Ganeshotsav 2022 : भगवान गणेशापुढे श्री विष्णूंनी देखील टेकले होते हात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ganeshotsav 2022

Ganeshotsav 2022 : भगवान गणेशापुढे श्री विष्णूंनी देखील टेकले होते हात

शिव- पार्वतीपुत्र गणेश म्हणजे आपल्या सर्वांचे लाडके गणपती बाप्पा यांच्या बालपणाच्या अनेक कहाण्या पुराणात सांगितल्या गेल्या आहेत. गणपती बाप्पांच्या खोडकर कृत्याने देवतांनाही त्यांच्यापुढे हात टेकावे लागत होते. असाच प्रत्यय विष्णू देवालाही आला. गणपती बाप्पाने अस काय केल कि विष्णू देवाला त्यांच्यासमोर हात टेकावे लागले ते या कथेतून आपण जाणून घेऊया.

हेही वाचा: Ganeshotsav 2022 : गणेशाचे प्रथम पुजन करण्यास शिवशंकर विसरले अन्...

आपण पाहतो विष्णू देवांकडे नेहमी एक शंख असतो. एकदिवस त्यांच्या लक्षात आलं की तो शंख सापडत नाहीये, यामुळे ते नाराज झाले. तो शंख शोधण्यासाठी त्यांनी आपली संपूर्ण शक्ती एकवटली. शंखाचा शोध सुरू असताना दुरवरुन अचानक शंखाचा आवाज ऐकू येऊ लागला. विष्णू देव त्या आवाजाचा शोध घेत असताना तो आवाज कैलास पर्वत वरून येत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. कैलास पर्वतावर पोहचताच त्यांना दिसले की गणपती बाप्पा हा शंख फुंकण्यात (वाजविण्यात) व्यस्त आहे. आपल्याला तो शंख मागितल्यावर सहजा सहजी मिळणार नाही हे विष्णू देवाला माहीत होते. तेव्हा त्यांनी शंकराला शंख परत मिळवून देण्याची विनंती केली. शंकरांनी विष्णू देवाला सांगितले की हा शंख गणेशाने घेतला आहे त्यामुळे आता तो काही तुम्हाला सहजा सहजी शंख परत करणार नाही, आता तुम्हाला त्याला मनवूनच त्याच्याकडून शंख परत घ्यावा लागेल. तेव्हा विष्णू देव शंकरांना म्हणाले नेमके आता मी काय करावे ते तरी मला सांगा.

हेही वाचा: Ganeshotsav 2022 : ...तर अशाप्रकारे उंदीर मामा झाले गणपती बाप्पाचे वाहन

शंकरांनी विष्णू देवाला गणेशाला प्रसन्न करण्यासाठी गणपतीचे पुजन करायला सांगितले. तेव्हा विष्णू देवाने मनोभावे बाप्पाची पूजा केली; हे पाहून गणपती बाप्पा अत्यंत प्रसन्न झाले आणि त्यांनी विष्णू देवाला त्यांचा शंख परत केला.

यातून आपल्याला विष्णू देवांसारखे इतके महान देवही बाप्पाची पूजा करता हे समजते. त्यांच्या या पुजनातून आपल्याला नम्रतेची शिकवण मिळते.

Web Title: Ganesha Story Of Lord Vishnus Lost Conch Ganeshotsav 2022

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..