Apollo 8 astronaut William Anders died in plane crash Sakal
ग्लोबल

‘अपोलो आठ’ या अंतराळ मोहिमेतील अंतराळवीर अँडर्स यांचा विमान अपघातात मृत्यू

वॉशिंग्टन राज्यातील सँड जुआन बेटावरील पाण्यात विमान पडले.

सकाळ वृत्तसेवा

वॉशिंग्टन : अमेरिकेची ‘अपोलो आठ’ या अंतराळ मोहिमेतील अंतराळवीर निवृत्त मेजर जनरल विल्यम अँडर्स (वय ९०) यांचे शुक्रवारी (ता.७) रात्री विमान अपघातात निधन झाले. मानवाला चंद्राच्या कक्षात घेऊन जाणाऱ्या या मोहिमेत सहभागी झालेल्या अँडर्स यांनी १९६८ मध्ये अवकाशातून काढलेले निळसर रंगातील पृथ्वीचे छायाचित्र गाजले होते.

ते काल खासगी विमानातून जात होते. वॉशिंग्टन राज्यातील सँड जुआन बेटावरील पाण्यात विमान पडले. या दुर्घटनेत अँडर्स यांचा मृत्यू झाल्याची माहिती त्यांचा मुलगा हवाई दलातील लेफ्टनंट कर्नल ग्रेग अँडर्स यांनी दिली. शोध पथकाने अँडर्स यांचा मृतदेह बाहेर काढला. अमेरिकेचे मध्यवर्ती हवाई वाहतूक प्रशासन विमान दुर्घटनेचा तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Ganesh Visarjan Live: गणपती विसर्जनासाठी पुण्यात कडेकोट बंदोबस्त; आठ ते दहा हजार पोलिसांचा ताफा तैनात

Ratnagiri: आजीचा मोबाईल घेऊन शाळेत गेली, पालक ओरडताच आठवीतील विद्यार्थिनीने उचलले टोकाचे पाऊल

What a Catch! मार्को यान्सेनने दोन बोटावर घेतलेल्या झेलची हवा! फलंदाजासह सारेच स्तब्ध; तेंडुलकरच्या विक्रमाशी बरोबरी, Video

Chha.Sambhaji Nagar: एएस क्लब उड्डाणपुलावरून तरुणीने घेतली उडी

Mayuresh Prabhune : पाऊस पडतोय तरी दुष्काळ का? महाराष्ट्रातील दुष्काळाचं खरं कारण काय?

SCROLL FOR NEXT