Shreemant Dagdusheth Halwai Ganpati Mandir 
Ganesh Chaturti Festival

Ganeshotsav 2022 : पुण्यात दगडूशेठ हलवाई गणपतीसमोर ३१ हजार महिलांचे अथर्वशीर्ष पठण

सार्वजनिक गणपती ट्रस्ट आयोजित सामूहिक अथर्वशीर्षपठण

- मंगेश कोळपकर

पुणे : ॐ नमस्ते गणपतये.. त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि.. त्वमेव केवलं कर्तासि.. असे ३१ हजार महिलांच्या मुखातून अथर्वशीर्ष पठणाचे सामूहिक स्वर गुरुवारी पहाटे उमटले आणि वातावरण मंगलमय होऊन गेले. निमित्त होते ते ऋषिपंचमीचे औचित्य साधून श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टने आयोजित केलेल्या सामूहिक अथर्वशीर्षपठणाचे.

कोरोनाच्या संकटानंतर दोन वर्षांनंतर यंदाच्या गणेशोत्सवात हा सोहळा गणेशभक्तांनी अनुभविला. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे ऋषिपंचमीनिमित्त पहाटे ३१ हजार महिलांनी उत्सव मंडपासमोर अथर्वशीर्ष पठण केले. गणेश नामाचा जयघोष करीत महिलांनी पहाटेच्या मंगल समयी प्रसन्नतेची अनुभूती दिली.

प्रख्यात गायिका अनुराधा पौडवाल, पोलीस उपायुक्त डॉ. प्रियांका नारनवरे, ट्रस्टचे महेश सूर्यवंशी, सुवर्णयुग मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण, यतिश रासने, मंगेश सूर्यवंशी, बाळासाहेब सातपुते, माऊली रासने, उपक्रम प्रमुख शुभांगी भालेराव, अर्चना भालेराव यावेळी उपस्थित होते. अथर्वशीर्ष पठण उपक्रमाचे यंदा ३५ वे वर्ष होते.

अनुराधा पौडवाल म्हणाल्या, जगद्गुरू शंकराचार्य रचित सौंदर्य लहरी चे पठण मी केले आहे. धर्म बळकट करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे हे पठण आपण सर्वानी एकत्रितपणे नक्की करूया, असेही त्यांनी सांगितले. डॉ. प्रियांका नारनवरे म्हणाल्या, प्रत्येक घरामध्ये असलेल्या स्त्री शक्ती मुळे चांगले संस्कार घडत आहेत. दगडूशेठ गणपती ट्रस्ट उत्तम कार्य करीत असून यामुळे इतरांना समाजासाठी काम करण्याची प्रेरणा नक्कीच मिळेल.

पारंपरिक पेहरावातील महिलांनी पहाटेपासूनच अथर्वशीर्ष पठणासाठी उत्सव मंडपासमोर गर्दी केली होती. उत्सव मंडपापासून ते हुतात्मा चौकापर्यंतचा परिसर महिलांच्या शिस्तबद्ध रांगेने भरून गेला होता. महिलांनी शंखनाद केल्यानंतर ॐकार जप आणि मुख्य अथर्वशीर्ष पठण करीत गणरायाला नमन केले. हात उंचावून टाळ्यांचा गजर करीत महिलांनी गणरायाला अभिवादन केले. ट्रस्टच्या जय गणेश पालकत्व योजनेतील विद्यार्थ्यानी स्वातंत्र्य सेनानींच्या माहितीचे फलक हातात घेऊन त्यांना अभिवादन केले.

तसेच सुवर्णयुग तरुण मंडळाची दहीहंडी फोडताना दहीहंडीला काही वेळ शौर्याने लटकत एकटयाने दहीहंडी फोडणा- या प्रथमेश कारळे या कसबा पेठेतील गणेश मित्र मंडळाच्या गोविंदास ट्रस्टतर्फे सन्मानचिन्ह, महावस्त्र व २५ हजार रुपये देऊन सन्मानित करण्यात आले. आरतीने कार्यक्रमाची सांगता झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: पुण्यात 'जय गुजरात'ची घोषणा; मुंबईत सारवासारव, अमित शहांसमोरच्या दिलेल्या नाऱ्यावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

MP Naresh Mhaske : अर्बन नक्षल घुसखोरीवरून पुरोगामी नेत्यांची कोल्हेकुई; नरेश म्हस्केंची घणाघाती टीका

Loan Penalty: आरबीआयकडून मोठा दिलासा! आता कर्जाच्या प्री-पेमेंटवर दंड भरावा लागणार नाही, नियम कधीपासून लागू होणार?

Georai Crime : गायरान जमिन का कसता? असे म्हणून अदिवासी कुटुंबीयाना कु-हाडीने मारहाण; वडिलांसह माय-लेकी गंभीर जखमी

Latest Maharashtra News Updates : - जाहीर केलेले ११६० कोटी देऊन शाळांना टप्पा वाढ द्यावी

SCROLL FOR NEXT