ग्लोबल

काबूलमध्ये विमानातळावर रेटारेटी, गर्दी, पाच जणांचा मृत्यू

हमीद करझाई आंतरराष्ट्रीय विमानतळावर अत्यंत भयावह स्थिती आहे.

दीनानाथ परब

काबूल - अफगाणिस्तानच्या काबूल विमानतळावर (kabul airport rush) प्रचंड गर्दी उसळली आहे. तिथे सुरु असलेल्या गोंधळामध्ये (chaos) पाच जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. अफगाणिस्तानच्या (Afganistan) हमीद करझाई आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Hamid Karzai Airport) अत्यंत भयावह स्थिती आहे. तालिबानच्या (Taliban) हाती सत्ता आल्यामुळे देशाबाहेर जाण्यासाठी अफगाणि नागरिकांनी काबूल विमानतळावर (kabul airport) एकच गर्दी केली आहे.

विमान पकडण्यासाठी, विमानात प्रवेश मिळवण्यासाठी अक्षरक्ष: चेंगराचेंगरी सुरु आहे. पाच जणांचे मृतदेह आपण गाडीतून नेताना पाहिल्याचे एका प्रत्यक्षदर्शीने सांगितेल. रॉयटर्सने हे वृत्त दिले आहे. गोळीबार कि, चेंगराचेंगरीमध्ये मृत्यू झाला ते अजून स्पष्ट झालेले नाही, असे दुसऱ्या प्रत्यक्षदर्शीने सांगितले. या मृत्यूबद्दल अधिकाऱ्यांनी अजूनपर्यंत कोणतीही माहिती दिलेली नाही.

हमीद करझाई विमानतळावरुन व्यावसायिक, प्रवासी विमानांची उड्डाणे बंद करण्यात आली आहेत. विमानतळावर लुटमार रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती काबूल विमानतळ प्राधिकरणाकडून देण्यात आली आहे. अफगाणिस्तानची हवाई हद्द टाळण्यासाठी एअर इंडियाचे शिकागो-दिल्ली विमानाचा मार्ग बदलण्यात आला आहे. मार्ग बदलण्यात आलेल्या दिल्लीला येणाऱ्या या विमानात यूएई किंवा दोहा विमानतळावर इंधन भरण्यात येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPS Transfer: मोठी बातमी! पोलीस विभागात महत्त्वाचा फेरबदल; चार आयपीएस आणि दोन राज्य पोलीस अधिकाऱ्यांची बदली, कारण काय?

Viral Video : ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जिंकताच, शिवम दुबे ट्रेनने तातडीने मुंबईसाठी रवाना का झाला? भारतीय खेळाडूने सांगितलं कारण...

IPL 2026 : इशान किशन कर्णधार, अभिषेक शर्माकडे उप कर्णधारपद... संघात खांदेपालट... आणखी एक अचंबित करणारा निर्णय

Latest Marathi News Live Update : पंढरपूर येथील सांगोला पेपर चोरी प्रकरण; दोन विद्यार्थी पोलिसांच्या ताब्यात

मुंबईत टँकरमाफियांचा हैदोस, अडीच हजाराच्या टँकरची १० हजारांना विक्री; पालिकेत विरोधक आक्रमक

SCROLL FOR NEXT