uchi pillayar kovil trichy ganesh esakal
Ganesh Chaturti Festival

Ganesh chaturthi 2025: श्री गणेशाच्या मस्तकावर लंकाधिपती रावणाच्या भावाने का केला होता वार? जाणून घ्या मंदिराची पौराणिक कथा

Ganesh chaturthi 2025 : त्रिचीच्या पर्वतावर वसलेले प्राचीन गणेश मंदिर: रामायणाशी असलेला थेट संबंध

सकाळ डिजिटल टीम

 Ganesh chaturthi :

घरोघरी गणपती बाप्पा विराजमान झाले आहेत. गणेशोत्वस काळात गणेश मंदिरांमध्येही भाविकांची गर्दी होते. आपल्या देशात श्री गणेशाची अनेक मंदिरे असली तरी त्यातील काही मंदिरे पौराणिक आहेत.

भारतात अशीही मंदिरे आहेत जी रामायण-महाभारत काळापासून आहेत. या मंदिरांचे वैशिष्ट्य अन् त्यांची प्राचिनता आपल्याला थक्क करणारी आहे. आज आपण भारतातल्या अशा मंदिराची माहिती घेणार आहोत, ज्या मंदिराचा थेट संबंध रामायणाशी आहे.

 आपण ज्या मंदिराबद्दल जाणून घेणार आहोत त्या मंदिरातील श्री गणेशाच्या मूर्तीवर लंकाधिपती रावणाचे बंधू विभिषण यांनी गणेशाच्या मस्तकावर प्रहार केला होता. पण त्यांनी साक्षात देवांसोबत असं का केलं, याबद्दल जाणून घेऊयात.  

तामिळनाडूमधील एका डोंगरावर (८३ मीटरवर) असलेले हे देऊळ भारतातले सर्वात जुने-प्राचीन मंदिर मानले जाते. १०व्या शतकातल्या या मंदिरात गणेशासह शिवाची मूर्तीही आहे. यांना थय्युमना स्वामी या नावाने ओळखले जाते. त्याला उची पिल्लयार मंदिर म्हणतात. हे मंदिर सातव्या शतकाशी संबंधित असल्याचे सांगितले जाते. हे त्रिची येथील खडकाच्या किल्ल्यावर २७३ फूट उंचीवर वसलेले आहे, ज्यावर जाण्यासाठी ४०० पायऱ्या चढाव्या लागतात. या मंदिराच्या प्रांगणामधून त्रिची, श्रीरंगम, कावेरी नदी आणि कोली धरणाचे अत्यंत मनोहर दर्शन घडते.

काय आहे मंदिराची पौराणिक कथा

इथे गणेशस्थापना झाली कारण याच ठिकाणी विभीषणाने गणेशाच्या मस्तकावर प्रहार केला होता. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे श्रीरामाने रंगनाथाची प्रतिमा विभिषणाला दिली होती. पण ही मूर्ती श्रीलंकेत जावी अशी देवांची इच्छा नव्हती.

त्यामुळे, सर्व देवांनी गणेशाकडे जाऊन मदत मागितली. ती मूर्ती जिथे पहिल्यांदा ठेवली जाईल तिथे तिची स्थापना होईल. मूर्ती घेऊन विभीषण त्रिचीला पोहोचले तेव्हा त्याला कावेरी नदीत स्नान करावेसे वाटले.

विभिषणाने स्नानासाठी कावेरी नदीत प्रवेश करताच श्रीगणेशाने एका गोपाळाचे रूप घेऊन ती मूर्ती जमिनीवर ठेवली. हे पाहून विभीषण संतापला आणि गोपाळाचे मारण्यासाठी धावला. हे पाहून लहान मुलाच्या रूपातील श्रीगणेश पळत सुटले आणि पर्वताच्या शिखरावर जाऊन बसले. त्यानंतर विभीषणने त्याच्या मस्तकावर वार केला.

अर्थात विभिषणाला फसविण्यासाठी गणेशाने गोपाळ रूप धारण केले होते. त्या गुराख्याच्या मस्तकी प्रहार करताच बिभिषणाला गणेशाचे खरे स्वरूप ध्यानात आले आणि तो त्याला साष्टांग शरण गेला. अखेरीस त्याने तिथेच एक मंदिर उभारले आणि पिलियारची प्रार्थना केली.

याच मंदिरात शिवाचीही मूर्ती आहे. स्थानिक आख्यायिकेनुसार शिवाने एका सुईणीचे रूप धारण केले. या प्रसूतीवेदनांतून थय्युमनास्वामींनी तिची सुटका केली.

या मंदिराला सुरवातीला पल्लवांनी राजाश्रय दिला आणि त्याला अंतिम रूप विजयनगर काळातल्या मदुराईच्या नायकांनी दिले. नंतर ब्रिटीशांनी कर्नाटक युद्धामध्ये या मंदिराभोवती किल्ला उभारला. त्यामुळे हे मंदिर डोंगरकोटावरचे देऊळ म्हणून विशेष प्रसिद्ध झाले. आजही त्याची तेवढीच महती आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganpati Visarjan : पुणे महापालिकेतर्फे दीड दिवसाच्या गणपती विसर्जनाची तयारी पूर्ण

Ganesh Chaturthi 2025: गणोशोत्सवात गोडधोड खाऊनही स्वतःला हेल्दी आणि फिट ठेवण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Manoj Jarange: मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय ओबीसी महासंघाची तातडीची बैठक

Video : चुकीचं काम करताना पोलिसांना सापडली; भिऊन महिलेने फाडले स्वतःचेचं कपडे, अश्लीलतेची हद्द पार करणारा व्हिडिओ व्हायरल

Latest Maharashtra News Updates : नागपूरमध्ये वीज पडून दोघांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT