नागपूर : मोठ्या श्रद्धने स्थापित केलेली गणेशाची मूर्ती दहा दिवस संपल्यांनंतर विसर्जित केली जाते. दहाव्या दिवशी मोठ्या जड अंतःकरणाने लाडक्या गणेशाचा निरोप गणेश घेऊन गणेशमूर्तीचे केले जाते. भक्तीभावाने स्थापित केलेल्या मूर्तीचे विसर्जन करणे या मागेसुद्धा ‘मूर्तीविज्ञान’ असल्याचे सांगण्यात येते.
गणेश विसर्जन हे प्रतीकात्मक आहे, सगुणातून निर्गुणाकडे जाण्याचे साधन आहे. बरेच साधक सगुण उपासेनेतून ईश्वर प्राप्तीची उपासना सुरू करतात. पण निर्गुण समाधीसाठी हा आधार पण सोडवा लागतो, जसे श्री रामकृष्ण परमहंस यांनी तोतापुरी महाराजांच्या सांगण्यावरून काली मातेचे दोन तुकडे भाव जगतात केले. विसर्जन करताना सगळे आनंदात असतात अणि ढोल ताशे वाजवत असतात. मनातून एक भाव विसर्जित केल्यानंतर पुढच्या स्थितीकडे वळण्याची आपल्याला स्थिती किंवा दशा प्राप्त व्हावी, असा अध्यात्मातील गहण अर्थ आहे.
शास्त्र काय म्हणते?
धार्मिक ग्रंथानुसार महर्षी वेदव्यासजींनी गणेश चतुर्थीपासून लागोपाठ दहा दिवसांपर्यंत महाभारताची कथा गणपतीला ऐकवली होती. याला गणपतीने अक्षरशः: लिहिली होती. जेव्हा वेदव्यास कथा ऐकवित होते, तेव्हा त्यांनी आपले डोळे बंद ठेवले होते. त्यांना हे माहीत पडले नाही की या कथेचा गणपतीवर काय प्रभाव पडत आहे. जेव्हा महर्षीने कथा पूर्ण करून डोळे उघडले तेव्हा त्यांनी बघितले की दहा दिवसांपासून कथा ऐकल्याने गणपतीचे तापमान फार वाढले होते. त्यांना ताप आला होता. महर्षी वेदव्यासांनी गणपतीला जवळच्या कुंडांत डुबकी लावायला सांगितली. त्यामुळे त्यांच्या शरीरातील तापमान थोडे कमी झाले. असे मानले जाते की गणतीति गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशीपर्यंत सगुण साकार रूपात या मूर्तीत स्थापित राहतात. भगवान गणपती जल तत्त्वाची अधिपती देवता आहे. त्यामुळे गणपतीला प्रथम पूज्य मानण्यात येते. गणपती विसर्जन पाण्यात करण्यामागेही हेच कारण आहे.
काय म्हणते प्राचीन मूर्तीविज्ञान?
मूर्तीचा वा अन्य कोणत्याही प्रतीकाचा उपयोग उपासकाचे वा साधकाचे लक्ष केंद्रीत करण्यासाठी होतो. मनाची एकाग्रता साधण्यासाठी उपास्य दैवतांचे स्वरूप जास्तीत जास्त स्पष्टपणे दर्शवणारी तसेच त्या देवदेवतेचे कार्य, शक्ती व गुण यांची जाणीव करुन देणारी मूर्ती समोर असल्यास साधकाची साधना लवकर सफल होऊ शकेल, हा विचार मूर्तीविज्ञानात प्रेरक ठरतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.