Zombie Drug Videos  eSakal
ग्लोबल

Zombie Drug Videos : झॉम्बी ड्रगचा कहर वाढला! अमेरिकेतील तरुण पिढी होतेय बरबाद; भयानक व्हिडिओ समोर

या ड्रगचं नाव झायलाझीन (Xylazine) असं आहे.

Sudesh

अमेरिकेतील झॉम्बी ड्रगचा कहर थांबण्याचं नाव घेत नाहीये. दुष्परिणाम स्पष्ट दिसत असूनही कित्येक तरुण-तरुणी या ड्रगच्या विळख्यात येत आहेत. या ड्रगमुळे शरीरावर होणारा परिणाम पाहून याला 'झॉम्बी ड्रग' हे टोपणनाव मिळालं आहे.

काय आहे हे ड्रग

या ड्रगचं नाव झायलाझीन (Xylazine) असं आहे. यालाच ट्रान्क (Tranq) , ट्रान्क डोप (Tranq dope) आणि झॉम्बी ड्रग (Zombie Drug) अशी विविध नावं आहेत. या अमली पदार्थाचं सेवन केल्यावर गंभीर दुष्परिणाम दिसून येतात. लोकांची त्वचा सडून निघू लागते, तसंच त्यांना उभं राहणं, चालणं किंवा हालचाल करणं अशा गोष्टीदेखील करता येत नाहीत. त्यांची हालचाल चित्रपटांमध्ये दाखवण्यात आलेल्या झॉम्बींप्रमाणे असते, त्यामुळेच या ड्रगला हे टोपणनाव पडलं आहे.

व्हिडिओ व्हायरल

अमेरिकेच्या फिलाडेल्फिया शहरात या ड्रगचा वापर करणारे सर्वाधिक तरुण-तरुणी आहेत. यासोबतच कित्येक प्रौढ लोकही या ड्रगच्या आहारी गेले आहेत. या शहरातील कित्येक भयानक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

गेल्या दोन-तीन दिवसांमध्ये अपलोड झालेले हे व्हिडिओ पाहून अमेरिकेतील भीषण परिस्थितीची कल्पना येते. या व्हिडिओंमध्ये कित्येक लोक एकाच स्थितीत उभे असलेले दिसतायत. तसंच, कित्येकांच्या त्वचेवर या ड्रगचा दुष्परिणाम झालेला दिसून येतोय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Saurabh Das Contempt Case : 'सीजेपी'चे प्रवक्ते सौरभ दास पुन्हा वादाच्या भोवऱ्यात! मानहानी आणि कोर्टाचा अवमान केल्याप्रकरणी वाढला न्यायालयीन फेरा, काय आहे प्रकरण?

Khade Hanuman: नव्या जागेवर मंदिर तयार पण हनुमानजी जागचे हलेनात; उज्जैनमध्ये दक्षिणमुखी अन् उत्तरमुखी समस्या काय आहे?

Duleep Trophy Winner: ईशान किशनच्या संघाने जिंकले विजेतेपद! तिलक वर्माच्या संघाविरुद्ध फायलनमध्ये केलेल्या १००० हून अधिक धावा

Tukaram Mundhe FDA Rules : गणेश मंडळांसाठी महत्त्वाची बातमी! आता महाप्रसादासाठी FDA चा परवाना बंधनकारक; तुकाराम मुंढेंचे कडक निर्देश, कसा भरायचा अर्ज?

Marathi News Live Updates : नेपाळमधील महाप्रलयात आतापर्यंत 1,377 जणांचा मृत्यू; 5,130 नागरिक अजूनही बेपत्ता

SCROLL FOR NEXT