Salman Rushdie Sakal
ग्लोबल

Salman Rushdie : प्राणघातक हल्ल्यानंतर रश्दी व्हेंटिलेटरवर; हल्लेखोराला अटक

सकाळ डिजिटल टीम

Salman Rushdie Health Update : प्रसिद्ध लेखक सलमान रश्दी यांच्यावर अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये एका व्यक्तीने अचानक हल्ला केला. या चाकू हल्ल्यात रश्दी गंभीर जखमी झाले आहेत. घटनेनंचर रश्दी यांना एअर अॅम्ब्युलन्सने रुग्णालयात नेण्यात आले. दरम्यान, न्यूयॉर्कमधून सलमान रश्दी यांच्या प्रकृतीबाबत एक अपडेट समोर आली असून, रश्दींवर रूग्णलायात शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. त्यानंतर सध्या ते व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. रश्दी यांचा एका डोळ्याला गंभीर इजा झाली असून, तो कायमचा गमावण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. वृत्तसंस्था रॉयटर्सने लेखक सलमान रश्दी यांच्या एका पुस्तक एजंटच्या हवाल्याने त्यांच्या आरोग्याची माहिती दिली आहे. पोलिसांनी रश्दी यांच्यावर हल्ला करणाऱ्या 24 वर्षीय हादी मातर या वयक्तीला न्यू जर्सी येथून अटक केली आहे.

रश्दींवर हल्ला कसा झाला?
सलमान रश्दी न्यूयॉर्कमध्ये एका कार्यक्रमाला संबोधित करण्यासाठी जात होते. त्यावेळी अचनाक एक व्यक्ती त्यांच्या दिशेने धावत आला आणि त्याने त्यांच्यावर चाकूने वार करण्यास सुरुवात केली. यानंतर रश्दी खाली कोसळले. त्यांना तातडीने रूग्णलयात दखल करण्यात आले. भारतीय वंशाचे सलमान रश्दी हे नेहमीच त्यांच्या लिखाणामुळे चर्चेत असतात. गेल्या अनेक वर्षांपासून ते अमेरिकेत वास्तव्यास आहेत. त्यांच्या काही पुस्तकांबाबत त्यांना अनेकदा धमक्याही आल्या होत्या. त्यामुळे रश्दी यांना सुरक्षा देण्यात आली होती. सध्या पोलीस या हल्ल्यामागे कोणत्या संघटनेचा हात आहे याचा शोध घेत आहेत.

दरम्यान, रश्दी यांच्या ज्यावेळी हल्ला झाला त्यावेळी तेथे उपस्थित असलेल्या प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, हल्लेखोराने 20 सेकंदात रश्दी यांच्यावर 10 ते 15 वेळा चाकूने वार केले. यानंतर रश्दी यांच्या शरिरातून मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव होऊ लागला. त्यानंतर रश्दी यांना तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेवेळी हल्लेखोराने काळ्या रंगाचा मुखवटा परिधान केला होता.

पोलिसांकडून निवेदन जारी
घटनेनंतर पोलिसांनी 24 वर्षीय हल्लेखोराला अटक केली असून, एक निवेदन जारी केले आहे. जारी करण्यात आलेल्या या निवेदनात, घडलेली घटना आमच्या जवळपास 150 वर्षांच्या इतिहासातील सर्वात मोठी घटना आहे. सध्या रश्दी यांच्या कुटुंबाला सुरक्षा पुरवणे हा आमचा मुख्य उद्देश असून, हल्ल्यामागचा मुख्य उद्देश समजून घेण्यासाठी FBI सोबत काम करत असल्याचे न्यूयॉर्क पोलिसांनी म्हटले आहे. घटनास्थळी एक बॅग आणि काही इलेक्ट्रॉनिक उपकरणे सापडल्याचेही न्यूयॉर्क राज्य पोलिसांनी सांगितले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur News : कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या कुलगुरूंचं अपघाती निधन, पत्नीचाही मृत्यू; मूळ गावी जाताना घडली घटना

Latest Marathi News Updates : कोल्हापुरात रात्री झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर पोलिसांची दोन्ही समाजांसोबत बैठक

Chhagan Bhujbal : लिंगायत समाजातील पोटजातींचा लवकरच ओबीसींमध्ये समावेश; मंत्री छगन भुजबळ यांचे प्रतिपादन!

"म्हणून मी वडिलांचं टॅक्सी चालवणं बंद केलं.." ती आठवण सांगताना ढसाढसा रडले भरत जाधव; जुना VIDEO चर्चेत

Rohit Sharma नवी लँबॉर्गिनी घेऊन निघाला, मुंबईच्या ट्रॅफिकमध्ये अडकला; फॅनने पाहताच पाहा कशी दिली रिअ‍ॅक्शन

SCROLL FOR NEXT