How was the first Ganesha festival in Pune after the independence in 1947 marathi news  
Ganesh Chaturthi Festival

Ganesh Festival 2023 : "देशभक्त गणपती!" असा साजरा केला होता पुणेकरांनी स्वातंत्र्यातील पहिला गणेशोत्सव

रोहित कणसे

राज्यासह संपूर्ण देशभरात आजपासून गणेशोत्सवाची लगबग पाहायला मिळत आहे. आज गणेश चतुर्थींच्या निमीत्ताने गणरायाचे ढोल-ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले. मागील काही वर्षात गणेशोत्सवाचे स्वरूप भव्य होताना पाहायला मिळत आहे. दरवर्षीचा गणेशोत्व मागील वर्षीपेक्षा अधिक मोठा ठरतो. या उत्सवाचे पुणे शहरातील रुप देखील अधिक व्यापक बनले आहे. पण तुम्हाला १९४७ साली देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पुण्यातील पहिला गणेशोत्सव कसा साजरा कसा साजरा करण्यात आला होता माहितेय का? चला सविस्तर जाणून घेऊया.

पूर्वीपासूनच महाराष्ट्रात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मात्र १९४७ सालच्या सप्टेंबर महिन्यात स्वातंत्र्यानंतरचा पहिला गणेशोत्सव पूर्वीपेक्षा जास्त उत्साहात साजरा केल्याचं पाहायला मिळालं. २९ सप्टेंबर १९४७ रोजीच्या सकाळ वृत्तपत्राच्या अंकात स्वातंत्र्यानंतरचा पहिला गणेशोत्सवाबद्दल वृत्त देण्यात आले होते.

या गणेशोत्सवात स्वातंत्र्य लढ्याचे प्रतिंबिंब देखील पाहायला मिळाले. महिनाभरापूर्वीच स्वतंत्र्य मिळालेल्या नागरिकांनी उत्सवात मोठ्या संख्येने सहभाग घेतला. स्वातंत्र्यातील पहिला गणेशोत्सव पुणेकरांनी उत्साहाने गाजविला. या उत्सवात गणपतींची संख्या ३०० वर गेल्याचे पाहायला मिळाले. इतकेच नाही तर १० दिवसाच २ लाख रुपये खर्च करण्यात आले. या गणेशोत्सवात राष्ट्रीय नेत्यांचे पेहराव, आरास पाहण्यासाठी पुणेकरांनी तुफान गर्दी केली होती.

यावर्षी सार्वजनिक गणपतींनी या वर्षी उच्चांक गाठल्याचे पहायला मिळाले. १९४७ साली पुण्यात ३०० गणपती बसवण्यात आले. तसेच गणेशोत्सवात आरास करताना लोकांनी देशाचे नकाशे, देशाचा नवीन ध्वज, महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, सुभाषचंद्र बोस यांचे फोटो देखील वापरले होते. इतकेच नाही तर गणपतींच्या मुर्ती आणि त्यांच्या वेशभूषा यांच्यात देखील मोठ्या प्रमाणात अधुनिकता पाहायला मिळाली. पूर्वी देवी देवतांच्या आवतारात असलेल्या गणपती बाप्पा या वर्षी अगदी वेगवेगळ्या रुपात पाहायला मिळाला.

How was the first Ganesha festival in Pune after the independence in 1947 marathi news

१९४७ सालच्या गणेशोत्सवात गणपती मूर्ती त्यांच्या बैठकी आणि वेशभूषा यांच्यात विविधता आणि आधुनिकपणा पाहायला मिळाला, काही ठिकाणी साध्या मुर्ती होत्या तर गाईजवळ उभा दत्त, कृष्ण, छाती फाडून दाखवणारा मारूती, राक्षसांना मारणारे देव, भगवी कफनी परिधान करून पद्मासन घातलेले ज्ञानेश्वर अशा रुढ कल्पनेवर आधारेलेले गणपती देखील होते. लकडी पुलाजवळ पुलाचीवाडी येथे गणपतीच्या हातात कुदळ देण्यात आली होती.

तसेच दररोज गणरायाचा दररोज वेष बदलण्याचा उपक्रम देखील काहींनी सुरू केला होता. एका दिवशी नेहरू तर दुसऱ्या दिवशी सुभाष, नंतर श्रीकृष्ण असे वेगवेगळे पोषाख गणपतीला करण्यात आले होते. तसेच या पोषाखाला साजेशी पार्श्वभूमी देखील तयार केली होती.

पुण्यात विजेच्या रोषणाईचा झगझगाट पाहायला मिळाला. यासोबत राष्ट्रीय प्रतिके देखील मोठ्या संख्येने सजावटीसाठी वापरण्यात आली होती. मोतीचौकात 'प्रफुल्ल क्लब'ने आपल्या गणेशोत्सवासाठी विशेष आरास केली होती, त्यांनी मध्यभागी गणेशाची मोहक मूर्ती बसवली, त्याच्या पायाशी सरस्वती वीणा वाजवीत बसलेली, तर डाव्या बाजूस लाल किल्ल्यावरून प्रचंड जनसमुदायादेखत पंडित नेहरू नवा राष्ट्रध्वज चढवीत असून लॉर्ड माऊंटबॅटन त्याला प्रणाम करताना दाखवण्यात आले होते. तर नेताजी सुभाषचंद्र बोस यांची आझाद हिंद सेनेची तुकडी डोंगरांतून स्वारी करण्यासाठी निघालेली दाखवण्यात आली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नगराध्यक्षांची निवड जनतेतूनच! दिवाळीतच वाजणार निवडणुकांचा बिगुल; पहिल्या टप्प्यात नगरपालिका किंवा झेडपी, पंचायत समित्यांची निवडणूक

Morning Breakfast Recipe: सकाळी नाश्त्यात बनवा हेल्दी एग रोल, पाहा रेसिपीचा Video

आजचे राशिभविष्य - 03 ऑक्टोबर 2025

अग्रलेख : अस्वस्थ स्वातंत्र्ययोद्धा

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 03 ऑक्टोबर 2025

SCROLL FOR NEXT