Konkan Ganeshotsav Ganpati Visarjan Ghat at Dapoli esakal
Ganesh Chaturthi Festival

Konkan Ganpati Visarjan : वादात सापडलेला दापोलीतील विसर्जन घाट 'या' कारणामुळं केला बंद; तलावाभोवती घातलं कुंपण

विसर्जन घाटाचे काम प्रस्तावित असलेने विसर्जन घाट बंद आहे.

सकाळ डिजिटल टीम

गेल्यावर्षीपर्यंत या तलावात गणेशमूर्तींचे नागरिकांकडून विसर्जन केले जात होते.

दाभोळ : सुमारे ७० लाखांहून अधिक खर्च करूनही दापोली शहरातील आसऱ्याच्या पुलाजवळील गणेश विसर्जन घाट यावर्षी दापोली नगरपंचायतीने (Dapoli Nagar Panchayat) प्रस्तावित दुरुस्तीच्या कारणामुळे बंद केला आहे. स्टेट बॅंकेसमोरील गणेश विसर्जन घाटावर भाविकांनी आपल्या गणेशमूर्ती विसर्जन कराव्यात, असे आवाहन करणारा फलक या ठिकाणी लावण्यात आला आहे.

दापोली नगरपंचायतीने आसऱ्याच्या पुलाजवळील भागाचे सौंदर्यीकरण केले होते. यासाठी सुमारे ७० लाखांचा निधी खर्च करण्यात आला होता. याठिकाणी गणेशमूर्तींचे विसर्जन (Ganpati Visarjan 2023) करण्यासाठी एक तलावही बांधण्यात आला होता, मात्र सौंदर्यीकरण करण्यासाठी केलेला खर्च वादात सापडला होता.

या तलावातील पाणी मुरत असल्याने या तलावात गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यासाठी पुरेसा पाण्याचा साठा शिल्लक राहत नसल्याने विसर्जित केलेल्या गणेश मूर्ती दिसू लागल्यावर नगरपंचायतीने पुढील वर्षी या तलावात पाण्याचा साठा टिकून राहण्यासाठी तलाव भरण्याअगोदर त्यात प्लास्टिक लावले. गेल्यावर्षीपर्यंत या तलावात गणेशमूर्तींचे नागरिकांकडून विसर्जन केले जात होते.

विसर्जित केलेल्या मूर्ती पुन्हा तलावातील पाण्यातून बाहेर काढून रातोरात दाभोळ खाडीतील पाण्यात विसर्जन करण्याचे काम नगरपंचायत प्रशासन करत होते. यावर्षी मात्र हा तलावाभोवती कुंपण घालण्यात आले असून विसर्जन घाटाचे काम प्रस्तावित असलेने विसर्जन घाट बंद आहे.

श्री गणेश मूर्तींच्या विसार्जनाकरिता पर्यायी व्यवस्था नर्सरी रोडवरील तलाव व स्टेट बँके समोरील विसर्जन घाट येथे करण्यात आली असल्याच्या फलक नगरपंचायत प्रशासनाने लावला आहे. यामुळे यावर्षी दीड दिवसांच्या व पाच दिवसांच्या गणेशमूर्तींचे विसर्जन या पर्यायी ठिकाणी करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT