२ दिवस उद्या पुण्यातील खडकवासला मध्ये काँग्रेसची राज्यव्यापी कार्यशाळा२ दिवस होणाऱ्या कार्यशाळेसाठी राज्यातील सर्व काँग्रेस चे प्रमुख नेते उपस्थित राहणारकार्यशाळेत नेत्यांकडून पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना होणार मार्गदर्शनकार्यशाळेचे उद्या सकाळी १० वाजता होणार उद्घाटन.सतीश भोसले उर्फ खोक्याला जामीन मंजूर झाला आहे.स्नेहा विशाल झेंडगे असे आत्महत्या केलेल्या विवाहित महिलेचे नावपुण्यातील आंबेगाव पठार परिसरात राहत्या घरी केली स्नेहा हिने आत्महत्याराहत्या घरात गळफास घेत केली आत्महत्याभारती विद्यापीठ पोलीस स्थानकात आत्महत्या प्रकरणी गुन्हा नोंदसासरच्या लोकाविरोधात गंभीर स्नेहाच्या नातेवाईकांचे आरोप.उत्तरकाशीतील माटली हेलिपॅडपासून धाराली आणि हर्सिल या आपत्तीग्रस्त भागात हेलिकॉप्टरद्वारे हवाई सेवा सलग तिसऱ्या दिवशीही सुरू आहे..महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीआधी उद्धव ठाकरेंना काही लोक भेटले होते त्यांनी मतदान वाढवून देऊ सांगितले पण त्यावेळी ठाकरेंनी त्यांना कोणताही प्रतिसाद दिला नाही असे संजय राऊत यांनी सांगितले..आमदार गोपीचंद पडळकर यांचे समर्थक शरणू हांडे यांचे अपहरण करत मारहाण करण्यात आली होती. या प्रकरणात आता सातव्या आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. . तब्बल सहा वर्षानंतर ठाणे महापालिकेच्या वतीने वर्षा महापौर मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला.कोल्हापूर : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी, यांसह इतर मागण्यांसाठी रविवारी (ता. १०) सकाळी नऊ वाजता चंदगडमधून शेतकरी कर्जमुक्ती दिंडी निघणार आहे. त्याची सांगता नृसिंहवाडी येथे होणार आहे. शेतकरी, शेतमजूर, वारकरी संप्रदाय, महिला व युवक यांचा दिंडीत मोठा सहभाग असणार आहे’ , अशी माहिती सहसंपर्कप्रमुख विजय देवणे यांनी दिली..बंगळूर : एम. चिन्नास्वामी स्टेडियमवरील चेंगराचेंगरीमुळे आठ बळी गेल्यानंतर घाबरलेले राज्य सरकार बंगळूरमध्ये आणखी एक नवीन स्टेडियम बांधण्याची योजना आखत आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी बंगळुरातील बोम्मसंद्रा येथील सूर्यानगर येथे ८०,००० आसन क्षमतेचे जागतिक दर्जाचे क्रीडा संकुल बांधण्याच्या कर्नाटक गृहनिर्माण मंडळाच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. .बंगळूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (ता. १०) बंगळूरला येत आहेत. ते बंगळूर-बेळगाव वंदे भारत एक्स्प्रेस, ‘नम्म मेट्रो’ची यलो लाईनसह देशातील नवीन तीन वंदे भारत एक्स्प्रेस रेल्वेचे उद्घाटन करतील. मेट्रोच्या तिसऱ्या टप्प्याची पायाभरणीही त्यांच्या हस्ते होईल. दरम्यान, भाजपने मोदींच्या स्वागताची जय्यत तयारी केली आहे. .बेळगाव : वाहतुकीची समस्या आणि कायदा व सुव्यवस्थेचे कारण पुढे करीत पोलिसांनी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे सोमवारी (ता. ११) आयोजित करण्यात आलेल्या भव्य मोर्चाला परवानगी नाकारली आहे. त्यामुळे प्रशासनाच्या भूमिकेबद्दल मराठी भाषिकांतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. प्रशासनाने परवानगी नाकारल्याने चर्चा करून पुढील निर्णय घेण्यासाठी मध्यवर्ती समितीची तातडीची बैठक रविवारी (ता. १०) दुपारी तीन वाजता मराठा मंदिर येथे आयोजित करण्यात आली आहे..मुंबई : मध्य प्रदेश सरकारने २०२४ साठीचा ‘राष्ट्रीय लता मंगेशकर पुरस्कार’ हा संगीतकार शंकर-एहसान-लॉय यांना तर २०२५ या वर्षासाठी हा सन्मान गायक सोनू निगम यांना जाहीर केला आहे. राज्य संस्कृती विभागाकडून शनिवारी या पुरस्कारांची अधिकृत घोषणा करण्यात आली. तसेच गीतकार प्रसून जोशी (२०२४) आणि दिग्दर्शक संजय लीला भन्साळी (२०२५) यांना राष्ट्रीय किशोर कुमार पुरस्कार जाहीर झाला आहे. लता मंगेशकर पुरस्कार वितरण सोहळा २८ सप्टेंबर रोजी इंदूर येथे तर किशोर कुमार पुरस्कार वितरण सोहळा १३ ऑक्टोबर रोजी खंडवामध्ये होईल..कोल्हापूर : करवीर निवासिनी अंबाबाई देवीची मूर्ती सुस्थितीत राहावी, या उद्देशाने भारतीय पुरातत्त्व विभागातर्फे मूर्ती संवर्धन प्रक्रिया सोमवारी (ता. ११) व मंगळवारी (ता. १२) राबविण्यात येणार आहे. या कालावधीत गाभारागृह दर्शनासाठी बंद राहणार आहे. .Latest Marathi Live Updates 10 August 2025 : ‘पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने राबविलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ मोहिमेदरम्यान पाकिस्तानची पाच लढाऊ विमाने पाडण्यात आली होती,’’ असा गौप्यस्फोट हवाईदल प्रमुख एअरचीफ मार्शल अमरप्रीत सिंग यांनी शनिवारी केला. तसेच मध्य प्रदेश सरकारने २०२४ साठीचा ‘राष्ट्रीय लता मंगेशकर पुरस्कार’ हा संगीतकार शंकर-एहसान-लॉय यांना तर २०२५ या वर्षासाठी हा सन्मान गायक सोनू निगम यांना जाहीर केला आहे. करवीर निवासिनी अंबाबाई देवीची मूर्ती सुस्थितीत राहावी, या उद्देशाने भारतीय पुरातत्त्व विभागातर्फे मूर्ती संवर्धन प्रक्रिया सोमवारी (ता. ११) व मंगळवारी (ता. १२) राबविण्यात येणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचे उद्घाटन देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते येत्या रविवारी (ता. १७) दुपारी साडेतीनला होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (ता. १०) बंगळूरला येत आहेत. ते बंगळूर-बेळगाव वंदे भारत एक्स्प्रेस, ‘नम्म मेट्रो’ची यलो लाईनसह देशातील नवीन तीन वंदे भारत एक्स्प्रेस रेल्वेचे उद्घाटन करतील. यासह देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर.. .सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.