bharat_20biotech. 
ग्लोबल

कोवॅक्सिनला मोठा धक्का; 20 मिलियन लसीची ऑर्डर रद्द

नामदेव कुंभार

भारतात तयार झालेली भारत बायोटेकची कोवॅक्सिन लस अनेक देशात वापरली जाते. ही लस परिणामकारण असल्याचं सिद्धही झालं आहे. अशातच ब्राझील सरकारने भारत बायोटेकसोबतचा आपला करार रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. ब्राझीलच्या या निर्णायामुळे भारत बायोटेकला मोठा फटका बसल्याचं बोललं जात आहे. ब्राझीलने तब्बल 20 मिलियन लसीची ऑर्डर रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे भारत बायोटेकला ३२४ मिलियन डॉलरचा फटका मानला जात आहे.

हैदराबातस्थित भारत बायोटेकनं कोवॅक्सिनची निर्मिती केली आहे. ब्राझील भारत बायोटककडून २० मिलियन लसींचा साठा खरेदी करणार होता. या करारावरुन ब्राझीलमध्ये राजकीय वातावरण तापलं होतं. त्यामुळे अखेर बुधवारी ब्राझीलने हा संपूर्ण व्यवहार रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानं हा करार रद्द करत असल्याची घोषणा ब्राझीलचे आरोग्य मंत्री मार्सेलो यांनी केली.

कोवॅक्सिनच्या करारात ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जायर बोल्सोनेरो यांच्यावर भ्रष्टाचार लपवत असल्याचे आरोप झाले. त्यामुळे ब्राझील सरकारनं अखेर संपूर्ण करारच रद्द करण्याचा निर्णय घेतला. जोपर्यंत या प्रकरणाची चौकशी पूर्ण होत नाही, तोपर्यंत कोवॅक्सिनसोबत करण्यात आलेले करार थंड बस्त्यातच राहणार असल्याचं वृत्त ब्राझीलमधील माध्यमांनी दिलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नातेवाईक नाहीत, आधार नाही; शेवटच्या प्रवासाची चिंता मिटवण्यासाठी वृद्धाने केलं स्वतःचं श्राद्ध

“मी स्क्रिप्ट वाचत नाही, तर लेखक किंवा दिग्दर्शकाकडून त्यांचं व्हिजन ऐकतो” सिनेमा निवडण्यावर सलमानचा खुलासा

Best Mileage Bikes : कमी पेट्रोलमध्ये जास्त चालतात 'या' 5 दमदार बाईक्स; सर्वाधिक मायलेज अन् किंमत लाखाच्या आतच

वल्लरीचा खोटेपणा उघड होणार? तू हि रे माझा मितवा मधील ट्विस्टने प्रेक्षक चकित

Latest Marathi News Live Update : पुण्यात पोलिसांवर गोळीबार करणाऱ्या हल्लेखोरांचा शोध तीव्र

SCROLL FOR NEXT