Pakistan President  esakal
ग्लोबल

Pakistan President : पाकिस्तानच्या अध्‍यक्षपदी असिफ अली झरदारी; दुसऱ्यांदा स्वीकारला पदभार

Pakistan President : आसिफ अली झरदारी यांची पाकिस्तानचे चौदावे राष्ट्रपती म्हणून शनिवारी निवड झाली आहे. झरदारी हे पाकिस्तान पीपल्स पार्टी आणि पाकिस्तान मुस्लिम लीग (पीएमएल-एन) या पक्षांचे संयुक्त उमेदवार होते. त्यांचे प्रतिस्पर्धी महमूद खान अचकझाई हे सुन्नी इत्तेहाद परिषदेचे उमेदवार होते.

संतोष कानडे

Pakistan President : पाकिस्तानच्या अध्‍यक्षपदी असिफ अली झरदारी (वय ६८) यांची दुसऱ्यांदा निवड झाली आहे. नॅशनल असेंब्ली आणि प्रांतीय विधानसभांमध्ये शनिवारी अध्यक्षपदासाठी मतदान झाले.

पाकिस्तानच्या १४ व्या अध्यक्षपदाच्या निवडीसाठी शनिवारी सकाळी दहा वाजता मतदानाला सुरूवात झाली. सायंकाळी चारपर्यंत ते सुरू होते. झरदारी हे पाकिस्तान पीपल्स पार्टी (पीपीपी) आणि पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाज (पीएमएल-एन) या पक्षांचे संयुक्त उमेदवार होते. सुन्नी इत्तेहाद कौन्सिलचे (एसआयसी) उमेदवार महमूद खान अचकझाई (वय ७५) हेही अध्यक्षपदाच्या निवडणूक रिंगणात होते.

झरदारी हे विद्यमान अध्यक्ष डॉ. अरिफ अल्वी यांची जागी घेणार आहेत. अल्वी यांची पाच वर्षांची मुदत गेल्या वर्षीच संपुष्टात आली होती. पण जोपर्यंत नवे मंत्रिमंडळ अस्तित्वात येत नाही, तोपर्यंत ते पदावर राहणार आहेत. पाकिस्तानच्या घटनेनुसार अध्यक्षपदाची निवड अप्रत्यक्षपणे एका निवडणूक मंडळाकडून केली जाते. यात मध्यवर्ती आणि प्रांतिक सदस्य सहभागी असतात. मतदानासाठी नॅशनल असेंब्ली आणि प्रांतीय विधानसभांच्या इमारतींमध्ये मतदान झाले.

नॅशनल असेंब्लीच्या संयुक्त सत्रात झरदारी यांनी अध्यक्षपदासाठी मतदान केले. पाकिस्तानच्या दिवंगत पंतप्रधान बेनझीर भुट्टो यांचे झरदारी पती आहे तर ‘पीपीपी’चे नेते बिलावल भुट्टो झरदारी यांचे वडील आहेत. पंतप्रधान शहबाज शरीफ, ‘बिलावल भुट्टो झरदारी, ‘पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ’चे (पीटीआय) ओमर अयुब आणि ‘पीएमएल-एन’चे इशाक दार आदी बड्या नेत्यांनी मतदान केले. मतमोजणीपूर्वीच बिलावल भुट्टो यांनी वडिलांच्या विजयाबद्दल खात्री व्यक्त केली होती. ‘जो सरदार बनलेला झरदारी पुन्हा सरदार बनणार. दम मस्त कलंदर झरदारी,’ अशी पोस्ट त्यांनी ‘एक्स’वर केली होती.

अचकझाई त्यांच्या पख्तुन्ख्वा मिल्ली अवामी पार्टीचे (पीकेएमएपी) प्रमुख आहेत. ‘सुन्नी इत्तेहाद कौन्सिल’कडून ते अध्यक्षपदाच्या रिंगणात उतरले होते. सध्या तुरुंगात असलेले माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या ‘पीटीआय’ पक्षाचे समर्थक अपक्ष उमेदवार ‘पीकेएमएपी’मध्ये सहभागी झाल्यानंतर हा पक्ष प्रकाशझोतात आला. अध्यक्षपदाची निवडणूक निष्पक्ष आणि मुक्त वातावरणात झाली नसल्याने निषेध करीत आम्ही या निवडणुकीत सहभागी झालो, असे ‘पीटीआय’चे नेते अली जफर म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde Chief Minister : 'एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यास सुखाचे दिवस येतील'; महायुतीतील मंत्र्यांच्या वक्तव्याने राजकीय खळबळ

Nashik Honey Trap: मैत्रिणीसोबत लॉजवर गेला, हनी ट्रॅपमध्ये अडकवून ७ लाखांची खंडणी मागितली; दोघाना अटक

Mumbai Local: बंद दरवाजाची साधी लोकल लांबणीवर, मुंबईकरांच्या प्रतीक्षेत वाढ; सुरक्षा चाचणीत तांत्रिक अडथळे

Latest Marathi News Live Update : मनोज जरांगे यांच्या भेटीला अभिजीत दिपके, सरकारवर हल्लाबोल

Ganesh Chaturthi 2026: १४ सप्टेंबरला बाप्पाचे आगमन! जाणून घ्या अचूक तिथी ,प्राणप्रतिष्ठेचा शुभ मुहूर्त अन् संपूर्ण पूजा विधी....

SCROLL FOR NEXT