Joe Biden will apologize to Reporter
Joe Biden will apologize to Reporter Team eSakal
ग्लोबल

राष्ट्राध्यक्ष जो बायडेन 'त्या' पत्रकाराची माफी मागणार

सुधीर काकडे

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (Joe Biden) यांनी एका पत्रकाराला शिवीगाळ केल्याचा व्हिडीओ समोर आला होता. सोमवारी व्हाईट हाऊसमध्ये (White House) झालेल्या एका कार्यक्रमावेळी बायडेन यांना पत्रकाराने महागाईवरून प्रश्न विचारला होता. तेव्हा संतापलेल्या बायडेन यांनी उत्तरात थेट शिवी दिली होती. त्यांचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला होता. त्यानंतर आता बायडेन यांनी पत्रकाराची माफी मागण्यासाठी बोलावलं असल्याची माहिती समोर आली आहे. (Joe Biden will apologize to Reporter)

जो बायडेन यांना फॉक्स न्यूजचे पत्रकार पीटर डॅकी यांनी बायडेन यांना देशातील वाढत्या महागाईबाबत प्रश्न विचारला होता. देशातील वाढती महागाई हे तुमचं अपयश तर नाही ना? असा सवाल त्यांनी केला होता. यावर उत्तर देण्याऐवजी बायडेन थेट संतापले. संताप एवढा होता की, माईक चालू असल्याचं त्यांच्या लक्षात आलं नाही अन् त्यांनी थेट पत्रकाराला शिवी दिली. ते रागाच्या भरात पत्रकाराला "What a stupid son of a bitch." असं म्हटले. त्यांचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होतोय. त्यानंतर त्यांच्यावर जगभरातून टीका झाली. एनएनआय या वृत्तेसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार काही वेळापुर्वी त्या पत्रकाराची बायडेन माफी मागणार असून, त्यासाठी त्याला बोलावलं असल्याची माहिती समोर आली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024: निवडणुकीदरम्यान 8,889 कोटींची रोकड, 4,000 कोटींचं ड्रग्ज जप्त! निवडणूक आयोगाची माहिती

IPL 2024 RCB vs CSK Live Score: चेन्नईला दुसरा धक्का! कर्णधारापाठोपाठ डॅरिल मिचेलही आऊट

Lok Sabha Election 2024 : रायबरेली, अमेठीत प्रचाराचा धडाका! राहुल गांधी विरुद्ध ‘स्थानिक’ असा तडका

Video: अत्यंत संतापजनक! भर बाजारात अल्पवयीन मुलीसोबत अश्लील वर्तन; व्हिडिओ पाहून तुम्हालाही येईल राग!

RCB vs CSK: सँटेनरनं बॉलला स्पर्श केला अन् डू प्लेसिस रनआऊट झाला, पण विकेट अडकली वादाच्या भोवऱ्यात

SCROLL FOR NEXT