Rain Flood in Afghanistan
Rain Flood in Afghanistan esakal
ग्लोबल

पाकिस्तानपाठोपाठ अफगाणिस्तानात पुराचा कहर; 180 जणांचा मृत्यू, 250 हून अधिक लोक जखमी

सकाळ डिजिटल टीम

13 प्रांतातील 8,200 हून अधिक कुटुंबांना पुराचा फटका बसलाय.

काबूल : पाकिस्तानपाठोपाठ (Pakistan) आता अफगाणिस्तानातही पुरामुळं (Rain Flood in Afghanistan) मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याच्या बातम्या समोर येत आहेत. संयुक्त राष्ट्र आणि सत्ताधारी तालिबानच्या (Taliban) म्हणण्यानुसार, एका महिन्याच्या हंगामी पावसामुळं अफगाणिस्तानमध्ये अचानक पूर आलाय. या भीषण पुरात किमान 182 लोकांचा मृत्यू झाला असून शेकडो लोक जखमी झाले आहेत.

तालिबानचे प्रवक्ते जबीहुल्ला मुजाहिद (Zabihullah Mujahid) म्हणाले, 'अचानक आलेल्या पुरात 250 हून अधिक लोक जखमी झालेत, तर 3,000 हून अधिक घरं उद्ध्वस्त झाली आहेत. 16 ऑगस्ट ते 21 ऑगस्ट दरम्यान किमान 182 लोक मरण पावले असून या 4 दिवसांत अचानक आलेल्या पुरानं 63 जणांचा बळी घेतलाय.'

पुरात जनावरं, घरं आणि शेतजमीन नष्ट

युनायटेड नेशन्सच्या म्हणण्यानुसार, इतर 30 जण बेपत्ता आहेत. त्याच वेळी 13 प्रांतातील 8,200 हून अधिक कुटुंबांना पुराचा फटका बसलाय. अलीकडं पूर्व लोगर प्रांतातील खुशी जिल्ह्यातील गावकऱ्यांनी सांगितलं की, या प्रदेशात प्रथमच पूर आला आणि जनावरं, घरं आणि शेतजमीन नष्ट झाली. लोकांना आपली घरं सोडावी लागली आहेत. सर्व लोक डोंगरात आश्रय घेत आहेत.

Rain Flood in Afghanistan

34 प्रांतांमध्ये आणखी पावसाची शक्यता

उत्तर परवान प्रांतातील तीन प्रभावित जिल्ह्यांमध्ये अचानक आलेल्या पुरात डझनभर घरं वाहून गेली. येत्या काही दिवसांत अफगाणिस्तानच्या बहुतांश 34 प्रांतांमध्ये आणखी पावसाची शक्यता असल्याचा इशारा स्थानिक हवामान खात्यानं (Meteorology Department) दिलाय. देशभरात मुसळधार पाऊस आणि अचानक आलेल्या पुरामुळं जुलैमध्ये 40 लोक आणि महिन्यापूर्वी 19 लोकांचा मृत्यू झाला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Porsche Accindet: कोणालाही पाठीशी घालणार नाही; अजित पवारांनी केले स्पष्ट

Latest Marathi News Live Update: सुनील टिंगरे चौकशीसाठी तयार उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती

Amhi Jarange: 'आम्ही जरांगे -गरजवंत मराठ्यांचा लढा' चित्रपटात 'हा' अभिनेता साकारणार अण्णासाहेब पाटलांची भूमिका; टीझर रिलीज

Cristiano Ronaldo: शेवटच्या क्षणी पराभव, नेमारनंही डिवचलं अन् रोनाल्डोला अखेर अश्रु अनावर, पाहा Video

Chennai-Mumbai Flight: 172 प्रवाशांच्या जीवाशी खेळ, चेन्नई-मुंबई फ्लाईटमध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी, विमान अज्ञात स्थळी हलवले

SCROLL FOR NEXT