Hajj yatra  
ग्लोबल

Hajj Pilgrim: हज यात्रेदरम्यान 1,301 जणांचा गेला जीव; सौदी अरेबियाने सांगितलं मृत्यू मागील खरं कारण...

People died during Hajj Yatra: सौदी सरकारने सांगितले की, कडक उन्हामध्ये हज यात्रा भरली होती. तापमानाने ५० डिग्रीचा (122F) पारा पार केला होता

कार्तिक पुजारी

मक्का-मदिना- हज यात्रेदरम्यान १,३०१ यात्रेकरुंचा मृत्यू झाल्याची माहिती सौदी अरेबिया सरकारने दिली आहे. यातील अनेकजण अनधिकृत यात्रेकरू होते, जे भर उन्हात अनेक किलोमीटर चालत आले होते, असं सौदी सरकारने सांगितले आहे. यावेळी कडक उन्हामध्ये हज यात्रा भरली होती. तापमानाने ५० डिग्रीचा (122F) पारा पार केला होता. 'बीबीसी'ने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

मृत झालेल्यांपैकी एक तृतियांश लोकांकडे अधिकृत परमिट नव्हते. अनेकजण थेट कडक उन्हात चालत आले होते. यावेळी त्यांनी कोठेही आडोसा घेतला नव्हता. मृतांपैकी अनेक जण वयस्कर होते, शिवाय त्यांना इतर प्रकारचा आजार होता, असं सौदी अरेबिया सरकारने स्पष्ट केलं आहे.

आरोग्य मंत्री फहाद अल-जलाजेल यांनी सांगितलं की, 'लोकांमध्ये जागरुकता निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. लोकांनी उन्हात चालणे टाळलं पाहिजे. तसेच वेळोवेळी आडोसा घेतला पाहिजे. जवळपास ५ लाख यात्रेकरूंवर उपचार करण्यात आले आहेत. यातील १,४०,००० जणांकडे अधिकृत परमिट नव्हते. अद्याप काही जणांवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. मृतांवर अल्लाहने दया दाखवावी. आम्ही त्यांच्या परिवाराबाबत संवदेना व्यक्त करतो.'

हज यात्रेदरम्यान यात्रेकरूंसाठी योग्य सुविधा न पुरवल्याचा सौदी अरेबियावर ठपका ठेवला जात आहे. जगभरातून सौदीवर टीका केली जात आहे. नोंदणी न केलेल्या यात्रेकरूंसाठी तर काहीही सुविधा नव्हती. त्यांच्यासाठी पुरेशी प्रवासाची सोय नव्हती. शिवाय त्यांच्यासाठी वातानुकूलित टेंडची देखील सुविधा उपलब्ध नव्हती.

प्रत्येक देश हज यात्रेसाठी गेलेल्या लोकांच्या मृत्यूची माहिती जाहीर करत आहे. पण, सौदी अरेबियाने यासंदर्भात कोणतीही अपडेट दिली नव्हती. पण, रविवारी सौदीने यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे. मृतांमध्ये सर्वाधिक संख्या इजिप्तच्या लोकांची आहे. ६५८ इजिप्शियन लोक दगावले आहेत, तर २०० इंडोशियाचे लोक मृत पावले आहेत. भारतातील ९८ लोकांना मृत्यू झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IAS Officer Scam Arrested : निवृत्तीच्या शेवटच्या दिवशी १६९ कोटींचा घोटाळा केल्याचे समजलं; आयएएस अधिकाऱ्याला CBI कडून अटक; ८ विभागात ५०४ कोटी लाटले?

Latest Marathi News Live Update : नेरूळमध्ये पावसात शॉर्टसर्किटचा धक्का; करंट लागून दोन महाविद्यालयीन विद्यार्थिनी जखमी

MPSC Mega Bharti : एमपीएससीकडून 2,619 जागांसाठी मोठी भरती! 'या' पदांसाठी होणार परीक्षा, ऑनलाईन अर्ज सुरू; सीमाभागातील उमेदवारांनाही संधी

Mumbai News: फेरीवाला परवान्यांवर न्यायालयाचे ताशेरे, एकाच कुटुंबाला अनेक परवाने; पालिकेला फटकारले

Luxury Bus Bike Accident : लक्झरी बसची दुचाकीला धडक; दोन तरुण ठार, बसचालक फरारी, पोलिसांकडून शोध सुरू

SCROLL FOR NEXT