Ganpati Visarjan Miravnuk Kodoli  esakal
Ganesh Chaturthi Festival

Ganpati Visarjan : विसर्जन मिरवणुकीत सुतळी बॉम्ब उडाला अन् तो डोळाच गमावून बसला; रक्तबंबाळ अवस्थेत त्यानं..

प्रकृती गंभीर झाल्याने त्याला तातडीने कोल्हापुरात खासगी रुग्णालयात दाखल केले.

सकाळ डिजिटल टीम

देवाळे येथील भारत चव्हाण कोडोलीत आपल्या सासुरवाडीत कुटुंबासोबत गणेश विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी आला होता.

कोडोली : कोडोली (ता. पन्हाळा) येथे सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुकीसमोर (Ganpati Visarjan Miravnuk) सुतळी बॉम्ब उडत का नाही हे पाहण्यास गेलेला तरुण अचानक बॉम्ब उडून डोळ्याला व डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने जखमी झाला. भारत संभाजी चव्हाण (वय २८, रा. देवाळे, ता. पन्हाळा) असे त्याचे नाव आहे.

या तरुणाला आपला उजवा डोळा गमवावा लागला. ही घटना गुरुवारी रात्री दहा वाजण्याच्या दरम्यान घडली. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, कोडोली येथे गुरुवारी गावातील सार्वजनिक गणेश मंडळाच्या विसर्जन मिरवणुका सुरू होत्या. देवाळे येथील भारत चव्हाण कोडोलीत आपल्या सासुरवाडीत कुटुंबासोबत गणेश विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी आला होता.

आठ वाजण्याच्या दरम्यान एका मंडळाने लोखंडी पाईपमध्ये सुतळी बॉम्ब लावला होता, तो बराच वेळ उडाला नसल्याने बॉम्ब उडत का नाही म्हणून पाहण्यास भारत गेला असता अचानक बॉम्ब उडला. यामुळे त्याच्या उजव्या डोळ्याला व डोक्याला मोठी दुखापत होऊन तो रक्तबंबाळ होऊन जमिनीवर बेशुद्ध अवस्थेत पडला.

छत्रपती शिवाजी चौक ते रुग्णालयापर्यंत असे अर्धा किलोमीटर खांद्यावर उचलून मंडळाच्या कार्यकर्त्यांनी पळवत नेऊन चव्हाण याला यशवंत धर्मार्थ रुग्णालयात दाखल केले. प्रकृती गंभीर झाल्याने त्याला तातडीने कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalindar Kamthe Passes Away: पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे यांचे निधन; राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात शोककळा, जिल्ह्यात हळहळ..

Food Safety: फ्रिजमधील जेवण पुन्हा-पुन्हा गरम करताय ? या '५' पदार्थांच्या बाबतीत चूक करू नका !

Agriculture Day Celebration: घोडेगावात कृषी दिन उत्साहात साजरा; आधुनिक तंत्रज्ञान, सामाजिक संस्थांच्या सहकार्याने शेतकऱ्यांचा सन्मान

Navi Mumbai: नवी मुंबईत धक्कादायक घटना; विजेचा शॉक लागून दोन कॉलेज विद्यार्थिनी पाण्यात पडल्या; घटनेनं खळबळ

श्रीसंतला मोठा दिसाला! KCA ने घातलेली तीन वर्षांची बंदी उठवली, नेमका काय होता आरोप?

SCROLL FOR NEXT