कोरोना महामारीचे सावट असल्याने पुण्यात यावर्षी विसर्जन मिरवणुकीला बंदी आहे. त्यामुळे पुण्यातील मानाच्या पाचही गणपतींचे आज मंडळाच्या परिसरातील हौदात विसर्जन करण्यात आले.
पुण्यातील मानाच्या पहिल्या गणपतीचे अर्थातच कसबा गणपतीचे विसर्जन झाले आहे. कोरोना महामारीच्या सावटामूळे गणपतीचे विसर्जन मंडळाच्या मंडपातच करण्यात आले.पुण्यातील मानाचा दुसरा गणपती अर्थातच तांबडी जोगेश्वरी गणपतीचे विसर्जन झाले आहे. गणरायाला निरोप देताना मंडळाच्या कार्यकर्त्यांना पोलीस वारंवार कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन करत होते.पुण्यातील मानाचा तिसरा गणपती अर्थात गुरुजी तालीम गणपतीचे आज मोठ्या थाटात विसर्जन करण्यात आले.पुण्यातील मानाचा चौथा गणपती म्हणजेच, तुळशी बाग गणपतीचेही मंडळाच्या परिसरातील हौदात विसर्जन करण्यात आले. यावेळी ढोल वाजवणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी रोखलं. काही काळ गोंधळ झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी शांततेत गणरायाला निरोप दिला.पुण्यातील मानाच्या पाच गणपतींपैकी एक, मानाचा पाचवा गणपती म्हणजे केसरी वाडा गणपतीचे विसर्जन पार पडले. विसर्जनावेळी पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ हे देखील उपस्थित होते.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.