Israel-Hamas war  sakal
ग्लोबल

Israel-Hamas war : इस्राईलच्या उत्तर सीमेवरही युद्धाचे ढग;संघर्ष वाढल्यास हजारो दहशतवादी लेबनॉनमध्ये येण्यास तयार

लेबनॉनमधील हिज्बुल्ला ही दहशतवादी संघटना आणि इस्राईल यांच्यात सुरू असलेल्या संघर्षाचे युद्धात रूपांतर झाल्यास इराणचे पाठबळ असलेल्या सशस्त्र गटांमधील हजारो दहशतवादी लेबनॉनमध्ये येण्यास तयार असल्याचा इशारा इराणचा अभ्यास करणाऱ्या तज्ज्ञांनी दिला आहे.

सकाळ वृत्तसेवा

बैरुत : लेबनॉनमधील हिज्बुल्ला ही दहशतवादी संघटना आणि इस्राईल यांच्यात सुरू असलेल्या संघर्षाचे युद्धात रूपांतर झाल्यास इराणचे पाठबळ असलेल्या सशस्त्र गटांमधील हजारो दहशतवादी लेबनॉनमध्ये येण्यास तयार असल्याचा इशारा इराणचा अभ्यास करणाऱ्या तज्ज्ञांनी दिला आहे. असे झाल्यास हिंसाचारात मोठी वाढ होण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली. मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात इस्राईल आणि हमास यांच्यात युद्ध सुरू झाल्यापासूनच इस्राईलच्या उत्तर सीमेवर असलेल्या लेबनॉनमधील हिज्बुल्लाने हमासला पाठिंबा जाहीर करत हल्ले सुरू केले होते.

तेव्हापासून जवळपास रोजच इस्राईल आणि हिज्बुल्ला यांच्यात चकमकी व हल्ले सुरू आहेत. इस्राईलने काही दिवसांपूर्वी लेबनॉनमध्ये लक्ष्याधारित हल्ले करत हिज्बुल्लाच्या एका महत्त्वाच्या म्होरक्याला ठार मारले होते. त्यानंतर हा संघर्ष आणखी तीव्र झाला आहे. हमास आणि हिज्बुल्ला या दोन्ही संघटनांना इराणचे पाठबळ आहे. त्यामुळे उत्तर सीमेवरील संघर्षाचे युद्धात रूपांतर झाल्यास इराणचे समर्थन असलेल्या सशस्त्र गटांमधील हजारो दहशतवादी हिज्बुल्लाला साथ देण्यासाठी लेबनॉनमध्ये येण्यास तयार असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. हिज्बुल्लाचा एक म्होरक्या हसन नसरल्ला यानेही हेच जाहीर केले आहे.

मागील दशकभरापासून इराणचे पाठबळ असलेल्या लेबनॉन, इराक, अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमधील दहशतवाद्यांनी सीरियामध्ये अध्यक्ष बाशर अल असाद यांच्याबाजूने संघर्षात सहभाग घेतला आहे. आम्ही आता इस्राईलविरोधातही एकत्र येऊ, असे नसरल्ला याने सांगितले आहे. ‘‘आमच्याकडे सध्या एक लाखांहून अधिक फायटर आहेत. इराण, इराक, सीरिया, येमेन आणि इतर अनेक ठिकाणांहून लाखो जण आम्हाला सामील होण्यास तयार आहेत. सध्या आम्ही त्यांना ‘नको’ असे सांगितले आहे,’’ अशी माहिती नसरल्ला याने एका व्हिडिओद्वारे दिली होती. इस्राईलबरोबरील सध्याच्या संघर्षात आमच्या मोठ्या मनुष्यबळापैकी अत्यल्प मनुष्यबळ वापरत आहोत, संघर्षाचे युद्धात रूपांतर झाल्यास परिस्थितीत बदल होऊ शकतो, असा इशाराही त्याने दिला होता.

यांचे पाठबळ शक्य

इराकमधील पॉप्युलर मोबिलायझेशन फोर्स, अफगाणिस्तानमधील फातिमियूँन, पाकिस्तानमधील झैनबीयूँन आणि येमेनमधील हौथी या दहशतवादी संघटना लेबनॉनमध्ये येण्यास तयार आहेत. इस्राईलविरोधातील सध्याच्या संघर्षात क्षेपणास्त्रांचा हल्ला करण्यासारख्या तंत्रज्ञानाचा प्रामुख्याने वापर होत असून यासाठी अधिक मनुष्यबळाची आवश्‍यकता नाही. मात्र, युद्ध झाल्यास हिज्बुल्लाला लेबनॉनबाहेरूनही मदत लागणार आहे. इस्राईललाही या परिस्थितीची जाणीव असल्याचे कासीम कासिर या विश्र्लेषकाने सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Voter List: राज्यात एक कोटी मतदार वगळणार ? 'एसआयआर'मध्ये मुंबई, ठाणे, पुण्यात सर्वाधिक मतदार बाद होण्याचा अंदाज!

Gold Rate Today : सोने-चांदीच्या दरात सलग दोन दिवस घसरण, आजचे भाव काय?

१३५च्या स्पीडनं स्विफ्टची ट्रकला मागून धडक, अख्खं कुटुंब संपलं; पाच जणांचा जागीच मृत्यू

Bay of Bengal Low Pressure Area : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भाला पाऊस; हवामान विभागाचा अंदाज

बुमराला अचानक विश्रांती का? अफगाणिस्तान मालिकेपूर्वी BCCI चा मोठा मास्टरप्लॅन समोर!

SCROLL FOR NEXT