ग्लोबल

चीनमधून निघाली साडेसहा लाख किट; हॉटस्पॉटमध्ये चाचण्यांच्या प्रयत्नांना येणार वेग

वृत्तसंस्था

बीजिंग - चीनकडून भारताला साडे सहा लाख टेस्ट किट मिळण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे. गुरुवारी सकाळी ही किट दक्षिण चीनमधील ग्वांगझू विमानतळावरून पाठविण्यात आली. लॉकडाउनच्या कालावधीत प्रामुख्याने हॉटस्पॉटमध्ये चाचण्या वेगाने करण्याच्या प्रयत्नांना यामुळे चालना मिळण्याची अपेक्षा आहे. 

चीनमधील भारताचे राजदूत विक्रम मिस्री यांनी ट्‌वीटद्वारे ही माहिती दिली. येत्या पंधरवड्यात वीस लाखाहून जास्त किट चीनमधून मागविण्यात येतील. चीन सरकारच्या मदतीने भारत प्रमाणित कंपन्यांकडे दीड लाख वैयक्तिक सुरक्षा साहित्य आणि तीस लाख टेस्ट किटची ऑर्डर देत आहे. ही सामग्री वेळेत, सुरळीतपणे तसेच स्थिर आणि योग्य दराने मिळाली तर भारत-चीन संबंधांना चालना मिळेल, असे त्यांनी सांगितले. 

दोन महिन्यांचा लॉकडाउन संपल्यानंतर व्हेंटीलेटर आणि वैयक्तिक सुरक्षा साहित्यासह (पीपीइ) महत्त्वाच्या वैद्यकीय उपकरणांच्या व्यवसायाची जगभर असलेली संधी साधण्यासाठी चीन सज्ज झाला आहे. भारतासह विविध देशांतील खासगी आणि सरकारी संस्थांनी त्यासाठी ऑर्डर दिल्या आहेत. 

चीनकडून मिळणारी किट 
- रॅपीड अँटीबॉडी टेस्ट किट 
- आरएनए एक्‍ट्रॅक्‍शन किट 
- दोन्ही टेस्ट किटमुळे 15 मिनिटांत अहवाल 
- अँटीबॉडी टेस्ट किटसाठी नाकातील स्त्रावाऐवजी रक्ताचा नमुना चालतो 
- आरएनए किटमुळे पेशींमधील रायबोन्युक्‍लिक आम्लाचा अर्क पूर्णपणे निघतो 
- या चाचणीत व्यक्तीचे जनुकीय घटक आणि असल्यास कोरोनाचे रायबोन्युक्‍लिक आम्ल निघते 

मान्यता नीट बघून घ्या 
चीनमधून आयात केलेल्या वैद्यकीय साहित्याच्या दर्जाबद्दल अनेक देशांनी चिंता व्यक्त केली आहे. याविषयी छेडले असता परराष्ट्र प्रवक्ते झाओ लिजीयन यांनी स्पष्ट केले की, सरकारची मान्यता असलेल्या कंपन्यांकडून साहित्य आयात करावे. त्याची निर्यात वेळेत व्हावी म्हणून चीन समन्वय ठेवत आहे. चांगल्या उत्पादनाची क्षमता आणि अनुभव असलेल्या नामवंत कंपन्यांमधून परदेशी ग्राहकांना निवड करता येईल अशी आम्हाला आशा आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chitra Wagh: ठाकरे गटाच्या जाहिरातीमध्ये पॉर्नस्टारचा वापर? चित्रा वाघ यांनी फोटो दाखवत केले गंभीर आरोप

Mahesh Manjrekar : स्वातंत्र्य वीर सावरकर, रणदीपचा हस्तक्षेप आणि मतभेद ; मांजरेकरांनी अखेर सोडलं मौन

Zimbabwe: झिम्बाब्वेने तयार केलं नवं चलन; पण सरकारी खात्यांमध्येच चालेनात नोटा, जनताही नाराज, काय आहे कारण?

T20 World Cup Team India : टी-20 वर्ल्ड कपचे शेर IPL मध्ये ढेर, संघात स्थान मिळताच 'हे' 6 भारतीय खेळाडू ठरलं फ्लॉप

Tech Layoffs : यंदाचं वर्ष ठरतंय 'लेऑफ'चं.. एप्रिलपर्यंत टॉप टेक कंपन्यांनी 70,000 पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना पाठवलं घरी!

SCROLL FOR NEXT