Afghanistan esakal
ग्लोबल

आता अफगाणिस्तानात चालणार नाहीत 'परकीय नोटा'

सकाळ डिजिटल टीम

तालिबाननं अफगाणिस्तानात परकीय चलनाच्या वापरावर पूर्णपणे बंदी घालण्याची घोषणा केलीय.

अफगाणिस्तान : तालिबाननं अफगाणिस्तानात (Afghanistan) परकीय चलनाच्या (Foreign Currency) वापरावर पूर्णपणे बंदी घालण्याची घोषणा केलीय. तालिबान या दहशतवादी संघटनेनं ऑगस्टमध्ये सत्ता काबीज केल्यानंतर, अफगाणिस्तानची अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडून गेलीय. त्यामुळं वैतागलेल्या तालिबाननं हा निर्णय घेतलाय.

आंतरराष्ट्रीय समुदायानं आतापर्यंत तालिबान (Taliban) प्रशासनाला सरकार म्हणून मान्यता देण्यास नकार दिलाय. दरम्यान, देशातील अनेक व्यवहार अमेरिकन डॉलरमध्ये चालतात आणि पाकिस्तानी रुपयाचा वापर दक्षिण सीमेवरील व्यापार मार्गांच्या जवळच्या भागात केला जातो. मात्र, आता एका प्रेस स्टेटमेंटमध्ये तालिबानचे प्रवक्ते जबीउल्लाह मुजाहिद यांनी जाहीर केलंय, की आतापासून जो कोणी देशांतर्गत व्यवसायासाठी परकीय चलन वापरेल, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल, असे त्यांनी आदेश दिलेत.

अफगाणिस्तानमध्ये तालिबानी राजवट सुरू झाल्यापासून इस्लामिक स्टेटचे (Islamic State) हल्ले वाढले आहेत. तालिबाननं काबूल ताब्यात घेतल्यापासून अफगाणिस्तानात स्फोटांची मालिकाही सुरूच आहे. यामध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झालाय. या सर्व स्फोटांची जबाबदारी इस्लामिक स्टेट (IS) या दहशतवादी संघटनेनं स्वीकारलीय. याच क्रमानं राजधानी काबूलमध्ये हा नवा हल्ला झालाय. या भीषण बॉम्बस्फोटात 25 जणांचा मृत्यू, तर 50 हून अधिक जण जखमी झालेत. इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेनं याचीही जबाबदारी घेतलीय.

तालिबान सरकारनं म्हटलंय, की राष्ट्रीय हितासाठी सामान्य नागरिक, व्यापारी, छोटे दुकानदार अफगाण चलन देशांतर्गत व्यवसायासाठी वापरतील. तसे न केल्यास त्यांच्यावर कारवाई आणि कठोर शिक्षा होईल. सध्या अफगाणिस्तानच्या बाजारपेठेत अमेरिकन डॉलरचा वापर केला जातो, तर पाकिस्तानसारख्या शेजारी देशाचे चलन सीमाभागातील व्यापारासाठी वापरले जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT