Presidential election  sakal
ग्लोबल

Presidential election : ब्राझीलमध्ये ‘काँटे की टक्कर’

सिल्वांना ४८.१ तर बोल्सोनॅरोंना ४३.५ टक्के मते

सकाळ वृत्तसेवा

रिओ दि जानेरो : जगातील चौथ्या क्रमांकाची सर्वांत मोठी लोकशाही म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ब्राझीलमध्ये अध्यक्षपदाच्या लढतीला आता आणखी अटीतटीचे रूप प्राप्त झाले आहे. अध्यक्षीय निवडणुकीसाठी रविवारी ९८.८ टक्के एवढ्याच मतांची मोजणी होऊ शकली त्यामध्ये माजी अध्यक्ष डाव्या ‘वर्कर पार्टी’चे लुईस इन्सिओ लुला डा सिल्वा यांना ४८.१ टक्के एवढी मते पडली तर त्यांचे प्रतिस्पर्धी आणि विद्यमान अध्यक्ष तसेच ‘लिबरल पार्टी’चे जेर बोल्सोनॅरो यांना ४३.५ टक्के लोकांचा पाठिंबा मिळाला आहे. आता दुसऱ्या टप्प्यातील मतमोजणी पार पडल्यानंतर विजयी उमेदवारांची घोषणा करण्यात येईल, असे निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले.

या निवडणुकीसाठी अन्य नऊ उमेदवार देखील मैदानात उतरले होते पण ते बोल्सोनॅरो आणि डा सिल्वा यांच्यासमोर टिकू शकले नाहीत. तत्पूर्वी मतदानपूर्व चाचण्यांचा कल हा डा सिल्वा यांच्याच बाजून होता. बोल्सोनॅरो यांना साउपावलो, रिओ दि जानेरो आणि मिनास गेरियास आदी भागांतून मोठा पाठिंबा मिळाला असला तर येथील त्यांची मते मात्र वाढलेली नाहीत. बोल्सोनॅरो हे नेहमीच चिथावणीखोर भाषणांमुळे चर्चेत राहात होते. त्यांच्याकाळात लोकशाहीवादी संस्थांना मोठ्या कसोटीला सामोरे जावे लागले होते, कोरोना काळात अत्यंत चुकीच्या पद्धतीने हाताळलेली परिस्थिती आणि अॅमेझॉनच्या जंगलातील बेसुमार वृक्षतोडआदी कारणांमुळे बोल्सोनॅरो यांच्याविरोधात मोठा जनक्षोभ पाहायला मिळतो आहे. पण याच बरोबर त्यांनी स्वतःची कट्टर राष्ट्रवादी नेता अशी ओळख निर्माण केली आहे.

सिल्वांवर भ्रष्टाचाराचा ठपका

डासिल्वा यांच्या काळामध्ये ब्राझीलमध्ये अनेक महत्त्वपूर्ण आर्थिक योजनांची अंमलबजावणी करण्यात आली होती. २००३ ते २०१० या काळामध्ये त्यांनी राबविलेल्या गरिबी निर्मुलन कार्यक्रमाचा लाखो लोकांना फायदा झाला आणि ते मध्यमवर्गामध्ये आले. त्यांच्या कार्यकाळामध्ये भ्रष्टाचार वाढल्याने त्यांना पायउतार व्हावे लागले होते. खुद्द डा सिल्वा यांना एका भ्रष्टाचाराच्या प्रकरणामध्ये १९ महिन्याचा तुरूंगवास झाला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhopal Crime: महिलांची अंतर्वस्त्रे चोरायचा अन् स्वतः घालून झोपायचा; पोलिसांनी काढला माग, धक्कादायक कारण आलं समोर

Ajit Pawar: अजित पवारांच्या हेलिकॉप्टरमधून बजरंग सोनवणेंचा प्रवास; बीडच्या राजकारणात नवा ट्विस्ट

१३ वर्षांपासून शारीरिक संबंध नाही, विकी डोनर बनवून ठेवलंय... टीव्हीच्या श्रीकृष्णाने पत्नीवर केलेले गंभीर आरोप

Ladki Bahin eKYC: लाडक्या बहिणींना दिलासा की तांत्रिक गोंधळ? लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी सुविधा सुरूच, पण अंतिम तारीख काय?

India Cricket Matches in 2026: टी२० वर्ल्ड कप ते इंग्लंड, न्यूझीलंडचे दौरे... भारतीय संघाचे २०२६ वर्षात कसे आहे संपूर्ण वेळापत्रक?

SCROLL FOR NEXT