Donald Trump  sakal
ग्लोबल

Donald Trump : ट्रम्प यांच्यावर पुन्हा हल्ल्याचा प्रयत्न?परिषदेच्या जवळ चाकू घेऊन आलेल्यास ठार केले

अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे उपस्थिती असलेल्या रिपब्लिकन पक्षाच्या परिषदेच्या ठिकाणी चाकू घेऊन आलेल्या व्यक्तीला पोलिसांनी गोळ्या घालून ठार मारले.

सकाळ वृत्तसेवा

मिलवाऊकी : अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे उपस्थिती असलेल्या रिपब्लिकन पक्षाच्या परिषदेच्या ठिकाणी चाकू घेऊन आलेल्या व्यक्तीला पोलिसांनी गोळ्या घालून ठार मारले. ट्रम्प यांच्यावर गोळीबार झाल्याच्या घटनेनंतर तीन दिवसांतच हा प्रकार घडल्याने त्यांच्यावर पुन्हा एकदा हल्ला करण्याचा प्रयत्न म्हणून या घटनेकडे पाहिले जात आहे.

रिपब्लिकन पक्षाची येथे चार दिवसीय परिषद सुरू असून ट्रम्प यांच्यासह या पक्षाचे सर्व मोठे नेते यासाठी उपस्थित आहेत. गोळीबारात ट्रम्प यांच्या कानाला दुखापत झाली असतानाही ते येथे हजर असून त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. असे असतानाही आज परिषदेच्या ठिकाणी एक व्यक्ती दोन्ही हातांमध्ये चाकू घेऊन आल्याचे पोलिसांना दिसले. पोलिसांनी त्याला थांबण्याचा इशारा देऊनही तो एका व्यक्तीच्या अंगावर हल्ला करण्याच्या उद्देशाने धावून गेला. त्यामुळे पोलिसांनी तत्काळ गोळीबार करत त्याला ठार केले. हल्लेखोराचे नाव सॅम्युएल शार्प असे असल्याचे समजते.

नागरिकांमध्ये नाराजी

ट्रम्प यांच्या सुरक्षेसाठी विविध राज्यांमधील पोलिसांनाही पाचारण करण्यात आले आहे. नागरिकांनी याला आक्षेप घेतला आहे. परिषद आयोजित केलेल्या भागात अनेक बेघर लोक तंबूत राहतात. स्थानिक पोलिसांना हे माहिती असल्याने ते परिस्थिती योग्य प्रकारे हाताळतात. मात्र, बाहेरच्या पोलिसांनी कोणतीही चौकशी न करता केवळ चाकू हातात दिसला म्हणून गोळ्या मारल्या, अशी टीका नागरिकांनी केली.

इराणकडून कट?

वॉशिंग्टन : डोनाल्ड ट्रम्प यांच्या जिवाला इराणपासून धोका असल्याचा गुप्तचरांचा अहवाल आल्यामुळेच ट्रम्प यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. हा इशारा ट्रम्प यांच्यावर हल्ला होण्याच्या आधीच मिळाला होता, असेही त्यांनी सांगितले. ट्रम्प हे अध्यक्ष असताना त्यांनी २०२० मध्ये इराण सैन्याचे प्रमुख कासिम सुलेमानी यांच्यावरील हल्ल्याचे आदेश दिले होते. तेव्हापासूनच ट्रम्प यांना इराणपासून धोका असल्याचे मानले जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pandharpur Darshan: पंढरपुरात विठ्ठल दर्शनासाठी पैसे घेतल्याचा धक्कादायक प्रकार; ऑडिओ क्लिप व्हायरल, अधिक मास सुरू होताच पंढरपुरात खळबळ..

Mumbai Goa Highway Toll Collection : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अपूर्ण, टोल वसुली सुरू; नितीन गडकरींच्या आवाहनाला केराची टोपली

लाईव्ह सामन्यात रवी शास्त्रींची मोठी चूक! नाणेफेकीच्या वेळी शुभमन गिलला काय बोलले?

Child Rescue Operation: पंजाबमध्ये कूपनलिकेतून नऊ तासांनंतर मुलगा बाहेर; घराबाहेर खेळताना पडला होता खड्ड्यात, होशियारपूरमध्ये थरारक रेस्क्यू ऑपरेशन!

Rajdhani Express धावत्या राजधानी एक्सप्रेसमध्ये आगीचा भडका, एसी कोच जळून खाक

SCROLL FOR NEXT