98 Indians dead during Hajj pilgrimage in Mecca MEA marathi news  
ग्लोबल

Hajj Death Toll: हज यात्रेत ९८ भारतीयांनी गमावले प्राण! भारत सरकारने दिली माहिती

98 Indians dead during Hajj pilgrimage : मक्का शहरातील तापमानाने ५० अंश सेल्सिअसचा आकडा पार केला आहे.

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली, ता. २१ ः इस्लाम धर्मातील पवित्र हज यात्रेला सौदी अरेबियामध्ये सुरवात झाली आहे. मात्र, तेथील कडक उन्हाची झळ हज यात्रेकरूंना सोसावी लागत असून आतापर्यंत उन्हाच्या तडाख्यामुळे एक हजाराहून अधिक हज यात्रेकरूंनी प्राण गमावले आहेत. यात भारतीयांचाही समावेश असून परराष्ट्र मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, या वर्षभरात हज यात्रेदरम्यान आतापर्यंत ९८ भारतीयांचा मृत्यू झाला आहे.

परराष्ट्र मंत्रालयाच्या साप्ताहिक वार्तालापादरम्यान परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी हज यात्रेसंदर्भात माहिती देताना सांगितले, की यावर्षी १.७५ लाख भारतीय यात्रेकरू हज यात्रेला पोहोचले आहेत. यात्रेचा प्रमुख कालावधी हा नऊ मे ते २२ जुलै आहे. या यात्रेमध्ये आतापर्यंत ९८ भारतीय यात्रेकरूंचा मृत्यू झाला आहे. परराष्ट्र मंत्रालयाने या सर्व लोकांच्या मृत्यूचे कारण उन्हामुळे उद्‍भवणारे आजार आणि वृद्धत्व असल्याचे सांगितले. तसेच मागील वर्षी हज यात्रेदरम्यान १८७ भारतीयांचा मृत्यू झाला होता याकडेही परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी लक्ष वेधले.

मक्का शहरातील तापमानाने ५० अंश सेल्सिअसचा आकडा पार केला आहे. सौदी अरब सरकारच्या हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी मक्केच्या मशिदीजवळचे तापमान ५१.८ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT