Ganeshotsav 2022 Ashtavinayak Temple History 
Ganesh Chaturthi Festival

Ganeshotsav 2022 : नवसाला पावणारे अष्टविनायक जाणून घ्या - Photo

बाप्पाची स्वयंभू व इतिहासकालीन महत्त्वाची स्थाने म्हणजेच महाराष्ट्रातील अष्टविनायक

ओंकार जाधव

गौरीपुत्र गणेश म्हणजेच सर्वांचा लाडका बाप्पा महाराष्ट्राचे आराध्य दैवत. १४ विद्या व ६४ कलांचा अधिपती असलेल्या प्रथम पूजनीय बाप्पाला अनेक नावांनी संबोधले जाते. बाप्पाची स्वयंभू व इतिहासकालीन तसेच भक्तिपरंपरेतील महत्त्वाची स्थाने म्हणजेच महाराष्ट्रातील अष्टविनायक.

मोरगावचा मोरेश्वर मयूरेश्वराची स्वयंभू मूर्ती पूर्वाभिमुख असून, सोंड डावीकडे आहे. अष्टविनायक यात्रेची सुरुवात मोरेश्वराच्या दर्शनाने होते. याच ठिकाणी ‘सुखकर्ता दुःखहर्ता’ ही आरती समर्थ रामदास स्वामींनी सर्वप्रथम म्हटली.
सिद्धटेकचा सिद्धिविनायक सिद्धिविनायकाचे मंदिर म्हणजे अष्टविनायक यात्रेतील दुसरा गणपती. उत्तराभिमुख असलेल्या या गणेशाची सोंड उजवीकडे आहे. उजवीकडे सोंड असलेला गणपती खूप शक्तिशाली असतो. या मंदिराचा जीर्णोद्धार अहिल्याबाई होळकर यांनी केला.
पालीचा बल्लाळेश्वर पालीचा बल्लाळेश्वर अष्टविनायक यात्रेतील तिसरे स्थान. बल्लाळेश्वर म्हणजे बल्लाळविनायक हा एकमेव असा गणपती आहे जो भक्ताच्या नावाने ओळखला जातो. सूर्याच्या दक्षिणायनाच्या काळात म्हणजेच हिवाळ्यात सूर्याची किरणे बल्लाळेश्वराच्या मूर्तीवर पडतात.
महाडचा वरदविनायक वरद विनायकाचे महाडचे मंदिर अष्टविनायकाच्या यात्रेतील चौथे स्थान आहे. भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करणारा व नवसाला पावणारा अशी या बाप्पाची ख्याती आहे. मूर्तीजवळ अखंड दिवा तेवत असतो. १८९२ पासून हा दिवा अखंड तेवत आहे. १७२५ मध्ये सुभेदार रामजी भिवलकर यांनी हे मंदिर बांधले.
थेऊरचा चिंतामणी अष्टविनायकाच्या यात्रेतील भक्तांच्या चिंता दूर करणाऱ्या या गणपतीला चिंतामणी म्हटले जाते. बाप्पाची मूर्ती पूर्वाभिमुख असून, डाव्यासोंडेची आहे. थोर संत मोरया गोसावी यांनी तप साधना करून या ठिकाणी सिद्धी प्राप्त केली.
लेण्याद्रीचा गिरिजात्मज गिरीजात्मकाचे मंदिर म्हणजे अष्टविनायकातील गणपतीचे सहावे स्थान. देवी पार्वतीने पुत्रप्राप्तीसाठी येथेच उपासना केली होती. म्हणूनच पार्वतीचा म्हणजेच गिरिजेचा पुत्र गिरिजात्मज म्हणून इथल्या गणपतीला ओळखले जाते. उत्तराभिमुख असलेल्या बाप्पाच्या या मूर्तीची सोंड डावीकडे वळलेली आहे.
ओझरचा विघ्नेश्वर ओझरचा विघ्नेश्वर सातवा गणपती असून, विघ्नासुराचा नाश करण्यासाठी गणपतीने विघ्नेश्वराच्या अवतार घेतला होता. पूर्वाभिमुख असलेले या गणपतीची सोंड डावीकडे आहे. तसेच अष्टविनायकातील हा सर्वात श्रीमंत गणपती मानला जातो.
रांजणगावचा महागणपती अष्टविनायक यात्रेतील गणपतीचे आठवे स्थान. डाव्या सोंडेची बाप्पाची मूर्ती कमळावर आसनस्थ आहे. त्रिपुरासुराचा वध करण्यासाठी शंकराने गणपतीची आराधना केली होती. म्हणून भक्तांना पावणारा अशी या देवाची ख्याती आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Air India flight malfunction : 'एअर इंडिया'च्या विमानात बिघाड; सणासाठी निघालेले २५५ भारतीय अडकले परदेशात!

AUS vs IND: ऑस्ट्रेलियाचा प्लॅन झाला! भारताचा सामना करण्यासाठी पहिल्या वनडेसाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन नव्या खेळाडूंना संधी

Boat Capsizes: दुर्दैवी! १४ भारतीय नागरिकांना घेऊन जाणारी बोट उलटली, ३ जणांचा मृत्यू, तर...; घटनेनं हळहळ

Chhagan Bhujbal: काल 'ओबीसी'च्या मंचावर, आज नाराजीचा सूर! वडेट्टीवारांच्या व्हिडीओवरुन भुजबळांना सुनावले खडेबोल

Barshi Crime : "संबंध ठेवले नाही तर गुन्हा दाखल करीन"; विवाहित शेतकऱ्याला ब्लॅकमेल करणाऱ्या महिलेवर अखेर गुन्हा दाखल!

SCROLL FOR NEXT