Nobel Peace Prize 2023 eSakal
ग्लोबल

Nobel Peace Prize 2023 : नरगिस मोहम्मदी यांना मिळाला शांततेचा नोबेल, अजूनही इराणच्या तुरुंगात आहेत कैद

Narges Mohammadi : नरगिस मोहम्मदी यांना यंदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार देण्यात आला आहे.

Sudesh

यावर्षीच्या शांततेच्या नोबेल पुरस्काराची घोषणा झाली आहे. इराणमधील महिलांच्या हक्कांसाठी काम केलेल्या नरगिस मोहम्मदी यांना हा पुरस्कार मिळाला आहे. एक मेडल आणि सुमारे 8.33 कोटी रुपये असं या पुरस्काराचं स्वरुप आहे.

इराणमधील महिलांच्या हक्कासाठी काम केलेल्या नरगिस यांना सरकारने अटक केली होती. इराण सरकारच्या विरोधात प्रपोगंडा पसरवण्याच्या आरोपाखाली त्यांना 31 वर्षे तुरुंगवास आणि 154 चाबकाचे फटके अशी शिक्षा सुनावण्यात आली होती. 51वर्षांच्या नरगिस या अजूनही इराणमधील तुरुंगात कैद आहेत.

नरगिस या डिफेंडर ऑफ ह्यूमन राईट सेंटर या संस्थेच्या उपप्रमुख आहेत. 2003 सालच्या नोबेल शांतता पुरस्कार विजेत्या शिरीन एबादी यांनी या संस्थेची स्थापना केली होती. नरगिस यांना आतापर्यंत 13 वेळा अटक करण्यात आली आहे, तर पाच वेळा त्यांना दोषी ठरवण्यात आलं आहे.

सप्टेंबर 2022 मध्ये महसा जिना या कुर्दिश तरुणीचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला होता. यानंतर इराणमध्ये पोलीस आणि सरकार विरोधात मोठं आंदोलन सुरू झालं होतं. यामध्ये मोठ्या प्रमाणात महिलांचा सहभाग होता. या आंदोलकांवर इराण सरकारने मोठ्या प्रमाणात अत्याचार केले, ज्यात 500 हून अधिक आंदोलकांचा मृत्यू झाला होता.

आतापर्यंत या आंदोलनामध्ये 20 हजारांहून अधिक लोकांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये नरगिस मोहम्मदी सहभागी झाल्या होत्या. त्यांनाही यात अटक करण्यात आली. नरगिस यांनी व्हाइट टॉर्चर नावाचं एक पुस्तकही लिहिलं आहे. यामध्ये त्यांनी तुरुंगातील आपले अनुभव आणि इतर कैद्यांच्या कथा लिहिल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT