यानंतर खपली गहू तासून ते शिजवून घ्या. शिजवताना त्यात थोडे पाणी आणि अगदी थोडेसे मीठ टाका. गहू शिजले की त्यात वरुन थोडे तुप टाका. यानंतर त्यात किसलेला कोल्हापूरी चवीचा गुळ टाका. तयार केलेल्या करड्याच्या बियांचे दुध घालून ते पुन्हा शिजवून घ्या. या तयार मिश्रणात वरुन काजू, बदाम, आणि तुम्हाला आवश्यक ते सर्व ड्रायफ्रुट्स टाका. यानंतर यात ओल्या खोबऱ्याचे छोटे छोटे तुकडे करुन टाका. काही काळ ही खीर तशीच शिजत ठेवा. आणि काही काळासाठी आठवत ठेवा. तुमची गरमा गरम खीर तयार आहे. तुम्ही दुधासोबत ही खीर सर्व्ह करु शकता.

Ganesh Utsav 2022
Ganeshotsav 2022 : गणपतीला नैवेद्यासाठी तयार करा स्पेशल श्रीखंड, पाहा रेसिपी

साधारणत: ग्रामीण भागात या खीरीमध्ये अस्सल सेंद्रिय कोल्हापूरी गुळाचा वापर होतो. याशिवाय अजूनही एक असा घटक आहे ज्यामुळे ही खीर अधिक स्वादिष्ट आणि रुचकर लागते. तो घटक म्हणजे करड्याचं बी. या बीयांचा वापर कसा वापरावा याची माहिती आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ज्यामुळे तुमची खीर चविष्ट तर होतेच शिवाय तुमचे कौतुकही होऊ शकते. (wheat kheer receipe)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com