M1 Abrams Leopard-2 sakal
ग्लोबल

Russia Ukraine Crisis : ‘अबराम’ आणि ‘लेपर्ड’ युद्धभूमीवर उतरणार

अमेरिका, जर्मनी देणार युक्रेनला रणगाडे

सकाळ वृत्तसेवा

बर्लिन : युक्रेनच्या अनेक महिन्यांपासूनच्या मागणीनंतर अमेरिका आणि जर्मनीने अखेर त्यांना रणगाडे देण्याचा निर्णय नुकताच घेतला आहे. रशियाविरोधातील युद्धात या रणगाड्यांमुळे मोठे बळ मिळेल, अशी प्रतिक्रिया युक्रेनने दिली आहे. युक्रेनला रणगाडे पाठविण्याचा निर्णय लवकरच जाहीर केला जाईल, असे अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांच्या कार्यालयातर्फे सांगण्यात आले आहे.

अमेरिकेकडून तीस ‘एम-१ अबराम’ रणगाडे आणि जर्मनीकडून किमान १४ ‘लेपर्ड-२’ रणगाडे युक्रेनला पाठविले जाण्याची शक्यता आहे. युक्रेनला रणगाडे देण्यासाठी जर्मनीचे चॅन्सलर ओलाफ शोल्झ यांच्यावर इतर युरोपीय देशांचा दबाव होता.

जर्मनीने आतापर्यंत युक्रेनला मदत केली असली तरी त्यात भरीव असे काही नव्हते. त्यामुळे रणगाडे देण्याच्या त्यांच्या निर्णयावर युक्रेनने समाधान व्यक्त केले आहे. ‘रशियाकडून क्षेपणास्त्र हल्ल्यांमध्ये वाढ झाली असल्याने त्यांचा सामना करण्यासाठी रणगाड्यांची गरजच होती.

या रणगाड्यांच्या मदतीने रशियाने ताब्यात घेतलेले भूप्रदेश परत मिळविण्यास मदत होईल,’ असे युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. ब्रिटनही युक्रेनला ‘चॅलेंजर-२’ रणगाडे देण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय, पोलंडही युक्रेनला रणगाडे पुरविणार आहे.

आणखी एक चिथावणी : रशिया

युक्रेनला रणगाडे पुरविण्याचा निर्णय म्हणजे रशियाविरोधात दिली गेलेली आणखी एक चिथावणी आहे, अशी प्रतिक्रिया अमेरिकेतील रशियाच्या राजदूतांनी दिली आहे. तसेच, जर्मनीने घेतलेल्या निर्णयाचा काही फायदा होणार नसून, उलट त्यामुळे त्यांच्या रशियाबरोबरील संबंधांवर दीर्घ परिणाम होणार असल्याचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे.

रणगाड्यांचा फायदा

केवळ रणगाड्यांच्या जोरावर युद्ध जिंकता येत नाही, हे यापूर्वीच्या अनेक युद्धांत दिसून आले आहे. मात्र, युद्ध जिंकण्यात त्यांची मोलाची भूमिका असते, हेदेखील सिद्ध झाले आहे. युक्रेनला केवळ रशियाचे आक्रमण रोखण्यासाठी रणगाडे नको आहेत; तर त्यांना रशियाच्या ताब्यातून आपला भूभाग परत मिळवायचा आहे. अबराम, चॅलेंजर आणि लेपर्ड हे रणगाडे रशियाच्या रणगाड्यांपेक्षा वेगवान आणि अत्याधुनिक आहेत. त्यामुळे वेगवान कारवाई करत प्रदेशावर ताबा मिळविण्यासाठी रणगाड्यांचा उपयोग होऊ शकतो.

अनेक शंकांनंतर निर्णय

युक्रेनमध्ये युद्ध सुरु होऊन अकरा महिने पूर्ण झाले असून रशियाने या देशाच्या पूर्वेकडील चार प्रांतांचा बराचसा हिस्सा ताब्यात घेतला आहे. तरीही, अमेरिकेने अद्यापपर्यंत युक्रेनला क्षेपणास्त्रे, हवाई संरक्षण यंत्रणा आणि दारुगोळ्याव्यतिरिक्त इतर मदत केली नव्हती. ‘अबराम’सारखे अत्याधुनिक रणगाडे चालविण्यासाठी प्रशिक्षण आणि देखभालीची आवश्‍यकता असल्याचे कारण देत अमेरिकेने रणगाडे देणे टाळले होते.

अर्थात, आताही रणगाडे दिले तरी प्रशिक्षण कार्यक्रमानंतर त्यांचा प्रत्यक्ष युद्धभूमीवर वापर होण्यास काही महिन्यांचा कालावधी जाण्याचा अंदाज आहे. जर्मनीमध्येही रणगाडे पुरविण्याच्या मुद्द्यावरून अनेक महिने राजकीय चर्चा सुरु होती. रणगाडे पुरविल्याने युद्धाची तीव्रता वाढण्याची शक्यता काही नेत्यांनी व्यक्त केली होती. अखेर, अमेरिकेने रणगाडे दिले तरच आम्ही देऊ, या अटीवर त्यांनी युक्रेनला मदत करण्याचे मान्य केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs LSG Live: रिषभ पंतला OUT न होताच मैदान सोडण्यास भाग पाडले, हेझलवूडच्या भन्नाट चेंडूवर अघटीत घडले; लखनौचे टेंशन वाढले

Latest Marathi News Live Update: राज्यसभा उपसभापतीपदाची निवडणूक १७ एप्रिल २०२६ रोजी घेतली जाईल

Parli Vaijnath News : वाढत्या विजेच्या मागणीच्या काळात परळी वीज केंद्राचा राज्याला मोठा आधार; १२५ दिवसांत ५५५.३९ मिलीयन युनीट विजेची निर्मिती

Hormuz Strait: ४८ तासांनंतर होर्मुझची सामुद्रधुनी पूर्णपणे खुली होणार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची घोषणा, नेमकं काय घडलं?

Vinod Kambli Health : विनोदला ब्रेन स्ट्रोकचा धोका; माजी क्रिकेटपटू एकत्र आले, आर्थिक मदतीसाठी WhatsApp ग्रुप, मित्राची माहिती

SCROLL FOR NEXT