America Issues Security Alert esakal
ग्लोबल

America Issues Security Alert : रशियातील अमेरिकन नागरिकांना अलर्ट; गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळण्याचं आवाहन, नेमकं कारण काय?

America Issues Security Alert : अमेरिकेने रशियामधील आपल्या नागरिकांसाठी सुरक्षा अलर्ट जारी केला आहे. पुढच्या ४८ घंट्यांमध्ये मोठे हल्ले होण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. त्यामुळे गर्दीच्या ठिकाणांपासून दूर हाण्याचा सल्ला अमेरिकेने दिला आहे.

सकाळ डिजिटल टीम

America Issues Security Alert : अमेरिकेने रशियामधील आपल्या नागरिकांसाठी सुरक्षा अलर्ट जारी केला आहे. पुढच्या ४८ घंट्यांमध्ये मोठे हल्ले होण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. त्यामुळे गर्दीच्या ठिकाणांपासून दूर हाण्याचा सल्ला अमेरिकेने दिला आहे.

रशियामध्ये मोठे हल्ले होतील, असा इशारा अमेरिकेने दिला आहे. रशियामध्ये पुढच्या आठवड्यात राष्ट्रपती पदासाठी निवडणूक होणार आहे. त्यापूर्वीच अमेरिकेने हा अलर्ट दिला आहे.

रशियातील अमेरिकी दूतावासाने इशारा दिला की, मॉस्कोमध्ये अतिरेकी हल्ले घडवून आणण्याचा कट आखला जातोय. रशियाच्या सुरक्षा यंत्रणांनी सांगितलं की, इस्लामिक स्टेटच्या अफगान शाखेच्या एका सेलद्वारे सिनेगॉगमध्ये गोळीबार करण्यात आला. त्यामुळे अमेरिकन दूतावासाने अमेरिकन नागरिकांना ताबडतोब रशिया सोडण्याचे आवाहन केले आहे.

नेमका धोका कसा असेल याबाबत अमेरिकेने स्पष्टता दिलेली नसली तरी गर्दीची ठिकाणी, नियोजित कार्यक्रमांना गर्दी टाळली पाहिजे, असं स्पष्ट करण्यात आलेलं आहे. अमेरिकन दूतावासाने वेबसाइटद्वारे ही माहिती दिली आहे. मॉस्कोमध्ये अतेरिकी काही ठिकाणांना लक्ष्य करण्याची योजना आखत आहेत. असं त्यात म्हटलं आहे.

युक्रेनला पैसा, शस्त्रे देऊन रशियाविरुद्ध लढा देण्यास बळ दिल्याचा आरोप क्रेमलिनने आमेरिकेवर केला होता. इस्लामिक स्टेट सेल रशियाच्या कलुगा प्रदेशामध्ये आयएसआयएस खोरासान म्हणून ओळख असलेल्या गटाच्या अफगाण शाखेचा भाग म्हणून कार्यरत आहे. त्यांना अफगाणिस्तान, तुर्कस्थान, ताजिकिस्तान, उज्बेकिस्तान आणि ईराणमध्ये खलिफत पाहिजे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Marathi News Live Updates : मध्य प्रदेशातील सांवर येथे भिंत कोसळून चार महिलांचा मृत्यू, पाच जण जखमी

Otur News : जुन्नर तालुक्यात प्रस्तावित कल्याण–लातूर जनकल्याण महामार्गाला तीव्र विरोध; शेतकरी आक्रमक, धरणे आंदोलनाला सुरुवात

SCROLL FOR NEXT