ग्लोबल

Military Helicopters Crash: मलेशियामध्ये 2 लष्करी हेलिकॉप्टरची हवेत टक्कर, 10 जणांचा मृत्यू, Video Viral

Military Helicopters Crash: मलेशियामध्ये नौदलाच्या दोन हेलिकॉप्टरची हवेत टक्कर झाली आहे. या अपघातात दहा जणांचा मृत्यू झाला आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

मलेशियामध्ये नौदलाच्या दोन हेलिकॉप्टरची हवेत टक्कर झाली आहे. या अपघातात दहा जणांचा मृत्यू झाला आहे. मलेशियाच्या रॉयल मलेशियन नेव्हीच्या वार्षिक कार्यक्रमाच्या तालीमीच्या दरम्यान दोन्ही लष्करी हेलिकॉप्टरची टक्कर झाली आहे. गेल्या वर्षी मलेशियामध्ये इमर्जन्सी लँडिंगदरम्यान हेलिकॉप्टर कोसळले होते. मात्र या घटनेत हेलिकॉप्टरमधील सर्व जण सुखरूप बचावले.

मंगळवारी रॉयल मलेशियन नेव्ही परेडच्या रिहर्सल दरम्यान हवेत दोन हेलिकॉप्टरची भीषण टक्कर होऊन दहा जणांचा मृत्यू झाला, असे नौदलाने एका निवेदनात म्हटले आहे.

पश्चिमेकडील पेराक राज्यातील लुमुट नौदल तळावर मंगळवारी सकाळी ९.३२ वाजता झालेल्या अपघातात सहभागी विमानातील सर्व 10 क्रू मेंबर्स होते, असे नौदलाने सांगितले.

"सर्व जण घटनास्थळी मृत झाल्याची पुष्टी करण्यात आली आणि त्यांचे मृतदेह लुमुट आर्मी बेस हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले," असे नौदलाने सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Voter List: राज्यात एक कोटी मतदार वगळणार ? 'एसआयआर'मध्ये मुंबई, ठाणे, पुण्यात सर्वाधिक मतदार बाद होण्याचा अंदाज!

Gold Rate Today : सोने-चांदीच्या दरात सलग दोन दिवस घसरण, आजचे भाव काय?

१३५च्या स्पीडनं स्विफ्टची ट्रकला मागून धडक, अख्खं कुटुंब संपलं; पाच जणांचा जागीच मृत्यू

Bay of Bengal Low Pressure Area : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भाला पाऊस; हवामान विभागाचा अंदाज

बुमराला अचानक विश्रांती का? अफगाणिस्तान मालिकेपूर्वी BCCI चा मोठा मास्टरप्लॅन समोर!

SCROLL FOR NEXT