Antarctica Volcano esakal
ग्लोबल

बर्फाखाली दडलेले 100 ज्वालामुखी फुटले तर जगात समुद्राचा 'प्रलय'

सकाळ डिजिटल टीम

पूर्व आफ्रिकेतील ज्वालामुखी क्षेत्र हे जगातील ज्वालामुखीचं सर्वात दाट क्षेत्र मानलं जातं.

वेलिंग्टन : अंटार्क्टिका (Antarctica) हा दक्षिणेकडील खंड. हा खंड 100 पेक्षा जास्त ज्वालामुखींचं घर आहे. हे ज्वालामुखी (Volcano) बर्फाच्या (Ice) जाड थराखाली दडले असून या ज्वालामुखींचा स्फोट होऊन जगभरातील महासागरात पाण्याची पातळी वाढू शकते, असा इशारा शास्त्रज्ञांनी दिलाय. शास्त्रज्ञांनी अलीकडेच पृथ्वीवरील सर्वात मोठ्या ज्वालामुखीचा प्रदेश शोधून काढला असून त्याच अनुषंगानं हा इशारा वजा चेतावणी दिलीय.

शास्त्रज्ञांच्या मते, हे ज्वालामुखी अंटार्क्टिका खंडाच्या (Antarctica Continent) पश्चिमेकडील बर्फाच्या जाड थराखाली दोन किमी आतमध्ये आहेत. यापैकी एक ज्वालामुखी सुमारे 4 हजार मीटर उंच आहे. हे ज्वालामुखी 2017 मध्ये यूकेच्या एडिनबर्ग विद्यापीठाच्या टीमने शोधले होते. आता या टीमनं दावा केलाय, की अंटार्क्टिकाचा हा संपूर्ण भाग पूर्व आफ्रिकेतील ज्वालामुखी क्षेत्रालाही मागं टाकू शकतो, असं त्यांचं म्हणणं आहे.

अंटार्क्टिकात फक्त दोन ज्वालामुखी सक्रिय

पूर्व आफ्रिकेतील ज्वालामुखी क्षेत्र हे जगातील ज्वालामुखीचं सर्वात दाट क्षेत्र मानलं जातं. सध्या अंटार्क्टिकावर फक्त दोन सक्रिय ज्वालामुखी आहेत. एक माउंट इरेबस आणि दुसरा डिसेप्शन बेट आहे. हे त्यांच्या भूगर्भीय रचनेच्या आधारावर अतिशय खास आणि जगातील इतर ज्वालामुखींपेक्षा पूर्णपणे वेगळे आहेत. अंटार्क्टिकावर संशोधन करणाऱ्या शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे, की या ज्वालामुखींचा लवकरच उद्रेक होण्याचा धोका खूपच कमी आहे. या ज्वालामुखींचा उद्रेक झाला, तर जगभर सागरी आपत्ती निर्माण होईल. मात्र, लिसेस्टर विद्यापीठातील ज्वालामुखीशास्त्रज्ञ प्रोफेसर जॉन स्मॅली यांनी सांगितलं, की हे ज्वालामुखी केव्हाही बर्फ वितळवू शकते. त्यामुळं बर्फ वितळून त्याचं पाणी समुद्राला मिसळेल, त्यामुळं पाण्याची पातळी खूपच वाढणार आहे, असं त्यांचं म्हणणं आहे.

..तर जगभरात समुद्राची पातळी 60 मीटरनं वाढेल

पृथ्वीवरील 80 टक्के ताजं पाणी अंटार्क्टिकामध्ये आहे. जर ते वितळलं, तर जगभरात समुद्राची पातळी 60 मीटरनं वाढेल. शास्त्रज्ञांच्या मते, यामुळं आपली पृथ्वी मानवांसाठी राहू शकणार नाही. ज्वालामुखीचा उद्रेक या संपूर्ण प्रक्रियेला गती देऊ शकतो, असं वैज्ञानिकांचं म्हणणं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाचा Mumbai Indians ला फटका; सर्व सघांची झाली एक लढत, मोठी उलथापालथ

Supreme Court : अनावश्यक खटले टाळा! अधिकाऱ्याच्या बडतर्फीला आव्हान देणाऱ्या केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टानं फटकारलं, ठोठावला दंड

Pune BJP News: पुणे महापालिका स्वीकृत नगरसेवकांना थेट पाच वर्षांची मुदत; अडीच वर्षांच्या आशेवर पाणी, अनेक कार्यकर्त्यांचा पत्ता कट

Countries with most uranium: अणुऊर्जेसाठी लागणारं युरेनियम कोणत्या देशाकडे सर्वाधिक आहे? भारत, पाकिस्तान कितव्या क्रमांकावर?

Kidney Transplant : मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी १९७० रुग्ण प्रतीक्षेत; पुणे विभागातील १४०० पुरुषांसह ५७० महिलांचाही समावेश

SCROLL FOR NEXT