This Year Dhol tasha pathak are celebrating ganeshotsav 2020 by sharing photos on social media 
news-stories

ढोल-ताशा, झांज अन्‌ टिपरूची वादकांना आस; वादनाचे फोटो शेअर करुन आठवणींना दिला उजाळा

सकाळवृत्तसेवा

गणेशोत्सव २०२० पिंपरी : दरवर्षी मोठ्या जल्लोषात गणरायाचे आगमन ढोल-ताशाच्या गजरात थाटामाटात होते. आगमनापूर्वी एक महिना आधीपासूनच ढोल-ताशा पथकांचा पावसातही कसून सराव सुरु असतो. दररोज युवा वादक सरावाची वेळ न चुकवता गणरायाच्या स्वागतासाठी मोठ्या उत्साहाने धडपडत असतो. यंदा साध्या पद्धतीने संसर्गाचे भान बाळगून सर्वांनी खऱ्या अर्थाने गणेशोत्सव साजरा केला. मात्र, वादकांची ढोल-ताशा, झांज, हलगी, ड्रमसेट, संबंळ अन्‌ टिपरूची हुरहूर सोशल मीडियावर दिसून आली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 
शहरात चाळीस ते पन्नास लहान-मोठी पथके आहेत. ढोल-ताशा वादनाचा आवाज दीड महिन्यापासूनच रस्तोरस्ती कानात घुमत असतो. मात्र, याउलट चित्र शहरात दिसले. एका मोठ्या पथकात जवळपास पन्नासहून अधिक सदस्य विविध वादनासाठी आहेत. राज्यात व राज्याबाहेरही या पथकांची कला सादर होत असते. बरीच पथके आत्तापर्यंत कनार्टक, हैद्राबाद या ठिकाणी वादनासाठी गेली आहेत. वादनाच्या सरावाचे, गतवर्षीच्या स्पर्धांचे तसेच आगमानाचे फोटो शेअर करून वादकांनी आठवणींना उजाळा दिला आहे.

पथकांना मिळालेले मानधन हे विविध समाजपयोगी कार्यक्रमासाठी वर्षभर वापरले जाते. त्याचबरोबर पथकाचे मानधन ढोल-ताशा पथकातील साहित्याची देखभाल दुरुस्ती, आयकार्ड, बॅज, ड्रेसकोड, वाहतूक, जेवण, खोलीभाडे या विविध कामांसाठी त्याचा उपयोग केला जातो. गेल्या पाच ते दहा वर्षांपासून पथकांचे ठरलेले नियोजन एकदमच गडबडले. मानधनाचे पैसे देखील कोरोना काळात विविध समाजपयोगी कामे, अन्नधान्य कीट व वाटपासाठी खर्च झाले. त्यामुळे यावर्षी पथकातील तरुणांनी परिस्थितीचे भान ठेवून मास्क वाटप, रक्तदान, नेत्रदान, विसर्जन घाट स्वच्छता, प्लाझ्मादान आदी समाजपयोगी कार्यक्रम राबविण्यावरच भर दिला आहे.

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

'घरचा गणपती' सजावट स्पर्धा आयोजीत केली आहे. विजेत्यास बक्षिसे दिली जाणार आहेत. फेसबुकच्या पेजला फोटो अपलोड करून विजेत्यांची निवड केली जाणार आहे. यावेळी साध्या पद्धतीने बाप्पा विराजमान केले आहेत.
- अतुल दौंडकर, मातृभूमी ढोल-ताशा पथक, कासारवाडी

दरवर्षी समाजपयोगी कार्यक्रम व विविध स्पर्धा राबविल्या जातात. यावर्षी देखील मास्क, अर्सेनिक अल्बमच्या गोळ्यांचे वाटप केले जाणार आहे. त्याचबरोबर घाटांची स्वच्छता, रस्ता सुरक्षा सप्ताह, गड स्वच्छता हे कार्यक्रम घेतले जातात. यावर्षी कार्यक्रमांचे स्वरुप कोरोनामुळे बदलावे लागले आहे.
-विशाल मानकर, शिवाज्ञा, ढोल-ताशा पथक

कोरोनाचे संकट टळू दे
स्पर्धा, रंगीत तालीम आणि मानधन नसले तरी पुढच्या वर्षी सर्व वादक तेवढ्याच उत्साहात गणरायाचे स्वागत जल्लोषात करणार आहेत. गणराया चरणी सर्वांनी कोरोनाच्या संकटातून बाहेर पडण्याची प्रार्थना प्रतिष्ठापने दिवशी केली आहे.

Video : प्राण-प्रतिष्ठापना |गणेश पूजन । गणेशोत्सव २०२०

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Pakistan Tensions : ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर आता भारताचा पाकिस्तानला आणखी एक दणका!

Midday Meal Egg Controversy : मध्यान्ह भोजनात अंडे देण्यावरून वाद...एकाच वेळी ७० पालकांनी मुलांना शाळेतून काढलं

VIRAL VIDEO: ए काय करतोयस? सेल्फी घेणाऱ्याला जया बच्चन यांनी दिला जोराचा धक्का; सगळेच अवाक, नेटकरी म्हणतात- त्याला...

Latest Maharashtra News Updates Live: केंद्र सरकारचा मोठा निर्णय, ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी

मृत्यूच्या दाढेतून परत आलेली सचिन यांची एकुलती एक लेक; "डॉक्टरांनी ती टेस्ट सांगितल्यावर मी हादरलो.."

SCROLL FOR NEXT