news-stories

गणपती निघाले...कऱ्हाडात चार हजार गणेशमूर्तींचे आज विसर्जन; 30 फिरती संकलन केंद्रे

सचिन शिंदे

कऱ्हाड ः शहरात आज (मंगळवारी) अनंत चतुर्दशी दिवशी घरगुती व सार्वजनिक अशा सुमारे चार हजार गणेशमूर्तींचे विसर्जन होत आहे. पालिका व पोलिसांची जय्यत तयारी केली आहे. नदीकाठावर येण्यास बंदी घातली आहे. त्यामुळे प्रशासनातर्फे मूर्ती विसर्जन होणार आहे. त्यासाठी पालिकेने फिरती मूर्ती संकलन केंद्रे केली आहेत. नदीकाठावर पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे. घरगुती तीन हजार 700, तर सार्वजनिक 200 गणेशमूर्तींचे विसर्जन होईल.
 
कोरोनामुळे गणेशोत्सवावर मर्यादा आल्या आहेत. गर्दी, धामधूम, गाजावाजा न करता यंदाचा गणेशोत्सव होत आहे. गणेशोत्सवातील विसर्जनही अत्यंत साध्या पद्धतीने होणार आहे. मूर्ती विसर्जनासाठी नागरिकांना नदीकाठावर येण्यास बंदी आहे. त्यामुळे गणेशमूर्ती विसर्जनाची जबाबदारी प्रशासनाने घेतली आहे.

...तर आईचे प्राण वाचले असते; खुनानंतर अनिकेतचा आक्रोश

पालिकेने त्यासाठी फिरती मूर्ती संकलन केंद्रे तयार केली आहेत. त्याव्दारे नागरिकांच्या घराजवळ जावून मूर्ती संकलनाचे काम पालिकेचे कर्मचारी करत आहेत. 30 वाहने लावण्यात आली आहेत. त्यासाठी पालिकेचे 300 कर्मचारी मूर्ती संकलनासाठी कार्यरत राहतील. त्याशिवाय 19 जलकुंड उभे केले आहेत. त्याशिवाय दोन मोठे तलाव व कृत्रिम शेततळीही उभी केली आहेत.

#JusticeForKaku : काकूंना न्याय मिळालाच पाहिजे, का व्हायरल होतायेत काकू,वाचा सविस्तर

तेथे पालिकेतर्फे विधिवत गणेश विसर्जन होईल. कोयना व कृष्णा नदीकाठावर मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त ठेवला आहे. त्यासाठी पोलिस उपअधीक्षक, 15 जणांचे पथक, नऊ अधिकारी, 85 कर्मचारी, 31 वाहतूक शाखेचे कर्मचारी, 47 गृहरक्षक दलाचे जवान व राज्य राखीव दलाचे एक पथक तैनात आहे. 

कऱ्हाड तालुक्‍याची स्थिती गंभीर; पृथ्वीराज चव्हाणांच्या जिल्हाधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना 

सार्वजनिक मंडळांचाही पुढाकार
 
अनंत चतुर्दशी दिवशी सार्वजनिक गणेश मंडळांनाही त्यांची स्वतंत्र व्यवस्था केली आहे. अनेक मंडळांनी त्यांच्या गणेशमूर्ती विसर्जनासाठी मंडळासमोरच काहील ठेवल्या आहेत. त्या दिवशी त्या मंडळांसह परिसरातील लोकांनी त्या काहीलीत गणेशमूर्ती विसर्जित कराव्यात, असेही आवाहन मंडळांनी केले आहे.

बँड व्यावसायिकांवर कोरोनाचं विघ्न; ४५ हजार कलाकारांची उपासमार

शनिवार पेठ, शुक्रवार पेठ, गुरुवार पेठेतील बहुतांश मंडळांनी ही सुविधा उपलब्ध करून देवून चांगली सुरवात केली आहे. त्यामध्ये शाडूच्या गणेशमूर्ती विसर्जित करण्याचे आवाहनही केले आहे. 

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Virat Kohli Century : विराट कोहलीचा वर्ल्ड रेकॉर्ड! KKR विरुद्ध शतकी खेळी अन् आशियात कोणालाच न जमलेला केला पराक्रम...

IPL 2026 : चेन्नई सुपर किंग्सला खूप मोठा धक्का! मॅच विनर खेळाडूला दुखापत, उपचारासाठी लंडनला जाणार; स्पर्धेतून माघार निश्चित

IPL 2026 Playoff Scenario: विराट कोहलीचा झंझावात अन् RCB गुणतालिकेत अव्वल! KKR चे आव्हान संपले का? जाणून घ्या समीकरण

RCB VS KKR LIVE: विराट कोहलीची पहिली धाव अन् सेलिब्रेशन जणू Century सारखं, चाहत्यांना हसू आवरेना... Viral Video ची मजेशीर गोष्ट

Milk Rate Hike: महागाईचा आणखी एक फटका! अमूलनंतर मदर डेअरीनेही दूध दर वाढवले, किती रुपयांनी? बजेट कोलमडणार

SCROLL FOR NEXT