Ganeshotsav 2022
Ganeshotsav 2022 esakal
Ganesh Chaturti Festival

Ganeshotsav 2022 : गणेशाच्या परीक्षेतून तिला मिळाला आशिर्वाद

सकाळ वृत्तसेवा

कुठलीही गोष्ट करताना स्वतःचा विचार करताना इतरांचाही विचार केला की त्याचा लाभ हा आपल्याला आपोआपच मिळत जातो. गणेशाने अशाच एका गरीब स्त्रीची परिक्षा घेवून तिला तिच्या मनातील भाव जाणून घेत तिला आशिर्वाद दिले याची ही कहाणी आपण जाणून घेऊया..

गणपती बाप्पा एकदा मुषकासह कैलास पर्वतावरुन फिरत असताना एका भक्ताचा आक्रोश त्यांच्या कानी पडला. एक गरीब स्त्री राहत होती. ती भुकेने अत्यंत व्याकूळ झाली होती. तेव्हा गणपती बाप्पा एका हातात तांदूळ आणि दुसऱ्या हातात दूध घेऊन मुलाच्या रूपात त्या गावात दाखल झाला. तो मुलगा आपल्याकडील साहित्याची खीर बनवण्यासाठी मदत मागू लागला.

मात्र गावातील सर्व लोक व्यस्त होते. तेव्हा तो एका गरीब स्त्रीच्या झोपडीत पोहोचला. जी त्याच्यासाठी खीर बनवायला तयार झाली. तिने त्याच्याकडील सर्व साहित्य एकत्र करून एका भांड्यात शिजवायला ठेवले. तोवर तो मुलगा खेळायला गेला. खीर शिजली असून खीर अत्यंत स्वादिष्ट झाले आहे हे तिला कळले. तिला खूप भूक लागली होती. मात्र ज्याची ती खीर आहे तो तेथे नाही म्हणून खावी कि नाही असा विचार तिच्या मनात आला.

मात्र तिला भूक सहन होत नव्हती त्यामुळे तिने खीर खाण्याचे ठरवले. मात्र खीर खाण्यापूर्वी तिने त्यातील थोडीशी खीर वाटीमध्ये काढून गणेशाच्या मूर्तीसमोर ठेवली. त्यानंतर ती खीर खाऊ लागली. खीर खाताना तिच्या लक्षात आले, कि तिने कितीही खीर खाल्ली तरी खीरीच भांड रिकाम होत नाहीये. जेव्हा तो मुलगा तिच्या झोपडीत परत आला तेव्हा त्या स्त्रीने त्याला संपूर्ण भांडे दिले आणि कबूल केले की तिला भूक लागली म्हणून तिने खाल्ले.

मात्र खाण्यापुर्वी तिने गणेशमूर्तीला वाटीभर खीर अर्पण केल्याचेही सांगितले. तेव्हा मुलाने उत्तर दिले कि गणेशाला अर्पण केले म्हणजे मी ते खाल्ले. आपल्या समोर उभा असलेला मुलगा कोणी सामान्य मुलगा नाही हे तिच्या लक्षात आले अन् ती त्याच्या पाया पडून रडू लागली. गणेशाने तिला संपत्ती आणि आरोग्याचा आशीर्वाद दिला व ते तेथून गुप्त झाले.

अशाप्रकारे गणपती बाप्पाने स्वतःला अत्यंत गरज असतानाही इतरांसाठीही काहीतरी बाजूला ठेवणाऱ्या स्त्रीला आपल्या अनोख्या शैलीने दर्शन देत आशिर्वाद दिले..

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivsena : ''मुंबईतल्या ३७ मशिदींमधून भाजपला मतदान न करण्याचे फतवे'' शिवसेनेचा गंभीर आरोप, गुन्हा दाखल

काँग्रेसमध्ये धुसफूस! मल्लिकार्जुन खरगेंच्या फोटोला काळे फासले, अधीर रंजन चौधरींबाबत केलेल्या वक्तव्यामुळे कार्यकर्ते नाराज

Marathi News Live Update: पुण्यात वाऱ्यासह हलक्या पावसाला सुरूवात

Space Tourist :  भारतीय वंशाचे गोपीचंद रचणार इतिहास, सायंकाळी सात वाजता आकाशात झेपावणार अंतराळयान

SRH vs PBKS Live Score : हैदराबादला पहिल्याच चेंडूवर मोठा धक्का! अर्शदीपने उडवला ट्रेविस हेडचा त्रिफळा

SCROLL FOR NEXT