Shivani Raja  
ग्लोबल

ब्रिटनच्या संसदेतही भगवद्‌गीतेचा बोलबाला, भारतीय वंशाच्या महिला खासदाराने घेतली हाथ ठेवून शपथ

Bhagavad Gita: लेबर पार्टीचे उमेदवार राजेश अग्रवाल यांच्या विरोधात लढून त्यांनी ही निवडणूक जिंकली

Chinmay Jagtap

Shivani Raja: भारतीय वंशाच्या 29 वर्षीय गुजराती उद्योगपती शिवानी राजा ब्रिटनमध्ये खासदार म्हणून निवडून आल्या आहेत. यावेळी त्यांनी भगवद्‌गीतेवर हाथ ठेवून शपथ घेतली आहे. शिवानी यांनी लीसेस्टर पूर्व जागेवर दणदणीत विजय मिळवला आहे.

हा विजय खुप महत्वाचा आहे कारण लेबर पार्टीचे 37 वर्षांचे वर्चस्व यांनी संपुष्टात आणले आहे. लेबर पार्टीचे उमेदवार राजेश अग्रवाल यांच्या विरोधात लढून त्यांनी ही निवडणूक जिंकली.

सन्मानाची बाब

खासदार म्हणून संसदेत शपथ घेतल्या नंतर शिवानी यांनी पोस्ट करत लिहीले की, "लीसेस्टर पूर्वेचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी आज संसदेत शपथ घेणे ही एक सन्मानाची बाब आहे. गीतेवर हाथ ठेवून मी महामहिम राजा चार्ल्स यांच्याशी माझ्या निष्ठेची शपथ घेतली.याचा मला खुप अभिमान वाटत आहे.

विजय खुप महत्त्वाचा

शिवानी यांना मिळालेला हा विजय खुप महत्त्वाचा आहे. कारण लीसेस्टर पूर्व मतदार संघ हा कामगारांचा गड आहे. 1987 पासून या ठिकाणी फक्त लेबर पार्टी निवडून येत आहे. मात्र 37 वर्षात पहिल्यांदाच या मतदारसंघातून लेबर पार्टी नाही तर शिवानी निवडून आल्या आहेत.लंडनचे माजी उपमहापौर अग्रवाल यांचा पराभव शिवानी राजा यांनी केला. शिवानी यांना 14,526 मते मिळाली. तर 10,100 अग्रवाल यांना मते मिळाली.

महिला खासदार

इतिहासात पहील्यांदाच हाऊस ऑफ कॉमन्सवर निवडून आलेल्या खासदारांमध्ये महिलांची संख्या खुप मोठी आहे. सुमारे 263 महिला खासदार यंदा निवडून आल्या आहेत. जेकी अंदाजे 40 टक्के आहे. युनायटेड किंगडममध्ये 4 जुलै रोजी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत शिवानी व्यतिरिक्त इतर 27 भारतीय वंशाचे खासदार हाऊस ऑफ कॉमन्समध्ये निवडून आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AUS : भारताची डोकेदुखी वाढवणारा फलंदाज ऑस्ट्रेलियाच्या संघात आला... मागील तीन सामन्यांत केल्यात १३०, १६०, १०५ धावा

Latest Marathi News Live Update : आज फडणवीस बिहार दौऱ्यावर

खासदार प्रणिती शिंदेंची राज्य सरकारवर टीका! 'नेत्यांच्या वादानंतर कार्यकर्ते रस्त्यावर'; भाजप-काँग्रेस कार्यकर्त्यांची आंदोलन

Nanded Trains: दिवाळीनिमित्त रेल्वेगाड्या हाउसफुल्ल! नांदेड विभागाकडून तीसपेक्षा अधिक विशेष रेल्वेंचे नियोजन

Rama Eakadashi 2025: रमा एकादशीला काय करावे आणि काय करू नये? जाणून घ्या एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT